विनोद जाधव एक संग्राहक

Wednesday, 22 May 2019

मराठेशाहीतील घोरपडे घराणी भाग 13



मराठेशाहीतील घोरपडे घराणी भाग 13

इचलकरंजी संस्थान :अनूबाई घोरपडे---------1

अनूबाई घोरपडे - बा ल प ण व सं सा र - बाळाजी विश्वनाथ पेशव्याची सर्वांत धाकटी कन्या. हिचा इ. स. १७१३ सालीं इचलकरंजी घराण्यांतील व्यंकटराव नारायण घोरपडे याशीं वयाच्या सहाव्यासातव्या वर्षी सातारा मुक्कामीं विवाह झाला. व्यंकटराव व अनूबाई यांच्या विवाहसंबंधानें अशी एक गंमतीची आख्यायिका प्रसिद्ध आहे कीं, या लग्नांत वरपक्षाकडील सेनापतीच्या घरच्या बायकांनीं ' वधूपक्षा कडच्या बायकांनी बुरखा घेतल्याशिवाय आमच्या मांडवांत पाऊलसुद्धा टाकूं नये ' असा हट्ट धरून तो वधूपक्षाकडील बायकांच्या इच्छेविरुद्ध शेवटास नेला होता. अनूबाई व व्यंकटराव या उभयतांना वर्षातून बरेच दिवस पुण्यांत आपल्याजवळ राहतां यावें म्हणून पेशव्यांनीं इ. स. १७२२ सालीं व्यंकटरावास राहण्याकरितां पुण्यास वाडा बांधून दिला व तेथील संसाराच्या सोईकरितां मौजे वडगांव तर्फ चाकण हा सबंध गांव, पर्वतानजीकचा बाग व हडपसर येथील बाग त्यास इनाम करून दिला. अनूबाईस तिचीं वेणूताई व नारायणराव (जन्म इ. स. १७२३-२४) हीं दोनहि अपत्यें पूर्व वयांतच झालीं. ही वेणूताईच पुढें पेशवाईंतले प्रसिद्ध सरदार त्रिंबकराव मामा पेठे यास दिली.

रा ज का र णां त प्र वे श :- इ. स. १७४५ मध्यें अनूबाईच्या पतीस क्षयरोगानें मृत्यु येऊन तिला वैधव्यदशा प्राप्त झाली. तथापि अनूबाईची राजकारणांतील महत्त्वाची कामगिरी यानंतरच्या काळांतीलच आहे. नारायणराव व्यंकटेश याच्या कारकीर्दीत इचलकरंजी संस्थान वैभवाच्या शिखरास जाऊन पोंचलें तें अनूबाईच्या कर्तृत्वामुळेंच होय. नानासाहेब पेशवे व त्यांचे बंधू हे अनूबाईचे भाचे असल्यानें त्यांजपाशीं असलेल्या तिच्या वजनामुळें संस्थानचें बरेंच हित झालें. पेशव्यांनीं नारायणरावांकडे व्यंकटरावाची सरदारी पूर्ववत् चालू ठेवून प्रत्येक स्वारींत त्याजकडे कांहींना कांहीं तरी कामगिरी सोंपविली एवढेंच नव्हे तर इनामें, तैनाता देऊन, मोठमोठया मामलती सांगून व मुलूखगिरींत संस्थानिकांकडे खंडणी करार करण्याच्या बाबींतील बोलाचाली त्याजवरच सोंपवून लाखो रुपये त्यास मिळवून दिले.

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...