मराठेशाहीतील घोरपडे घराणी भाग 21
गु त्ती क र घो र प डे.- मुरारराव घोरपडे-
राजारामछत्रपतीचा प्रसिद्ध सेनापति जो संताजी घोरपडे यास बहिरजी नांवाचा भाऊ होता, त्याचा मुलगा शिदोजी व त्याचा हा मुरारराव होय. संताजीच्या मृत्यूनंतर बहिरजीनें कर्नाटकांत स्वतंत्रपणें गजेंद्रगड, गुत्ती वगैरे प्रांत मिळविला. मुराररावहि पेशवाईचया काळांत ३० वर्षे स्वतंत्रपणे वागून हैदर, प्रेंच्च, इंग्रज, अर्काटचे नबाब, साबनूर व कडाप्पाचे नबाब यांनां एकमेकांविरुद्ध मदत करून आपला फायदा करून घेत असे; त्याच्याजवळ ८।१० हजार घोडदळ असून, तें उत्कृष्ट दर्जाचें असे. तो नांवाला आपल्याला मराठयाचा म्हणजे सातारकर छत्रपतीचा सेनापति म्हणावी. नानासाहेब पेशव्यांनीं पहिल्या प्रथम त्याला आपल्या बाजूस वळवून घेऊन, त्याच्याकडून कर्नाटकांत स्वराज्यप्रसाराचें काम करविलें; त्यानंतर थोरले माधवराव व सवाईमाधवराव यांच्या कारकीर्दीमध्येंहि त्यानें कर्नाटकांतील मराठी राज्य संभाळण्याचें बिकट काम रास्ते, पटवर्धन यांच्यासह पार पाडलें. पेशव्यांच्या कर्नाकांतील बहुतेक मोहिमांत त्यानें काम केलें. हा अत्यंत शूर, मुत्सद्दी व धोरणी फौजबंद सरदारह होता. रघूजी भोंसल्यास कर्नाटकाच्या स्वारींत हा पेशव्यांतर्फे हजर होता व त्याबद्दल त्यास तुंगभर्देंच्या काठचे ती परगणे मिळाले होते व त्रिचनापल्लीचा किल्लाहि त्याच्या हाताखालीं ठेवला होता. (१७४९). मध्यंतरी हा पेशव्यांच्या विरुद्ध सावनूरकरास मिळाला होता परंतु बळवंतराव मेहेंदळयानें त्याची समजूत करून त्याला परत आणलें (१७५६). हैदराच्या व याच्या नित्य झटापटी होत. याचा बराचसा प्रांत हैदरानें घेतल्यानें (१७६२) थोरल्या माधवरावांच्या हैदरावरील पहिल्या स्वारींत हा त्यानां सामील झाला, तेव्हां श्रीमंतांनीं त्याला सेनापतिपद दिलें व त्याचा मुलुख हैदरावरील पहिल्या स्वारींत हा त्यानां सामील झाला, तेव्हां श्रीमंतानीं त्याला सेनापतिपद दिलें व त्याला मुलुख हैदराजवळून जिंकून त्याला दिला (१७६४-६५). बारभाईच्या कारकीर्दीत हा गुत्तीस तटस्थ राहिला होता, राघोबादादानें याला आपल्या बाजूस वळविण्याचा केलेला प्रयत्न फुकट गेला. पुणें दरबार इंग्रजांशीं गुजराथेंत लढण्यांत गुंतलें असतां हैदरानें गुत्तीस वेढा दिला तेव्हां मुराररवानें अत्यंत शौर्यानें पुष्कळ दिवस किल्ल्याचा बचाव केला. अखेर हैदरानें विश्वासघात करून किल्ला घेऊन मुराररावास कपालदुर्ग किल्ल्यावर चांदीची बेडी घालून ठेविले (१७७६). कैदेंतच या शूर वृद्ध मराठी सेनापतीचा अंतर झाला. कोणाचेंहि फारसे पाठबळ नसतां परमुलुखांत तरवारीच्या जोरावर मिळविलेलें गुत्तीसारखें संस्थान मुराररावानें उत्तम रीतीनें राखिलें आणि कृष्णेपासून रामेश्वरपर्यंत सर्व राजवाडयांवर आला दरारा वसविला. इंग्रजांनां अनेक वेळां साहाय्य केल्याबद्दल त्यांनीं मुराररावाची स्तुति केली आहे. सन १७०४ पासून १७७६ पर्यंत अव्वल व उत्तर मराठेशाही पाहिलेला असा हा एकच दीर्घायुषी पुरुष दिसतो. (खरे- ऐ. ले. सं. १-६; डफ; ब्रि. रि; म. रि वि. ३, ४)

No comments:
Post a Comment