विनोद जाधव एक संग्राहक

Wednesday, 29 May 2019

मराठेशाहीतील घोरपडे घराणी भाग 24

मराठेशाहीतील घोरपडे घराणी भाग 24

घो र प डे का प शी क र - 

विजापूरच्या बादशहाकडून कापशीचें ठाणें व त्याभोंवतालचा कांहीं तालुका क्रापशीकरांकडे सरंजाम म्हणून चालत होता. त्यांस ‘हिंदुराव’ हा किताब बहामनी बाहशहाकडून व ‘अमीर-उल्-उमराव’ हा किताब आदिलशहाकडून मिळालेला आहे. कोल्हापूर प्रांताची देशमुखी व सरदेशमूखी कापशीकरांकडे विजापूरकरांच्या अमदानीपासून चालत आली असावी.
कापशीकरांनां नऊकस घोरपडे म्हणतात. शिवाजीमहाराजांचा अभ्युदय होत होता त्यावेळीं कापशीकरांच्या घराण्यांत म्हाळोजी घोरपडे मुख्य होते. त्यानीं बादशहाची चाकरी सोडून महाराजांचा पक्ष धरला होता. त्यांचें पांचशें स्वारांचें पथक होतें.त्या पथकानिशीं स्वारींत हजर राहून ते शिवाजीची एकनिष्ठेनें चाकरी करीत असत. त्यांस संताजी, बहिरजी व मालोजी असे तीन पुत्र झाले. ते तिघेहि पराक्रमी निघाले. तेव्हां शिवाजीनें त्या तिघांस तीन स्वतंत्र पथकांची सरदारी सांगून त्यांची चाकरी हंबीरराव सेनापतीच्या निसबतीस लावून दिली. त्या तिघां भावांत शूरत्वाविषयीं संताजीचा नांवलौकिक विशेष झाला. परंतु कापशीकर व त्यांचे अनुयायी इचलकरंजीकर यांची प्रसिध्दि ते ‘कर्नाटकांतले सरदार’ म्हणून आहे. कापशीकर घोरपडयांचीं पाटिलकीचीं वतनें सातारा जिल्ह्यांत आहेत. पण त्यांनीं कृष्णेच्या उत्तरेस कधीं जहागीर मिळविण्याचा यत्न खेला नाहीं. प्रथमपासून त्यांचें वळण कर्नाटकाकडे पडत गेल्यामुळे तोच मुलूख त्यांच्या व इचलकरंजीकर यांच्या कर्तृत्वाचें क्षेत्र होऊन बसला.

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...