मराठेशाहीतील घोरपडे घराणी भाग 25
घो र प डे का प शी क र -
सं ता जी घो र प डे. - ------------------------------1
संताजीनें १६७४ तच शिवाजीच्या वेळीं आपलें नांव काढलें होतें. अवरंगझेबानें संभाजीस धरून कैद केलें त्यावेळीं लढाई झाली तींत म्हाळोजी घोरपडे ठार झाले. बादशहाच्या फौजेचा छापा येण्यापूर्वींच संभाजीस सुरक्षित स्थळीं पोहोंचवावें म्हणून बहिरजीनें यत्न केला. परंतु संभाजीच्या दुराग्रहामुळें त्याचें कांहीं चाललें नाहीं. त्यानंतर राजाराम गादीवर बसला. त्यांनें इ.स. १६९१ मध्यें संताजी घोरपडे यास सेनापतीचें पद दिलें.
संताजीस दोन बायका होत्या व प्रत्येकीस एकेक पुत्र झाला होता. थोरला राणोजी व धाकटा पिराजी. शिवाय संताजीचा मानलेला मुलगा नारोपंत (इचलकंजीकर) हा तिसरा पुत्र होय.
संताजीस दोन बायका होत्या व प्रत्येकीस एकेक पुत्र झाला होता. थोरला राणोजी व धाकटा पिराजी. शिवाय संताजीचा मानलेला मुलगा नारोपंत (इचलकंजीकर) हा तिसरा पुत्र होय.
संताजीबरोबर नारोपंत प्रत्येक स्वारींत हजर रहात असल्यामुळें त्यास लष्करी कामाचा अनुभव येत चालला. सेनापती झाल्यापासून संताजीच्या अचाट पराक्रमांची परंपरा सुरू झाली. तो काळ विलक्षण धामधुमीचा होता. त्यामुळें आपल्या अंगचा पराक्रम व कर्तृत्व प्रकट करण्यास त्यास ती उत्तम संधि सांपडली. नारोपंतावर संताजीचा पूर्ण विश्वास असल्यामुळें आपल्या दौलतीचा सर्व कारभार त्यानें त्याजकडे सोंपविला. राजारामाच्या कारकीर्दीत महाराष्ट्राचें स्वातंत्र्य राखण्याकरितां संताजीनें जे असाधारण पराक्रम केले आहेत, त्यांच्या योगानें त्याचें नांव इतिहासांत अजरामर झालें आहे.
सन १६९० त मोंगलांच्या फौजा महाराष्ट्रांतील किल्ल्यांस वेढा घालून बसूं लागल्या. कित्येक किल्ले त्यांनीं काबीजहि केले. त्यापुढें आपला निभाव लागत नाहीसें पाहून राजाराम गुप्तपणें चंदीचंदावरास गेले. त्याबरोबर जे मुत्सद्दी व सरदार गेले त्यांत संताजीहि होता. हा प्रवास फारच धोक्याचा होता व त्यांत एका प्रसंगीं महाराजांचा जीव बचावण्याकरितां संताजीचा बंधु मालोजी यांस आपल्या प्राणाची आहुति द्यावी लागली. चंदोस गेल्यावर राजारामानें संताजीस सेनापतीचें पद, जरीपटका व नौबत दिली. आणि “हिंदुराव ममल कतमदार” असा किताबहि दिला. संताजी वगैरे त्रिवर्ग बंधूच्या घराण्यांत यावेळीं तीन निरनिराळे किताब मिळाले. संताजीच्या घराण्याकडे “ममलकतमदार”, बहिरजीच्या घराण्याकडे हिंदुराव व मालोजीच्या घराण्याकडे “अमीर उल् उमराव” असे हे किताब असून ते अद्यापि चालत आहेत.

सन १६९१ च्या प्रारंभी संताजी व धनाजी जाधव परत महाराष्ट्राकडे येऊन रामचंद्रपंत हुकमतपन्हा यांस मिळाले. त्यांच्या मदतीस संताजींनें कर्नाटकांत जातांना कांहीं फौजेसह नारोपंतांस ठेविलें होतें मोंगलांवर स्वा-या करण्याकरितां फौजेची नवीन जमवाजमव केली. संताजी व बहिरजी व विठोजी चव्हाण हिंमतबहाद्दर यांनीं खुद्द अवरंगझेबाच्या फौजेवर छापा घालून त्याच्या डे-याच्या तणावा तोडून सोन्याचे कळस काढून आणिले.
No comments:
Post a Comment