विनोद जाधव एक संग्राहक

Tuesday, 14 May 2019

पुण्यश्लोक 'राजा राम' भाग 2

पुण्यश्लोक 'राजा राम'
 भाग 2

येसूबाई साहेबांच्या चरणांवर मस्तक ठेऊन राजाराम महाराजांनी त्यांचा निरोप घेतला.
येसूबाईंनी राजाराम महाराजांच्या मस्तकी हात ठेऊन आशीर्वाद दिला कि, " यशस्वी व्हावे. गेले राज्य मिळवावे, श्रमी ( म्हणजे दुःखी ) होऊ नये."
राजाराम महाराजांनी आपले पाणवलेले डोळे पुसले व छोट्या शिवाजीला पोटाशी धरून म्हणाले, " पुन्हा भेट होईल तो सुदिन.."
पुढे दैव प्रारब्धाने रायगड मुगलांच्या हाती पडला.
संभाजी महाराजांच्या हत्येनंतर औरंगजेबाने संभाजी महाराजांचा मुलगा दुसरे शिवाजी उर्फ शाहू आणि संभाजी महाराजांची पत्नी येसूबाई साहेबांस आणी इतर काही मंडळींस कैद करून आपल्या बरोबर नेले.
संभाजी महाराजांच्या हत्येनंतर वयाच्या १९ व्या वर्षी स्वराज्याचा राज्यकारभार राजाराम महाराजांच्याकडे आला.
त्यानंतर दक्षिणेत जाऊन आता राजाराम महाराज मुघलांशी आणी इतर शत्रूंशी मुकाबला करून राज्य करू लागले.
राजाराम महाराजांनी 12 वर्ष राज्य केले.
हा झाला ह्या लेखाचा पूर्वार्ध.
आता आपण उत्तरार्ध पाहू.
आता लेख सुरु.
सिंहगडावर असताना राजाराम महाराज यांस नवज्वर झाला. त्यांना सारख्या रक्ताच्या उलट्या होत होत्या.
शेवटी २ मार्च १७०० रोजी राजाराम महाराज सिंहगडावर निधन पावले.
( आमचे परम मित्र डॉक्टर चेतन चौधरी, अहमदनगर यांच्या कडील माहितीनुसार; ज्वर म्हणजे ताप आणि विषमज्वर म्हणजे टायफॉइड. जठरामधे (stomach) व अन्ननलिकेत (oesophagus) जखम असेल (ulcer) किंवा सततच्या उलट्यांमुळे या ठिकाणची रक्तवाहिनी फुटली असेल तर रक्ताच्या उलट्या (haematemesis) होतात.
हि एक मेडीकल इमरजेंसी आहे. एन्डोस्कोपी करुन आजाराचे निदान करावे लागते. )
निधनासमई राजाराम महाराजांचे वय फक्त ३० वर्ष होते.
ह्या शेवटच्या क्षणी रामचंद्रपंत अमात्य हे राजाराम महाराजांच्या जवळ होते.
ह्या वेळी राजाराम महाराज रामचंद्रपंत अमात्यांस म्हणाले, "..तुम्ही थोरले महाराजांपासून राज्याचे साधनास श्रम साहस करीत आला व करीत आहात. एक एक प्रतिसृष्टी करणार आहात.
आमचा तो काळ समीप आला.
त्याच्या मागे ( म्हणजे संभाजी पुत्र शाहू) सर्वत्र मिळोन हल्ली करीत तसे करावे. आम्ही गेलो म्हणोन श्रमास अंतर न करिता शिवाजी महाराज सुटोन येत ते करावे.
(शिवाजी महाराज म्हणजे शाहू महाराज पहिले. संभाजी राजांचे चिरंजीव. हे ह्या वेळी औरंगजेबाच्या कैदेत होते.)
त्यांचे ठाई लक्ष ठेऊन करणे. म्हणजे त्यांस यश येईल. हे तुम्हास ठावेच आहे. त्यापेक्षा फार काय सांगू? "
हे राजाराम महाराजांचे शेवटचे शब्द..
मृत्यूसमयी राजाराम महाराजांचे आपला पुतण्या असलेल्या शाहू महाराजांवर किती नितांत प्रेम होते हे वरील वाक्यांवरून व्यतीत होते.
रामायणातील भरताचे वर्णन करताना राम सीतेला सांगतो, " ... पित्याने अयोध्येचे राज्य मला अर्पण केलेले होते. परंतु माझ्या भाग्यात आत्ता राज्य नाही.
माझ्या पश्चात बंधू भरत यास राज्य आणि राजलक्ष्मी हस्तगत झालेली असताना 'राज्याचा खरा राजा हा राम आहे' हे पाहून
बंधू भरत हा राज्याच्या उपभोगापासून अलिप्त राहिला. असा प्रिय बंधू होणे नाही. सीते तो हाच माझा भाऊ भरत होय."

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...