विनोद जाधव एक संग्राहक

Tuesday, 14 May 2019

पुण्यश्लोक 'राजा राम' भाग 3

पुण्यश्लोक 'राजा राम' 

 भाग 3

 

राजाराम महाराजांनी स्वतःस राज्याभिषेक करून घेतला नाही. त्यांनी राजचिन्हेही धारण केली नाही. त्यांनी राज्यलक्ष्मीचा उपभोगही घेतला नाही.
औरंगजेबाच्या कैदेत असलेल्या बाळ शाहू महाराजांचा केवळ प्रतिनिधी समजून राजाराम महाराजांनी एक तप मराठ्यांचे राज्य सांभाळले.
ह्यावेळी संभाजी राजांचा औरंगजेबाने शिरच्छेद केला होता. संभाजी महाराजांची पत्नी येसूबाई साहेब आणि एकुलता एक पुत्र शाहू कि जो ह्या राज्याचा प्रमुख दावेदार होता तोच औरंगजेबाने पकडून नेला होता.
नियतीने मराठ्यांचे राज्य आता राजाराम महाराजांच्या पदरात घातले होते. परंतु अश्या स्थितीत राजाराम महाराजांनी रामायणातील रामचंद्राप्रमाणे मिळत असलेले राज्य; वारसाला चिकटून असलेल्या कुसळाप्रमाणे झटकून टाकले.
"राज्य येन पटांतलग्नतृणवत्यक्त गुरोराज्ञाया" म्हणजे राजा म्हणून नव्हे तर दूर असलेल्या राजाचा प्रतिनिधी म्हणून राजाराम महाराजांनी राज्याचा सांभाळ केला.
राजाराम महाराजांचे हे उदात्त चरित्र पाहिले म्हणजे चौदा वर्ष नंदीग्रामी राहून रामचंद्रांच्या पादुकांची पूजा करीत त्यांचे राज्य निक्षेप म्हणून सांभाळणाऱ्या वैराग्यमूर्ती असलेल्या 'भरत' याची आठवण आल्याशिवाय राहत नाही.
दादाजी नरस प्रभूचे वतन परत करावे असे शंकराजी नारायणाला सांगताना राजाराम महाराज लिहितात, ".. कारण चिरंजीव राजश्री ( म्हणजे संभाजीराजे पुत्र शिवाजी उर्फ शाहू ) काले करून तरी श्री देशी आणील... ते ( शाहू) मुख्य सर्व राज्यास अधिकारी.
आम्ही करितो तरी ते त्यांच्यासाठीच आहे. प्रसंगास सर्व लोकांस तिकडेच पाहणे येईल व वागतील हे करणे ईश्वरीच नेमिले आहे."
वरील वाक्यांतील राजाराम महाराजांचा निस्वार्थ भाव पहा. किती हि आपल्या पुतण्याच्या म्हणजे शाहू राजांच्या ठायी असलेले नितांत प्रेम आणि माया.
कसे वर्णावे हे प्रेम आणी निष्ठा?

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...