मराठेशाहीतील घोरपडे घराणी भाग 32
एक महान सरसेनापती.
सं ता जी घो र प डे.-------------1
महाराजांना एका पेक्षा एक असे सेनापती लाभले तीच परंपरा पुढे शंभुराजांच्या कालात हंबिराव मोहिते यांनी चालू ठेवली. शंभुराजांना आणि कवी कलाशंना संगमेश्वरी शेख निजाम यानि पकडले आणि त्याच वेळेस म्हालोजी घोरपडे मारले गेले. या नंतर मोग्लांनी रायगड घेतला आणि जणू मराठ्यांचे हे राज्य (महाराजांचे दिव्य स्वप्नच) नष्ट होते काय अशी परिस्तिथि निर्माण झाली. पण याच वेळेस महाराजांच्या आणि शंभु राजांच्या तल्मित तयार झालेले काही रणझुंझार पुढे सरसावले आणि याच मराठी भूमीत त्या मस्ताव्लेल्या मोघल बादशाहला गाढ़ला. या योध्यात एक आघाडिचा वीर म्हणजे "सरसेनापती संताजी घोरपडे". मराठ्यांचा इतिहास सेनापती संताजी घोरपडे यांचे नाव न घेता पूर्ण होउच शकत नाही.
भोसले आणि घोरपडे घराणे हे एकाच वृक्षाच्या दोन शाखा. मुळ पुरुष सुजनसिंह हा उदयपुरच्या राजघराण्यातील होता. दक्षिणेत आल्यावर यानी हसन गंगूची सत्ता मजबूत करण्यासाठी पुष्कल मेहनत घेतली. याच सुजनसिंहच्या पणतूस (भैरवसिंह) मुधोल ची ८४ गावांची जहागीर प्राप्त झाली. भैरवसिंह यांस "भुशल धारी" असे संभोदले आहे. भुशल धारी म्हणजेच "भूतलावरिल शस्त्रधारी" म्हणजेच "क्षत्रिय योद्धा". पुढे कालांतराने भुशलचे भुशाल, भुसाल, भोसाल, भोसल, भोसला, भोसले असे हो़त गेले. मालिक उत्तुजरास खेळणा किल्ल्याच्या पायथ्याच्या जंगलात शिर्के आणि शंकरराव मोरे यांच्या फौजांनी हरवले. पण १४६९ साली मंहमद गवान याने कोकणची मोहिम हाती घेतली. यात त्याला भैरवसिंहचा पणतू कर्णसिंह आणि या कर्णसिंहचा पुत्र भीमसिंह यांची मोलाची साथ लाभली. जे सुलतानी फौजेला जमले नाही ते या पितापुत्र जोड़ीने केले. त्यांनी खेळणा किल्ला घोरपडीच्या साह्याने सर केला आणि हा दुर्गम किल्ला बहमनी सुलतानास बहाल केला. या युद्धात कर्णसिंह मारला गेला. तर भीमसिंहंस "राजा घोरपडे बहाद्दर" हा किताब बहाल करण्यात आला त्याच बरोबर घोरपडीच्या रंगाचे निशाण सुद्धा देण्यात आले. (संदर्भ- मुधोल घोरपडे घराण्याचा इतिहास) पुढे भीमसिंहचे वंशज घोरपडे बहाद्दर हे पद नावा नंतर लाऊ लागले. बाहमनी अस्तानंतर दक्षिणेत पाच शह्या निर्माण झाल्या. घोरपडे हे आदिलशाहशी एकनिष्ट राहिले याचे कारण बहुतेक त्यांची जहागीर ही आदिलशाहच्या प्रांतात ये़त असावी म्हणुन. चोलराजा हा घोरपडे घराण्याचा वंशज. चोलाराजचा मोठा मुलगा पिलाजी घोरपडे (बजी घोरपडे यांचे आजोबा) हा मुधोल ची जहागीर संभालून होता तर त्याचा दूसरा पुत्र वल्लभजी यांस वाई प्रांतातल्या पाटिलक्या देण्यात आल्या होत्या. याच वल्लभजीचा नातू म्हणजे "म्हालोजी घोरपडे" ज्यांना संगमेश्वरी वीर मरण प्राप्त झाले. आणि याच वल्लभजीचा पणतू म्हणजे सरसेनापती संताजी घोरपडे, ज्यांनी स्वराज्य रक्षणात मोलाची कामगिरी बजावली. (sources- डॉ.जयसिंह पवार)
No comments:
Post a Comment