विनोद जाधव एक संग्राहक

Wednesday, 29 May 2019

मराठेशाहीतील घोरपडे घराणी भाग 31




मराठेशाहीतील घोरपडे घराणी भाग 31

घो र प डे का प शी क र - सं ता जी घो र प डे. -  ------------------------------7

पराक्रमी सेनापती "संताजी घोरपडे" यांच्या लष्करातील वेगळेपणा
संताजी घोरपडे यांच्या भारतातील पारंपारीक सैन्यातच बदल केला,पूर्वी पासून चालत आलेली परंपरा अशी होती की सेनापती वा सेनानी पुढचा त्यांच्या मागे दुय्यम आधीकारी वा मागे सैन्य असे.
जुन्या पध्दतीमध्ये आपला पुढील सेनानी अथवा सेनापती ठार झाला की मागील सैन्याचे मनोबल खचत असे परीणामी सैन्य असूनही पळून जावे लागत किंवा जात,सैन्यामध्ये पुढीरी ठार झाल्यामुळे गडबड माजे गोंधळ होइ.
पण संताजी घोरपडे यांनी आपल्या फौजेत पुढे सैन्य व मागे सेनानी असे करत त्यामुळे त्यांच्या कोणत्याही लढाईमध्ये एकही सेनानी कधीही कैद अथवा ठारही झाला नाहीं,त्यामुळे त्यांच्या फौजेत गोंधळ होणे असे प्रकार झाले नाहीत.
एक ध्यानात घ्या ही गोष्ट संताजी ह्यांनी काढली नाहीं तर खुद्द " छत्रपती शिवाजी महाराजांनी" काढली होती अश्या पध्दतीने लढाई करण्याचे श्रेय "छत्रपती शिवाजी महाराजांन" कडे आहे संताजी ह्यांनी हीच सैन्य पध्दत कठोर नियम म्हणून पाळली.
ही रचना शिवाजी महाराजांन पासून पहिले बाजीराव पेशवे यांच्या पर्यंत पाळली गेली पण नंतर मराठ्यांना ह्या गोष्टीचा विसर पडला त्यामुळे पानिपतावर हार पत्करावी लागली पण ह्याच पध्दतीचा ईंग्रजांनी पुरेपूर फायदा करून लढाया केल्या व लष्करात अशी सैन्य पध्दत सक्त नियम केला त्यामुळे भारतीय हारत गेले...

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...