मराठेशाहीतील घोरपडे घराणी भाग 44
सेनापति कापशीकर नवन्याळकर घोरपडे-----------------3
सेनापति कापशीकर नवन्याळकर घोरपडे-----------------3
तर अशातर्हेने सरसेनापती संताजीराव घोरपडे ( पहिले ) हे कापशीकर घोरपडे घराण्यातील पहिले ‘ चिफ ऑफ कापशी ‘ बनले …. सरसेनापती संताजीराव घोरपडे यांना दोन पुत्ररत्न होते … सरसेनापती संताजीरावांचे दोन विवाह झालेले होते …. त्या दोन्ही पत्नीला प्रत्येकी एक मुलगा होता …. पहिल्या पत्नीच्या मुलाचे नाव होते राणोजीराजे आणी दुसऱ्या पत्नीच्या मुलाचे नाव होते पिराजीराव …
या दोन मुलांच्या खेरीज संताजी घोरपडे यांचा एक मानसपुत्र होता … त्याचे नाव होते नारायण महादेव उर्फ नारोपंत जोशी … हेइचलकरंजीकर घोरपडे .. कापशीकर घोरपडे घराण्याच्या किताबांपैकी ‘ममलकतमदार’ व मानमरातबापैकीं जरीपटका व नौबतीचा मान संताजीरावांना मानलेले पुत्र या नात्याने बाळगण्याविषयीं नारोपंतांना मिळाले … इचलकरंजीकरांच्या घराण्यांत हा किताब व बहुमान अद्यापपर्यंत चालू आहे….
त्यानंतर संताजींचे थोरले पुत्र राणोजीराजे यांचे युध्दात निधन झाले … राणोजीराजे यांच्या विधवा पत्नी संतुबाई या वयाने लहान आणी संताजींचे धाकटे पुत्र पिराजीराव हे त्यांच्यापेक्षाही लहान …. हे पिराजीराव संताजीराव घोरपडे हे कापशीकर घोरपडे घराण्याचे दुसरे ‘ चिफ ऑफ कापशी ‘ बनले … सन 1728 मध्ये दुसरे चिफ ऑफ कापशी सेनापती पिराजीराव संताजीराव घोरपडे हलकर्णी येथे युद्धात मृत्यूमुखी पडले
No comments:
Post a Comment