झांशीच्या मराठा साम्राज्याचा इतिहास
भाग 6
हें समजल्यावर मालकमनें गव्हर्नर जनरलास दत्तक बाबतींत एक पत्र लिहिलें (२५ नोव्हेंबर); त्यांत त्यानें ‘इंग्रज सरकारनें दत्तक कबूल करूं नये’ असा स्पष्ट मजकूर लिहिला. मात्र राणीच्या शानशौकतीकरितां दरमहा पांच हजारांची नेमणूक करून सर्व संस्थान लवकर खालसा करावें असा सल्ला दिला. याप्रमाणें पत्र लिहून मलकमनें झांशीस ८।१० पलटणी बंदोबस्तासाठीं आणून ठेवल्याहि. यावेळीं सातारा, नागपूर, तंजावर हीं संस्थानें बिनवारशीं म्हणून खालसा करणारा डलहौसी हा गर्व्हनरजनरल होता. त्यानें ही संधि वाया जाऊं दिली नाहीं व वंशपरंपरागत राज्य चालवूं हें तहांतील कलम फेंटाळून लाविलें. हें कलम पुढीलप्रमाणें होतें. “इंग्रजसरकारचा अंमल बुंदेलखंडांत सुरू झाला त्यावेळीं कै. शिवरावभाऊ यांच्या ताब्यांत असलेल्या व सध्यां झांशीसरकारच्या ताब्यांत असेलल्या... सर्व प्रांतांचे राव रामचंद्र यांस, त्यांच्या वारसदारांस व त्या वारसदारांच्या जागीं संस्थापित होणारांस, इंग्रजसरकार वंश परंपरागत मालक नेमून, ते त्या प्रांतांचे संस्थानिक आहेत असें कबू करीत आहे.” यावेळीं राणीनेंहि शिवरावभाऊंनीं इंग्रजांवर केलेल्या उपकाराची आठवण देऊन त्यांनीं दत्तक मंजूर करावा म्हणून (व त्याच वेळीं दतियाचा राजा, ओरछाचा राजा व जालवणाचा जहागीरदार या तिघांनीं घेतलेले दत्तक इंग्रजांनीं मान्य केल्याची आठवण देऊन) एक खलिता डलहौसी यास पाठविला. परंतु त्याच्याहि कांहीं उपयोग झाला नाहीं. एलिस यानें सुद्धां दत्तक कबूल करावा म्हणून डलहौसीस पत्र लिहिलें होतें; परंतु मालकमनें तें आपल्यापाशींच दडपून ठेविलें. शेवटीं डलहौसीनें पुढील ठराव केला- “इंग्रजसरकारच्या संमतीशिवाय ज्यांनां दत्तक घेतां येत नाहीं, असल्या मांडलिक संस्थानिकांनां दत्तकाची परवानगी देण्यास अथवा दत्तकास मान्यता देण्यास साक्षात् आम्हीं कोणत्याहि वचनानें बांधलेलों नाहीं आणि त्यांच्या जहागिरी औरस संततीच्या अभावीं परत घेण्याचा आम्हांस हक्क आहे. झांशी संस्थान स्वतंत्र नसून आमच मांडलिक आहे व त्या संस्थानास आमच्या परवानगीशिवाय दत्तक घेतां येत नसल्यामुळें आणि हल्लीं तेथें औरस संतति नसल्यानें सार्वभौम या नात्यानें आम्ही तें परत घेतो.” याप्रमाणें झांशी संस्थान डलहौसीनें पूर्वींच्या वचनास हरताळ फांसून कुटिल नीतीनें गिळंकृत केलें (२७ फेब्रुवारी १८५४).

No comments:
Post a Comment