झांशीच्या मराठा साम्राज्याचा इतिहास
भाग ५
गंगाधररावांनीं सर्व लहानमोठ्या कामांवर योग्य माणसें नेमून राज्यव्यवस्था उत्तम ठेविली आणि (ठाकूर व बुंदेले) बंडखोरांचा चांगला बंदोबस्त करून रयतेस सुख दिलें. यांच्या कारकीर्दींत संस्थानांत शिल्लकहि पुष्कळ पडली त्यांच्या जवळ ५ हजार घोडदळ व २ हजार गोल पोलीस (पायदळ) असून चार तोफखाने होते. गंगाधरराव दयाळु पण अतिशय कडक स्वभावाचे व शिस्तीचे होते. बुंदेले राजांवर त्यांचें फार वजन असे व ते यानां काका म्हणत. एकदां दसरा रविवारीं पडला, तेव्हां शिलंगणास झांशीचा इंग्रज रेसिडेंट येईना; त्यावर गंगाधररावानीं त्यास सणसणीत निरोप पाठविला कीं, “माझे मुलाजमकी तनखेबद्दल मुलूख दिला, तेव्हां ठरावाप्रमाणें फौजेसह यावें, नाहीं पेक्षां आजचे मुहुर्तावर मुलुखावर जप्ती पाठवितों,” तेव्हां रेसिडेंट गुपचुप येऊन स्वरींत सामील झाला. गंगाधरराव हे काशीयात्रेस गेले होते (१८५०). त्यावेळीं येथील इंग्रज अधिकारी त्यांस सामोरा आला नाहीं, त्यावरून त्यांनीं कलकत्त्यास लिहून त्याला माफी मागावयास व नौकरीचा राजीनामा द्यावयास लाविलें. या यात्रेंत बरोबर लक्ष्मीबाई होत्या. थोड्या दिवसांनीं (१८५१) राणीला पुत्र झाला; परंतु तो तीन महिन्यांनीं मृत्यु पावला. त्यामुळें गंगाधररावास धक्का बसून त्यांची प्रकृति खालावली. अनेक औषधोपचार केले, राणीनें उपोषणेंहि केलीं; परंतु उपयोग होईना. अखेर प्रकृति फार ढांसळल्यानें गंगाधररावांनीं व राणीनें नेवाळकरांच्या घराण्यांतील एक मुलगा (आनंदराव) दत्तक घेण्याचें ठरविलें व बुंदेलखंडाचा नायब पोलिटिकल एजंट एलीस व लष्करी अधिकारी मार्टिन यांच्या देखत यथाशास्त्र दत्तविधान करून मुलाचें नांव दामोदरराव ठेविलें (१८५३ नोव्हेंबर). या प्रसंगीं गंगाधररावांनीं इंग्रजास एक खलिता लिहिला, व त्यांत इंग्रजांशीं झालेल्या (१८१७) सालच्या) तहांतील दुसर्या कलमाप्राणें आपण घेतलेल्या दत्तकास कबुली देण्यास कळविलें. या प्रसंगी एलीस व मार्टिन हे हजर होते व त्यांनीं आपण या कामीं खटपट करूं असें कबूल केलें. वरीलप्रमाणेंच दुसरा एक खलिता बुंदेलखंडाचा पो. एंजट मालकम याच्याकडे पाठविला; एलीस यानेंहि मालकम यांस एकंदर हकीकतीचें पत्र लिहिलें. त्यानंतर गंगाधरराव हे २१ नोव्हेंबर रोजी वारले.

No comments:
Post a Comment