विनोद जाधव एक संग्राहक

Tuesday, 14 May 2019

पुण्यश्लोक 'राजा राम' भाग 8

पुण्यश्लोक 'राजा राम'
 भाग  8


दुःखी उध्वस्त औरंगजेब.
राजाराम छत्रपतींच्या निधनांनंतरही त्यांची पत्नी ताराराणी छत्रपती साहेबांच्या पायी इमान ठेऊन मराठे एकामागून एक सुरुंग औरंगजेबाच्या स्वप्नांना लावत होते.
औरंगजेबाच्या दुःखाला औरंगजेबच जबाबदार होता. दुसरे कोणीही नाही.
राजाराम महाराजांचा मृत्यू झाला म्हणून मराठ्यांचा अंत झाला नाही. ते अमरच होते.
शिवाजी राजे, संभाजी राजे, राजाराम महाराज हि मराठ्यांची हृदयस्थानी चिरंतर प्रज्वलीत झालेली प्रेरणा होती. त्यांच्या रूपाने अवघे मराठे औरंगजेबाशी लढत होते.
ह्याच शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्र मातीत पापी औरंग्यास मराठ्यांचे राज्य न जिंकताच रिकाम्या हाती 'मरावे लागले' ह्या सारखे दुसरे दुःख औरंगजेबाच्या आत्म्यास झाले नसावे.
महाराष्ट्र धर्मचे लेखक सतीश शिवाजीराव कदम यांच्या अभ्यासानुसार;
कार्यधुरंधर व्यक्तीचा मृत्यू झाला तरी राष्ट्र मरत नसते.
विस्तवावर फुंकर घातली म्हणून अग्नी विझत नसतो.
आरसा फुटला म्हणून तेजस्वी प्रतिबिंब नष्ट होत नसते.
नदीच्या पात्रात जलबिंदू उठतात आणि विरतात. पण अमरत्वाचे प्रतीक असलेली ती 'सरिता' म्हणजे नदी अखंड वाहतच असते.
राष्ट्र हे धगधगनारा अग्नी आहे.
राष्ट्र हे तेजस्वी प्रतिबिंब आहे.
राष्ट्र ही अखंड वाहणारी 'सरिता' आहे.
कुटील बुद्धीच्या औरंगजेबाला शेवटपर्यंत हे समजलेच नाही कि मराठा ही जमात नव्हती, ती झुंड नव्हती, ती लुटारूंची टोळी नव्हती,
..ते मराठ्यांचे 'महा राष्ट्र' होते.
तो मराठ्यांचा 'महाराष्ट्र धर्म' होता..
लेख समाप्त.
लेख कसा वाटला?
कमेंटमध्ये कळवा आणि मित्रमंडळींस महाराष्ट्रधर्म वर इन्व्हाईट करा. आणि हो; लेख भरपूर शेअर करा.
कारण वाचाल तर वाचाल.
श्री भवानी शंकर चरणी तत्पर
सतीश शिवाजीराव कदम
निरंतर

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...