विनोद जाधव एक संग्राहक

Tuesday, 14 May 2019

पुण्यश्लोक 'राजा राम' भाग 7

पुण्यश्लोक 'राजा राम'
 भाग  7

राजाराम महाराजांचे पागोटे हृदयाशी धरून अंबिकाबाई विशाळगडावर सती गेल्या.
आता महत्वाचे:
राजाराम महाराजांच्या मृत्यूची बातमी औरंगजेबाच्या कैदेत असलेल्या शाहू महाराजांना कळली तेंव्हा त्यांना, येसूबाई साहेबांना आणी राजारामांच्या पत्नी अंबिकाबाई साहेबांस अनिवार दुःख झाले.
अकरा वर्षांपूर्वी रायगडावरून जिंजीकडे जाताना राजाराम महाराजांनी बाळ शाहूंस पोटाशी धरून, " पुन्हा भेट होईल तो सुदिन.." असे म्हणून निरोप घेतला होता.
तो सुदिन दिवस राजाराम महाराजांच्या हयातीत काही आला नाही.
महाराष्ट्र धर्मचे लेखक सतीश शिवाजीराव कदम यांच्या अभ्यासानुसार;
आपणास राजाराम महाराज काहीही करून औरंगजेबाच्या कैदेतून सोडवून नेईल अशी बाळ शाहू राजांस मोठी आशा होती.
पण दैवाच्या प्रतिकूलतेमुळे ती उध्वस्त झाली.
स्वतः औरंगजेबाला मात्र राजाराम महाराजांच्या मृत्यूची बातमी ऐकून पराकाष्ठेचा आनंद झाला आणि त्याने सुटकेचा निश्वास टाकला. संभाजी राजांप्रमाणे ह्या राजाराम महाराजांनीही औरंगजेबास फारच छळले होते.
औरंगजेबाच्या दरबारी असलेला खाफीखान म्हणतो, " परमेश्वराच्या लेकरांना त्या काफरांकडून पीडा होत होती. ( म्हणजे मराठ्यांकडून)
ती आता दूर झाली म्हणून बादशहाने परमेश्वराचे आभार मानले आणि शहादणे वाजविण्याची आज्ञा केली.
राजारामाच्या मृत्यूची ही आनंदवार्ता मोगल लष्करात पसरली. बादशहाचे हितचिंतक आणि एकनिष्ठ सेवक यांनी बादशहाचे अभिनंदन केले. परस्परांना ते मुबारक म्हणू लागले. संभाजीराजा कैद होऊन वध पावला त्यावेळी राजाराम महाराजांच्या अस्तित्वाचे त्यांना महत्व वाटले नाही. त्या वेळी ते म्हणत कि 'बरे झाले. दक्षिणेतून युद्धाचे मूळ (संभाजीराजे) नाहीसे झाले.'
आताही राजारामाच्या मृत्यूनंतर ते असेच म्हणून आपल्या मनाचे समाधान करून घेऊ लागले. ते एकमताने म्हणू लागले, "या दुष्ट मराठ्यांची पाळेमुळे नाहीशी झाली. त्याच्या ( म्हणजे राजाराम महाराजांच्या ) मागे त्याची लहान मुले आणि निराधार बायका राहिल्या आहेत. त्यांचा निकाल लावणे म्हणजे अगदी सोपे आणि शुल्लक आहे."

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...