विनोद जाधव एक संग्राहक

Sunday, 5 May 2019

झांशीच्या मराठा साम्राज्याचा इतिहास भाग १

झांशीच्या मराठा साम्राज्याचा इतिहास
भाग १
शिवपूर्व काळात झाशी हे बुंदेलखंडात येत होते .आणि त्या बुंदेलखंडात रघुनाथ हरी नेवालकर या मराठा योध्याने मराठा साम्राज्य निमार्ण केले चला मग पाहू या इतिहास झाशी येथील मराठा साम्राज्याचा
नेवाळकरांचे मूळ पुरुष रघुनाथराव हे कोंकणांत कोट (राजापुर तालुका) या गांवचे राहणारे, अष्टाधिकारी वृत्तिवंत होते. पेशवाईच्या आरंभास ते खानदेशांत बहादुरपूर (साक्री तालुका) येथें येऊन राहिले. त्यांस खंडेराव व दामोदर अशीं दोन मुलें होती. दामोदरास रघुनाथ, सदाशिव आणि इरि अशीं तीन मुलें झालीं. ह्यांनीं पेशवे व मल्हारराव होळकर यांच्या पदरीं राहून, खानदेशांतील चोरवड (चोपडे तालुका) परगणा व गुजराथेंतील अहमदाबाद प्रांतांतील कांहीं परगण्यांच्या मामलती करून लौकिक मिळविला; व होळकरांच्या फौजेंत सरदारीहि केली. यावेळीं त्यांस पारोळे (पूर्व खानदेशांतील) गांवची जहागीर मिळाली. रघुनाथपंत लढाईं मारला गेला. हरिपंताचा वडील मुलगा लक्ष्मण हा पारोळ्यास असे व खुद्द हरिपंत पेशव्यांच्या फौजेंत आपला दुसरा मुलगा रघुनाथ यासह सरदारी करीत. रधुनाथावर पेशव्यांची मर्जी असून, त्यांनीं त्याला झांशीकडील बंडाळी मोडण्यासाठीं वर सांगितल्याप्रमाणें तिकडील सुभेदारी दिली (१७७०). रघुनाथरावांनीं गोसाव्यांची फौज पदरीं बाळगून बुंदेलखंडांतील सर्व (३०-३२) संस्थानिकांस कह्यांत आणलें. बुंदेलखंडांतून सहा लक्ष रुपये खंडणी दरसाल रघुनाथराव वसूल करी. या सर्व कामांत त्याचे भाऊ लक्ष्मण राव व शिवराव यांचेहि मधून मधून साहाय्य मिळें. रघुनाथरावानें जलसमाधि घेतल्यावर शिवराव हा झांशीचा सुभेदार झाला

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...