विनोद जाधव एक संग्राहक

Sunday, 5 May 2019

झांशीच्या मराठा साम्राज्याचा इतिहास भाग २

झांशीच्या मराठा साम्राज्याचा इतिहास
भाग २
(१७९५). याच्या वेळेस पुण्यास रावबाजीची कारकीर्द सुरू होती. इंग्रजांनीं या सुमारास बुंदेलखंडावर चाल केली असतां, सर्व बुंदेल्या राजांनीं शिवरावाच्या पाठिंब्यामुळें त्याचा पराभव केला (शिवरावहि यावेळीं पेशव्यांचा नोकर न राहतां साधारपणें स्वतंत्रच बनला होता), त्यामुळें इंग्रजांनीं (१८ नोव्हेंबर १८०३त) त्याच्याशीं बजीबउल् अर्ज नांवाचा दोस्तीचा तह केला. व शिवरावाच्या साहाय्यानें इंग्रजांनीं बुंदेलखंडांत आपलें वर्चस्व स्थापिलें. पुढें (६ फेब्रुवारी १८०४) इंग्रजांनीं शिवरावभाऊशीं ९ कलमांचा पुन्हां मित्रत्वाचा तह केला. भाऊनें इंग्रजांस अनेकवार मदत केल्याबद्दलचे अनेक उल्लेख गव्हर्नर जनरल वेलस्ली याच्या डिस्पॅचेसमध्यें आहेत. याप्रमाणें १८ वर्षें कारभार करून, आपले नातु रामचंद्रराव यांजकडे कारभार सोंपवून भाऊनें रघुनाथरावाप्रमाणें ब्रह्मावर्त येथें जलसमाधि घेतली (१८१४). भाऊंना कृष्णाजी हा भाऊंच्या हयातींतच वारला (१८११). त्यामुळें त्याचा मुलगा रामचंद्रराव हा भाऊंच्या पश्चात गादीवर बसला. याच सुमारास (ता. १३ जून सन १८१७) पेशवे व इंग्रज यांच्यातींल तहान्वयें बुंदेलखंडावरचें स्वामित्व इंग्रजांनां मिळालें. त्यामुळें (१७ नोव्हेंबर १८१७) रामचंद्रराव व इंग्रज यांच्यांत पिप्री येथें तह झाला; त्यांत दुसर्‍या कलमांत इंग्रजांनीं झांशी संस्थान रामचंद्ररावाकडे पुढें वंशपरंपरा चालिवण्याचें कबूल केलें.

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...