छत्रपती
शिवाजी महाराजांचे पहिले मुख्य प्रधान अथवा पंतप्रधान शामराजपंत निळकंठ
पद्मनाभी उर्फ रांझेकर यांचा प्रधानपदाचा शिका. यांच्या मृत्यूनंतर काही
काळ प्रधानकी यांच्या पुत्राने, महादजी शामराज यांनी पाहिली. शिका
पुढीलप्रमाणे-
१) श्री शिवन
२) रपती हर्ष
३) निदान साम
४) राज मतिम
५) त प्रधान — at किल्ले राजगडचा दफ्तरखाना.
शिवरायांचा जन्म झाला त्यावेळी दक्षिणेमध्ये अत्यंत बिकट परिस्थिती निर्माण झालेली होती. इ. स. १६३० मध्ये दक्षिण भारतात एवढा प्रचंड दुष्काळ पडलेला होता की, या दुष्काळाच्या खाईत रयत अक्षरशः होरपळून निघत होती. गावेच्या गावे ओस पडली होती. अन्न काय पण पाणी मिळणेसुद्धा मुश्किल झाले होते. या विदारक दुष्काळाची वर्णने समकालीन लेखकांनी लिहून ठेवलेली आहेत. जनता हवालदिल झाली होती. दुष्काळाच्या संकटाला जोडूनच साथींच्या रोगांचा फैलाव सर्वदूर झाला. लोक मेटाकुटीला आले, अशी परिस्थिती असताना समकालीन राज्यकर्ते जनतेच्या प्रश्नांचा विचार न करता परस्परावर कुरघोडी करण्याच्या प्रयत्नात होते. त्यामुळे राजकीय अस्थिरताही निर्माण झाली होती.
इ. स. १६३० चे सुमारास निजामशाही अतिशय कमकुवत झाली होती. आदिलशाही दरबारात अंतस्थ कटकटी सुरु झाल्या होत्या. कुतुबशाही जरी आपले अस्तित्व टिकवून असली तरी मुघलांचा प्रभाव तेथेही वाढू लागला होता. अशा परिस्थितीत १६३६ मध्ये शहाजहानने दक्षिणेची स्वारी काढली. कुतुबशहाशी सख्य जुळवून आदिलशहाबरोबर तह करून निजामशाही विरुद्ध लढा उभारला. शहाजीराजांनी निजामशाही वाचविण्याचा निकराने प्रयत्न केला तथापि १६३६ च्या अखेरीस शहाजीराजांना शरणागती पत्करणे भाग पडले. शहाजहानने निजामशाही खालसा केली आणि तो प्रदेश मुघल व आदिलशहा यांच्यामध्ये वाटून देण्यात आला. शहाजीराजांनी आदिलशाहीची नोकरी पत्करली आणि ते कर्नाटकात निघून गेले. पुणे जहागीरीची देखरेख करण्यासाठी शहाजीराजांनी दादोजी कोंडदेव यांची नेमणूक केली. या जहागिरीमध्ये इंदापूर, सुपे, पुणे आणि चाकण हे परगणे मोडत होते. शहाजीराजे जरी कर्नाटकात गेले तरी जिजाबाई व बालशिवाजी यांचे वास्तव्य शिवनेरी किल्ल्यावरच होते. समकालीन साधनांवरून अशी माहिती मिळते की इ. स. १६४१ च्या सुमारास शिवाजीराजे आणि जिजाबाई बंगलोरला शहाजीराजांकडे गेले. बंगलोरहून परत येताना शहाजीराजांनी शामराज नीलकंठ यांची शिवाजीराजांचा पेशवा म्हणून नेमणूक केली. याशिवाय माणकोजी दहातोंडे, सरनोबत बाळकृष्णपंत दीक्षित यांना मुजुमदार म्हणून नेमले. शिवाय सोनोपंत डबीर आणि रघुनाथ बल्लाळ सबनीस यांनाही शिवाजीराजांच्या दिमतीस दिले. अशाप्रकारे हा सरंजाम घेऊन शिवाजीराजे जिजाबाई व दादोजीपंत पुण्यास परतले अशा आशयाची माहिती सभासदाने आपल्या बखरीत दिलेली आहे.
शहाजी राजे व त्यांची पत्नी राजमाता जिजाऊ मासाहेब ह्यांचे स्वप्न मुलाच्या हातून घडले आणि साकार हि जहाले .सोबती असलेली मंडळी म्हणजे - अमात्य , शामराज निळकंठ रांझेकर , बाळकृष्णपंत हनुमंते , सोनो विश्वनाथ रघुनाथ बल्लाळ , हे सारी सर्वात अगोदर ची स्वराज्याची हक्का ची माणसे होती . या मंडळी मधे वाढलेला शिवाजी राजे प्रत्येक गावाची तक्रार ऐकून घेई आणि वसाहत पुन्हा उभी रहावी यासाठी प्रोत्साहित करी . तिथून स्वताचा एक शब्द खाली न पडता हा राजा पराक्रमाचे बीज पेरू लागला आणि हे अलौकिक राज्य स्थापन केले .