छत्रपती शिवरायांचे शेतीविषयक धोरण
स्वराज्यातल्या रयतेच्या हिताची आणि जीविताची काळजी घेणारे धोरण अंमलात आणणारे छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वार्थाने लोककल्याणकारी राजे होते. त्यांच्या स्वराज्यात रयतेला त्रास देणार्यांचा बंदोबस्त झाला. रयत सुखी झाली. राजा आणि रयत यांच्यात मध्यस्थ राहिला नाही. छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेक सोहळ्याच्या दिनानिमित्त त्यांच्या कृषी धोरणाचा मागोवा. छत्रपती शिवाजी महाराजांचे कृषी धोरण शेतकर्यांच्या हिताचे कल्याण करणारे होते.
‘रयत सुखी तर राजा सुखी, शेतकरी सुखी तर राजा सुखी’ हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यकारभाराचे प्रधान सूत्र होते. हे स्वराज्य शेतकर्यांचे आहे. रयतेेचे आहे. ही त्यांच्या विचारांची खरी दृष्टी होती. त्यांच्या अनेक आज्ञा पत्रातून प्रशासनाच्या कार्यक्रमातून वेळोवेळी स्पष्ट झाले असल्यानेच आहे. म्हणूनच अनेक जागतिक इतिहासकारांनी त्यांचे वर्णन ‘रयतेचा राजा, शेतकर्यांचा राजा’ अशी इतिहासात सुवर्ण अक्षराने नोंद आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजवटीत स्वराज्यातील जमिनीची तीन वेळा मोजणी करण्यात आली.
प्रथम सन १६३६ मध्ये दादोजी कोंडदेवाच्या वेळी नतंर १६४९ मध्ये मोरोपंत पिंगळे यांनी आणि शेवटी शिवराज्याभिषेकानंतर सचिव अण्णाजी दत्तो यांनी १६७८ मध्ये स्वराज्यातील सर्व जमिनीची मोजणी करून जमिनीची प्रत ठरवून जमीन महसूल प्रत्येक गावचे जमिनीचे महसूल पत्रक तयार करून घेतले. बिघा, पाचर आदी शब्द शिवचरित्रामधील आजही वापरले जात आहेत. तसेच कोणत्या जमिनीत कोणते पीक घ्यावे त्याचे पत्रकही तयार केले, यालाच ‘पीक पाहणी’ असे म्हणतो. शिवकालापासून हा शब्द प्रचलित आहे. ब्रिटिश शासनाने या पध्दतीची नक्कल केलेली आहे.
शिवरायांनी प्रत्येक जमिनीचा प्रतवारीनुसार शेतसारा म्हणजे महसूल आकारला जात असे. स्वराज्यात शेतसारा दोन प्रकारे स्वीकारला जात असे. एक नख्त म्हणजे रोखीने आणि दुसरा प्रकार मालाच्या स्वरुपात. बागायती पिकांचा रोख तर खरीप पिकांचा शेतीमाल स्वरुपात स्वीकारला जात असे. शिवाजी महाराजांचे सारा वसूल करणार्या अधिकार्यास कुलकर्ण्यास म्हणजे आजच्या तलाठ्यास चोख व्यवहाराबाबत सक्त आदेश असत. पत्रकाप्रमाणे सारा वसूल करावा. जादा ही नाही आणि कमीही नाही. सरकारी महसूल सरकारी खजिन्यात वेळेत जमा करण्यात यावा.
चूक करणार्या अधिकार्यास तात्काळ शिक्षा केली जात असे. त्यामुळे सहसा चूक होण्याचा संभवच नसे. एकदा शिवाजीराजे घोड्यावरून प्रजेमधून जात असता एक शेतकरी राजांच्या घोड्याला आडवा येतो. राजे घोड्यावरून खाली उतरतात. नमस्कार करून शेतकरी म्हणतो महाराज साहेब आपल्या कुलकर्ण्याने माझ्या सार्याच्या रक्कमेतील राहिलेले साडेतीन होन परत केले नाहीत. शेतकऱ्याने सांगितल्याप्रमाणे महाराजांनी तत्काळ चौकशी केली. शेतकऱ्याचे खरे होते. कुलकर्ण्यां-कडून साडेतीन होन वसूल करून त्या शेतकऱ्यास तत्काळ परत केले आणि त्या सारा वसूल करणार्या तलाठ्यास तत्काळ बडतर्फ केले. असा होता शिवरायांचा रयत कल्याणाचा कायदा.
छत्रपती शिवाजी महाराजांनी शेतकर्यां संदर्भात अनेक प्रकारच्या योजना आणि सवलती राबवल्या होत्या त्या कोणत्या त्या पाहू. गावचा गाव फिरून तेथील शेतकरी जेवढे आहेत ते गोळा करावे कोणाकडे मनुष्यबळ आहे, बैल आहेत यांची कोणाकडे कशी व्यवस्था आहे याची विचारपूस करावी. ज्याच्याकडे शेत कसण्याची कूवत आहे, मनुष्यबळ आहे पण मशागतीस बैलजोड़ी नाही, बी – बियाणे नाहीत त्याला दोनचार बैल देण्यास रोख रक्कम द्यावी किंवा सरकारातून बैल आणि बी – बियाणे द्यावेत. शेतकर्यास सरकारातून दिलेले कर्ज वाढीव पद्धतीने वसूल न करता त्याच्या शेतीचे उत्पन्न तयार झाल्यावर त्याच्या कुवतीनुसार हप्त्याने वसुल करावे. नवीन शेतकर्यास सोईसवलती देऊन पडिक जमीन लागवडीखाली आणावी त्यासाठी सरकारने रक्कम मंजूर करावी.
छत्रपती शिवाजी महाराज प्रभावळी मामल्याच्या सुभेदार रामजी अनंत याला ५ सप्टेंबर १६७६ ला पाठवलेल्या पत्रात म्हणतात. – ” इमाने इतबारे स्वामीकार्य करावं अशी तू शपथ वाहिली आहेस, त्यानुसार भाजीच्या एका देठावरही मन न दाखविता रास्तपणे व योग्यपणे वागावे. रयतेचा वाटा रयतेला मिळेल आणि महसूल आपल्याला येईल ते करावे. रयतेवर काडीचाही जुलूम झाल्यास आम्ही तुझ्यावर राजी नाही हे नीट समजावे ”
” ज्या गावी जातील तेथील सर्व कुणबी गोळा करावे. बैल, नांगर आणि पोटाकरिता धान्य नसल्यामुळं जो अडून निकामी झाला असेल त्याला दोन चार बैलांकरिता रोकड हाती देऊन आणि पोटाकरिता दोनचार खंडी धान्य द्यावे. त्याच्याने शेत करवेल ते करवून घ्यावे, नंतर बैलाचे व धान्याची रोकड वाढीदिडी न करता फक्त मुद्दलच हळूहळू त्याच्या ऐपती प्रमाणं वसूल करावी “
छत्रपतींच्या अशा अनेक पत्रातून त्यांचे शेती आणि शेतकऱ्यांविषयीचे विचार स्पष्ट दिसतात. त्यामुळं समर्थ रामदारांनी छ. शिवाजी महाराजांसाठी वापरलेली जाणता राजा ही उपाधी किती सार्थ आहे याचा प्रत्यय येतो. ज्या शेतकर्यावर सरकारची मागील बाकी येणे आहे पण त्याच्याजवळ काहीच नाही अशा शेतकर्यास जर तो शेती करण्याची अजूनही उमेद धरत असेल तर त्यास सर्व प्रकारची मदत करावी.
त्याच्यावरील कर्ज माफ़ करण्यासारखे असेल तर तसे कळवावे. शेतकऱ्यांना सोईसवलती देणे, कर्जमाफ़ी देणे ही सेवा आहे पण शेतकरी कर्जबाजारी होऊ नये हे परिवर्तन आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी जे कृषी क्षेत्रात परिवर्तन घडवले ते परिवर्तन आज घडण्यासाठी शिवाजी महाराजांच्या शेतीविषयक धोरणांचा विचार करायला हवा.
tra_desha #booklover #TheGreatMaratha

No comments:
Post a Comment