जिजाऊ स्मृती दिनानिमित्त विनम्र अभिवादन !!
या देशासाठी ज्या मातेने दोन छत्रपती घडविले, तुम्हा आम्हा सर्वांना अन्याय, अत्याचार व गुलामगिरीच्या विळख्यातून मुक्त करण्यासाठी स्वराज्याची संकल्पना मांडली व पोटच्या मुलाकडून पुर्णत्वाला नेली त्या, जगातील मातृत्वाचा व स्रित्वाचा आदर्श असणाऱ्या राष्ट्रमाता राजमाता जिजाऊंचा आज (१७ जून ) स्मृती दिन आहे त्यानिमित्त सर्वप्रथम विनम्र अभिवादन !!
१२ जाने १५९८ रोजी सिंदखेडराजाचे वीरपुरुष लखोजी राजे जाधव व म्हाळसाराणीसाहेब यांच्या पोटी जिजाऊंचा जन्म झाला. लहानपणापासूनच तलवार, दांडपट्टा, भालाफेक, घोडेस्वारी, सदरेवरिल न्याय निवाडे यासारख्या प्रशिक्षणातून तयार झालेल्या तल्लख व प्रगल्भ बुद्धीच्या जिजाऊंचा विवाह वेरूळचे लढवय्ये घराणे मालोजी राजे भोसले यांचे शूरपुत्र शहाजीराजे यांच्याशी झाला आणि जिजाऊंच्या कौटुंबिक संसारासोबतच स्वराज्याच्या संसारालाही सुरवात झाली.
जिजाऊ माँसाहेबांचा जीवनप्रवास --
माहेर - सिंदखेडराजा (विदर्भ)
सासर - वेरुळ (मराठवाडा),
संसार - विजापूर, बेंगलोर (कर्नाटक ),
कर्मभुमी - पुणे, शिवनेरी , मावळ (,पच्छिम महाराष्ट्र )
देह ठेवला - पाचाड (रायगड कोकण) असा चौफेर आणि सर्वदूर झाला.
शिवरांयांची जडणघडण शिक्षण संस्कार असं सर्वांगाने विचार करताना जिजाऊ माँसाहेब आणि शहाजीराजांनी दिलेले योगदान अतुलनिय आहे. स्वराज्य आणि स्वराज्याचा पालक (राजा) या दोनही संकल्पना जिजाऊ आणि शहाजीराजे यांच्या मनात अगदी स्पष्ट होत्या ,त्यामुळे शिवराय तसेच घडावेत असा अट्टाहासाने प्रयत्न केला आणि तो यशस्वीपणे पुर्णत्वाला नेला. पुणे येथे सोन्याचा नांगर चालविण्यापासून ते रायगडावर पार पडलेेला भव्यदिव्य राज्याभिषेक हा स्वराज्य बांधणीचा प्रवासही संपुर्णपणे जिजाऊ माँसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.याच दरम्यान छत्रपती संभाजी राजांचे संगोपण, शिक्षण ,संस्कार व जडणघडणही माँसाहेब जिजाऊंनी केली. रयतेच्या सुख समाधानात सर्वस्व मानणाऱ्या आई जिजाऊंनी शिवरायांच्या राज्याभिषेकानंतर १७जून १६७४ रोजी पाचाड येथे आनंदाने व तृप्त मनाने आपला देह त्यागला. अन्याय व अत्याचाराचा पूरता बिमोड करुन आया बहिणींसाठी सुरक्षित स्वराज्य निर्माण करण्याचे स्वप्न पुर्णत्वाला नेण्यासाठी जिजाऊ माँसाहेबांनी स्वतःचे पुर्ण आयुष्य वेचले...
अशा महान माता, स्वराज्य संकल्पक , स्वराज्य प्रेरक आई जिजाऊंच्या चरणी त्रिवार दंडवत !!
जय जिजाऊ ! जय शिवराय !!
No comments:
Post a Comment