आता इतिहासाचे पुनर्लेखन आवश्यक आहे...
भाग १
अक्षरशः हजारो मंदिरं, हजारो शिलालेख, हजारो शिल्पं, अनेक कागदपत्रं, हे सर्व आग्नेय आशियात पसरलेल्या भारतीय संस्कृतीचे पुरावे आहेत.
पण, आपलं #दुर्दैव इतकंच की आपल्या शाळेत जाणाऱ्या मुलाला कोलंबस माहीत असतो, त्याने शोधलेली अमेरिका माहीत असते, अमेरिकेतली शहरं माहीत असतात, नेपोलियन माहीत असतो, वास्को-डी-गामा ही माहीत असतो. मात्र आपल्याच संस्कृतीला अभिमानाने मिरवणाऱ्या कंबोडियाची राजधानी माहीत नसते..! जावा-सुमात्रा, यवद्वीप, श्रीविजय, यशवर्मन, अंगकोर वाट.....वगैरे शब्द म्हणजे त्यांना ग्रीक किंवा हिब्रू भाषेतले शब्द वाटतात. कारण त्यांना कधी आपल्या विशाल सांस्कृतिक - धार्मिक साम्राज्याबद्दल सांगितलंच जात नाही..!
दक्षिण – पूर्व (म्हणजेच आग्नेय) आशियात आपली #भारतीय_संस्कृती आजही ठळकपणे दिसते, जाणवते. मात्र भारतीय संस्कृतीचा प्रभाव या भागावर केंव्हापासून पडायला लागला याबद्दल नक्की माहिती कुठेच उपलब्ध नाही. काही शिलालेखांमधून माहिती मिळते. पण या भागात पहिला भारतीय माणूस केंव्हा आला, याचा पुरावा मिळत नाही.
कंबोडिया....
कंबोडिया हा देश, भारतातून जमिनीच्या मार्गे, आणि समुद्रातूनही जाता येण्यासारखा देश आहे. भारताच्या पूर्वेला असणारा ब्रम्हदेश. त्याला लागून थायलंड आणि त्याच्या पुढे कंबोडिया. पूर्वी ‘कंबुज’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ह्या देशात भारतीयांचा प्रवेश कसा झाला याबद्दल एक कथा सांगितली जाते, जी ह्या भागात बरीच प्रचलित आहे.
इसवी सनाच्या साधारण दोनशे वर्षांपूर्वी कौडिण्य नावाचा एक #भारतीय काही लोकांना घेऊन येथे आला. या ‘शैलराज कौडिण्य’ ला युध्द करायचे नव्हते. तेथील नाग लोकांना याचे फार आश्चर्य वाटले. त्या नाग लोकांची राजकन्या ह्या कौडिण्यच्या प्रेमात पडली. हा कौडिण्य त्या देशाचा जावई झाला. पुढे राजा झाला आणि त्यानेच आपली हिंदू संस्कृती त्या देशाला दिली असे म्हटले जाते. या कौडिण्यने स्थापन केलेल्या राज्याची राजधानी होती – व्याधपूर. या संदर्भात काही #शिलालेख तेथे मिळाले आहेत. " अंगकोरवाट " ह्या जगप्रसिध्द मंदिरात आढळलेल्या शिलालेखावर लिहिलं गेलंय –
कुलासीद भूजगेन्द्र कन्या सोमेती सा वंशकरी पृथिव्याम I
कौडिन्यनाम्ना द्विजपुंगवेन कार्य्यार्थ पत्नीत्व मनायियापी II
चिनी इतिहासकारांनी ह्या कौडिण्य बद्दल बरेच लिहून ठेवले आहे. त्यामुळे ही केवळ काल्पनिक कथा राहत नाही.
कौडिण्यने स्थापन केलेल्या राज्याचे चिनी नाव आहे, #फुनान_साम्राज्य. त्याचे हिंदू नाव उपलब्ध नाही. त्यामुळे जागतिक इतिहासात ते "फुनान साम्राज्य" या नावानेच ओळखले जाते. साधारण इसवी सन ६१३ पर्यंत हे फुनान साम्राज्य होते असे उल्लेख सापडले आहेत. या काळात, भारतातील अनेक युवक या साम्राज्यात स्थायिक झाले आणि त्यांनी स्थानिक नाग युवतींशी विवाह केले अश्या नोंदी सापडल्या आहेत. याच काळात, या भारतीयांनी आपले शेतीतील ज्ञान वापरून या साम्राज्यात कालवे खोदले आणि चांगल्या शेतीने देशात समृध्दी आणली. हे खोदलेले कालवे आजही #कंबोडिया वरून घेतलेल्या उपग्रह चित्रात स्पष्ट दिसतात.साधारण सातव्या शतकाच्या सुरुवातीला या फुनान राजवंशात अराजक निर्माण झाल्याने ‘कंबू’ नावाच्या, भारतातून तिथे गेलेल्या क्षत्रियाने शासनाची सूत्रे आपल्या हातात घेतली. तेंव्हापासून हा देश कंबुज म्हणून ओळखला जाऊ लागला. पुढे याचेच ‘कंबोडिया’ झाले. या कंबुज वंशाने तीन/साडेतीन शे वर्षांपर्यंत या देशावर राज्य केले. यांच्याच काळात भववर्मन, महेंद्रवर्मन यांच्यासारखे महापराक्रमी राजे निर्माण झाले.पुढे नवव्या शतकात, जयवर्मन(दुसरा) याने 'खमेर' साम्राज्याची स्थापना केली. त्याचा नातू यशवर्मन ने यशोधरपुर नावाची नवीन राजधानी स्थापन केली. याच वंशातील #सम्राटसूर्यवर्मन याने जगातले सर्वात मोठे हिंदू मंदिर,"अंगकोर वाट" बांधले.
म्हणजे इसवी सनाच्या पहिल्या शतकापासून ते पुढे हजार / बाराशे वर्ष, या विशाल साम्राज्यात हिंदू संस्कृती अत्यंत अभिमानाने आणि वैभवाने नांदली, बागडली. भारतापासून दूर, ह्या देशात सहाशे / सातशे वर्ष #संस्कृत ही #राजभाषा म्हणून मानाने मिरवली. सुमारे एक हजार वर्ष, वेदांच्या ऋचा ह्या देशात घुमल्या. मोठमोठे यज्ञयाग झाले. भव्य मंदिरं बांधली गेली. उपनिषदं, पुराण, #रामायण, #महाभारत, #गीता हे सर्व पवित्र ग्रंथ येथील प्रत्येक घराचा अविभाज्य भाग झाले. #सामर्थ्यशाली, #वैभवशाली, #ज्ञानशाली असलेलं हे #हिंदूराष्ट्र; हजार, बाराशे वर्ष सुखा-समाधानाने नांदलं.
मात्र #आपणइतकेकरंटे, आपल्याला यातलं काहीही कधी कोणी सांगीतलं नाही की शिकवलं नाही..! युरोपच्या लहान, लहान देशांचा इतिहास – भूगोल पाठ करणारे आपण, आपल्याला आपलाच हा तेजस्वी इतिहास कळू शकला नाही..!!
No comments:
Post a Comment