छञपती शिव , शंभू आणि राजाराम काळात तुळापूर हे अगदी खुपच मोठ्या घटनांचे साक्षीदार आहे.
स्वराज्याची स्थापना होऊन सार्वभौमत्व स्वीकारून शिवाजीराजे छञपती झाले आणि परकीयांचा बंदोबस्त करून परलोकी गेले.
1680 नंतर स्वराज्याची धुरा संभाजी महाराज यांनी स्वीकारली आणि सतत आठ नऊ वर्षे बलाढ्य औरंग्यास नामोहरण केले पण संगमेश्वरी निजामाकडून संभाजीराजेंना कैद झाली आणि स्वराज्यापोटी राष्ट्राहितासाठी हुताम्य स्वीकारले ते याच तुळापूरी औरंग्याने हालहाल करून इंद्रायणी भिमा तीरी मारले ही सामान्य घटना नाही.
एप्रिल 1689 साली संताजी घोरपडे विठोजी चव्हाण मालोजी , बहर्जी आणि आपल्या शिलेदारांसोबत थेट औरंग्यावरच हल्ला केला तो ही तुळापूरीच ही घटना ही असामान्य होय. औरंगजेब 1663 सालापासून 1689 पर्यंत कोणीही असे वेडे धाडस केले नाही पण असे अद्वितीय पराक्रम घोरपडेंनी घडवून आणला तो याच तिरावर तुळापूरीच होय.
1633 सालापुर्वीपासून तर या संगमास नागरगाव म्हणत होते मग तुळापूर हे नाव कसे आणि कोणी पाडले ??
शहाजीराजे भोसले हे मालोजीराजेंचे पुञ होय भातवडीच्या युध्दापासून ते अलौकिक सरदारांत गणना होऊ लागली. अशा शहाजीराजे यांनी निजामशाही दौलताबादच्या पाडानंतर न खचता बलाढ्य अशा मोगलांना झूंज देण्याचा निश्चय केला.
हुसेनशहाची आजी अजून जिवंत होती ती आपल्या काही सरदारांसह शहाजीराजे यांच्या आश्रयास गेली. बहुतेक शहाजीराजे यांच्या शिवाय विश्वासू पराक्रमी आणि फौजबंद कोणी नसेलच असे वाटते म्हणून तर शहाजीराजे यांचा आश्रय पत्करावा लागला. तीने निजामशाहा वंशज मुर्तजा एक अल्पवयस्क समोर आणला आणि शहाजीराजे यांनी त्यास मांडीवर बसवून त्याच्या नावाने राज्यकारभार सुरू केला. या कृत्यास आदिलशहाची मान्यता होती.
निजामशहाचा नाश होण्यात विजापूरच्या आदिलशहाला धोक्याचे वाटत होते.
शहाजीराजे यांनी निजामशाही मुलखाची व्यवस्था लावली राजधानी जुन्नरास केली. शहाजीराजे स्वतः सिंहासनावर बसून दरबार भरवू लागले ( मुर्तजा कोकणात वाढला आणि तो अल्पवयस्क आपल्याने कारभार शहाजीराजेच बघत होते ) शहाजीकडून निजामशहीचे पुर्नरूजीवन झालेले पाहून शहाजान बादशहास धक्का बसला की निजामशाहीचे धोंग करून शहाजीराजे स्वतःहाचे राज्य स्थापील आणि दक्षिण जिंकण्याचे मनसूबे फेल ठरतील म्हणून तो फिकीरीत पडला असेल आणि शहाजीराजे आदिलशहाशी समेट घडवत होते ते असा ....
शहाजीराजे यांनी निजामशाही मुलखाची व्यवस्था लावली राजधानी जुन्नरास केली. शहाजीराजे स्वतः सिंहासनावर बसून दरबार भरवू लागले ( मुर्तजा कोकणात वाढला आणि तो अल्पवयस्क आपल्याने कारभार शहाजीराजेच बघत होते ) शहाजीकडून निजामशहीचे पुर्नरूजीवन झालेले पाहून शहाजान बादशहास धक्का बसला की निजामशाहीचे धोंग करून शहाजीराजे स्वतःहाचे राज्य स्थापील आणि दक्षिण जिंकण्याचे मनसूबे फेल ठरतील म्हणून तो फिकीरीत पडला असेल आणि शहाजीराजे आदिलशहाशी समेट घडवत होते ते असा ....
शहाजीराजे यांनी मुरारपंतामार्फत खवासखानास कळवले , "दौलताबाद जरी पडले तरी ही जुन्नरसारखी तख्ताची जागा अजून आमच्या स्वाधीन आहे ".
"तुम्ही मदतीचा हात द्याल तर आम्ही निजामशाही तारू आणि मोगलांशी झूंज देऊ ".
आदिलशहाने शहाजीराजे यांचा सल्ला मान्य करून मुरारपंतास शहाजीराजेकडे मदतीस पाठवले . या दोघांची भेट नागरगावी पडली आणि पुढिल कामगिरीची येजना दोघांनी आखली . त्यावेळी सुर्यग्रहणाची अपुर्व पर्वणी आली ती साधून मुरारपंताची सुवर्णतुला करविली . या समारंभात हत्तीची तुला कशी करावी हे कोणासच कळेना ?
तेव्हा शहाजीराजे यांनी आपली युक्ती चालवली तीचा उल्लेख म. रामराव चिटणीसातील ....
" हत्तीची तुला कशी करावी म्हणून मुरारपंती मातबर सरदार जमा झाले त्यास प्रश्न केला असता कोणीच न चालेना . तेव्हा शहाजीराजे यांनी आपली युक्ती चालवली . " हत्ती नावेत घालावा ती नाव हत्तीचे भारे पाण्यात जितकी जाईल ती मर्यादा खूण करून नंतर हाती काढून द्रव्य त्या सीमेपर्यंत नाव बुडे ऐसे भरावे म्हणजे तुला जाहली. ते समयी पंत राजेंवरी बहूत खुश झाले आणि तारीफ केले.
हि सुवर्णतुला भाद्रपद आमवस्याला झाली 23/9/ 1633 साली हे स्थान भिमा इंद्रयणी यांच्या संगमावर असलेले नागरगावाचे नामांतरन शहाजीराजे यांनी तुळापूर असेच केले.
तुळापूर हे संगम स्थान इतिहासप्रेमी कधीच विसरू शकत नाहीत . 1633 साली नागरगावचे तुळापूर हे नामकरण शहाजीराजे यांनी हत्तीच्या तुलेवरून ठेवले गेले आणि पुढे संभाजी महाराज यांच्या मृत्यूने हे स्थानास पुन्हा महत्व प्राप्त झाले पाठोपाठ एका महिन्यातच संताजींनी केलेला मराठेशाहीतीलच नाही तर हिंदुस्थानातील एक अद्वितीय पराक्रम होय.
गडप्रेमी बाळासाहेब पवार
9604058030
9604058030
No comments:
Post a Comment