विनोद जाधव एक संग्राहक

Thursday, 20 June 2019

#सेऊनदेश (सिन्नर)


#सेऊनदेश (सिन्नर)
सिन्नरचा प्राचीन साहित्यात ‘श्रीनगर’ असा उल्लेख आहे. सेऊणचंद्र (प्रथम) - (शके ८०२ ते ८२२) पासून त्याच्या नंतर धाडियप्प, भिल्लन (प्रथम), श्रीराज, वादुगी, धाडियप्प (द्वितीय), भिल्लम (द्वितीय), वेसुगी, अर्जुन, भिल्लम (तृतिय), वादुगी (द्वितीय), वेसुगी, भिल्लम (चतुर्थ), सेऊणचंद्र (द्वितीय), सिंघणदेव, मल्लुगी, भिल्लम (पंचम) याच्यापर्यंत (शके ८०२ ते ११०७) अशी सुमारे तीनशे वर्षें यादवांची राजधानी ‘सिन्नर’ येथे होती. भिल्लम (पाचवा) याने यादवांची राजधानी शके ११०७ मध्ये सिन्नरहून देवगिरी (आताचे दौलताबाद, जि. औरंगाबाद) येथे नेली व प्रसिद्ध देवगिरीच्या किल्ल्यावरून महाराष्ट्राचा राज्यकारभार पाहण्यास सुरुवात केली.
(शके ११०७ ते १११५) अशी सुमारे तीनशे वर्षें यादवांची राजधानी ‘सिन्नर’ येथे होती. भिल्लम (पाचवा) याने यादवांची राजधानी शके ११०७ मध्ये सिन्नरहून देवगिरी (आताचे दौलताबाद, जि. औरंगाबाद) येथे नेली व प्रसिद्ध देवगिरीच्या किल्ल्यावरून महाराष्ट्राचा राज्यकारभार पाहण्यास सुरुवात केली.
सिन्नर शहराच्या दक्षिणेस ‘शिव’ नदी आहे. त्या शिवनदीकाठी सिंदीची झाडे होती. ती सद्य काळात तुरळक आढळतात. सिंदीच्या बनाशेजारी उत्तर बाजूस उंचावर वसलेले गाव म्हणजे ‘सिंदर’ होय. ‘गावठा’ म्हणून सिन्नरमध्ये जो भाग ओळखला जातो तो भाग म्हणजे सिन्नरची मूळ वस्ती होय. सेऊणचंद्राने ‘सेऊणपुरा’ या नावाने स्वतंत्र पेठ किंवा वसती निर्माण केली असे वसई व आश्वी येथील ताम्रपटात म्हटले आहे.
श्रीमत्सेऊणचंद्रनाम नृवरतस्मादभूदभमिपः नित्यंदेशपदिधराजविषये स्वं नाम संपादनयन्।
येनाकारि पुरं च सेऊणपुरं श्रीसिंदीनेरे वरे तत्पुत्रः कुलदीपको गुणानिधी श्रीधाडियप्पस्त्रतः।।
असे अश्वी ताम्रपटात (शके १०२०) म्हटले आहे.
गोंदेश्वर मंदिर ही ‘पंचायतन’ पद्धतीची भव्य वास्तू यादवांचे सामंत गोविंदराज यांनी शके ९९० च्या दरम्यान निर्माण केलेली आहे. गोंदेश्वर मंदिर हे सिन्नरचे वैभवआहे. शांत, एकांतस्थळी असलेल्या या मंदिरात श्रीचक्रधरस्वामी गेले होते. चौकात डावीकडे त्यांचे आसन झाले व मंदिरापुढे असलेल्या मंदिराच्या निर्मितीची कथा (पद्मेश्वर मंदिर, आताचे मुक्तेश्वर मंदिर, सिन्नर-शिर्डी रस्ता) त्यांनी भक्तांना सांगितलेली आहे (पूर्वार्ध लीळा क्रमांक २४५ गोंदेश्वरापुढे पद्मेश्वरू कथन).
सरस्वती नदीच्या दक्षिण काठावर असलेले आवेश्वर मंदिर प्राचीन पूर्वाभिमुख मंदिर, हल्ली ऐश्वरेश्वर मंदिर म्हणून ओळखले जाते. मंदिराच्या उत्तर पट्टीशाळेत श्रीचक्रधारस्वामींचे आसन झालेले आहे.
बाळकृष्ण अंजनगावकर
(अभ्यासाची साधने – लीळाचरित्र, स्थान पोथी, देवगिरीचे यादव – लेखक डॉ. ब्रह्मानंद देशपांडे, प्राचीन मराटी कोरीव लेख – लेखक डॉ. शं.गो. तुळपुळे, महाराष्ट्राचा प्राचीन इतिहास – डिखळकर)

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...