यदुकुलोत्पन्न चंद्रवंशी श्रीमंत जाधवराव,
मथुरा-द्वारका-देवगिरी-सिंदखेडराजा-भुईंज
भाग २
देवगिरी यादव साम्राज्याचा इतिहास...
इ.स. ११८७ देवगिरीवर पाचव्या भिल्लमाने यादवांना सार्वभौम सम्राट म्हणून अभिषिक्त केल्याने भारतीय इतिहासातील नवीन अध्याय सुरू झाला. याच यादव वंशातील दुसरी शाखा कर्नाटकात होयसळ यादव म्हणून प्रसिद्ध आहे. पाचव्या भिल्लमाने देवगिरीवर भारतवर्षातील सर्वात शक्तीशाली यादव साम्राज्याची स्थापना केली.
यानंतर अमरगांगेयपुत्र राजा चैत्रपाळ सम्राट झाले. त्यानंतर गादीवर आलेल्या भिल्लमपुत्र सिंघन २ च्या कारकिर्दीत राज्याचा फार मोठा विस्तार झाला हे विदर्भात सापडलेल्या शके ११३२ (इ.स. १२१०) मधील शिलालेखावरुन समजते. त्याच्या मृत्यूनंतर चैत्रपाळपुत्र कृष्ण अभिषिक्त झाले. त्यानंतर सम्राट झालेल्या महादेव यादवांनी कोकणातील शिलाहार आणि कदंबाची राज्ये जिंकून साम्राज्यात भर घातली. महादेवपुत्र आमण(अभान) यांनी काही काळ राज्यधूरा सांभाळली. ह्या यादव राजांनी देवगिरी, महाराष्ट्र आणि मराठीचा नावलौकिक वाढवला. याच काळात मराठीला पहिल्यांदा राजकारभार भाषेचा दर्जा मिळाला. उत्कृष्ट वास्तुशिल्पकार हेमाद्रीपंत(हेमाडपंत) यादवांच्याच दरबारी होता. याच यादव साम्राज्याची गौरवशाली व अजिंक्य राजधानी देवगिरी.. जिला कोणीही स्वबळावर जिंकू शकले नाही. देवगिरी जिंकण्याचा एकच मार्ग तो म्हणजे... "कपट..."
इ.स.१२७१ ला कृष्णपुत्र रामदेवराय उर्फ रामचंद्रदेव गादिवर आले. त्यांनी नागपूर भंडाऱ्याकडील आपल्या साम्राज्यात भर घातली. यादव साम्राज्याचा सर्वात जास्त विस्तार याच काळात झाला. आल्लाउद्दीन खिलजी देवगिरीवर चालून आला. रामदेवराय पुत्र शंकरदेव सैन्य घेऊन बाहेर गेला असल्याने यादवांना खिलजीशी तह करावा लागला. अल्लाउद्दीन दिल्लीला सुलतान झाल्यावर रामदेवरावांनी तीन वर्षे खंडणी पाठवलीच नाही. त्यामुळे सेनापती मलिक काफूर करवी रामदेवरायांना कैद करून दिल्लीस नेण्यात आले. पण खिलजीने त्यांना सन्मानाने वागवले त्यांना "रायरायन" हा किताब देऊन ६ महिन्यांनी मोठ्या सन्मानाने देवगिरीस पाठवले, तसेच जाताना एक लाख टक्का आणि गुजरातचा नौसारी जिल्हा बहाल केला. इ.स.१३१० मध्ये रामदेवांचा मृत्यू होऊन मुलगा शंकरदेव गादीवर आला. स्वाभिमानी आणि शूर शंकरदेवाने अल्लाउद्दीनचे मांडलिकत्व झुगारून देत त्याला खंडणी देणे बंद केले. चिडून जाऊन खिलजीने मलिक काफूरला देवगिरीवर धाडले. इ.स.१३१२ मध्ये घनघोर युद्ध होऊन त्यात शंकरदेवाचा अमानुष वध झाला. तीन वर्षे काफूर देवगिरीवरच ठाण मांडून होता. याच काळात किल्ल्यावर जुम्मा मशिदा बांधून इस्लामचा प्रसार सुरू झाला.
इ.स. १३१६ मध्ये खिलजी मृत्यू पावल्यावर मलिक काफूरचा खून करुन १३१७ ला मुबारकशहा सुलतान झाला. तेव्हाच रामदेवरायांचा जावई हरपाल देवाने देवगिरीला पुन्हा स्वतंत्र केले. एवढेच नव्हे तर दक्षिणेतला बराच भाग ताब्यात घेतला. शंकरदेवाचा मुलगा गोविंददेवचे पालन सुद्धा हरपालदेवानेच केले होते. मुबारक शहा दिल्लीत स्थिर होताच इ.स. १३१८ मधे त्याने देवगिरीवर आक्रमण केले आणि आपली दहशत बसावी म्हणून हरपालदेवांची अंगाची कातडी सोलून भयानक यातना देत लोकांसमोरच ठार केले.
अशा रीतीने देवगिरी वरील यादवांच्या सार्वभौम सत्तेच्या अस्ताबरोबर महाराष्ट्राचाही वैभव सूर्य अस्ताला गेला. इथुनच पुढे ३५० वर्षे महाराष्ट्र इस्लामी सत्तेत भरडून निघाला.
✍️ स्वप्नील महेंद्र जाधवराव.
#यदुवंश #चंद्रवंशी
#श्रीमंत_जाधवराव #शहान्नवकुळी_मराठे
#छत्तिसकुळी_राजपूत. #साहेब_ए_जादूनराय_दखनी

No comments:
Post a Comment