राजे लखुजीराव जाधवराव यांचे नातु राजे यशवंतराव यांची सिंदखेडराजा स्थित समाधी........ राजे यशवंतराव हे राजे लखुजीराव जाधवराव यांचे ज्येष्ठ पुत्र राजे दत्ताजीराव यांचे ज्येष्ठपुत्र होत. यांची हत्या राजे लखुजीराव व त्यांचे दोन पुत्र राजे अचलोजीराव व राजे राघोजीराव यांच्यासोबत देवगिरीवर २५ जुलै १६२९ रोजी कपटाने केली. हे आपल्या आजोबाच्या प्रत्येक मोहिमेत सहभागी असत. याना दोन पुत्र होत.....१) राजे रतनाजी/ रुस्तुमराव २) राजे लखुजी दुसरे/ लखमोजी. १) राजे रतनोजी/रुस्तुमराव हे आपले चुलते राजे ठाकुरजी समवेत मोहिमेत असत व इ सन १६३३ च्या वाटणीपत्रातिल वाटा या दोघांमध्ये होता. इ सन १६७२ मध्ये सालदेरीच्या मोहिमेत मोगलांकडुन लढताना शिवरायांकडुन पराभुत झाल्यामुले बहादुरखानासोबत वाद झाल्यामुले राजे ठाकुरजी व पुतणे राजे रुस्तूमराव मराठा स्वराज्यात सामिल झाले. पुढे इ सन १६७५ मध्ये शिवरायानी युवराज संभाजीराजे सोबत राजे रुस्तुमराव जाधवराव यांची कन्या दुर्गाबाईसाहेब यांचा विवाह करवुन परत राजे रुस्तुमराव/ रतनाजी याना आपला माणुस म्हणुन मोगलांकडे पाठवुन राजकारण केले. यावरुन महाराज शत्रुगोटात आपली माणसे पेरुन राजकारण करित असत या बाबीवर चांगलाच प्रकाश पडतो. याच रुस्तुमराव/रतनाजी यांचे वंशज शाखा सिंदखेडराजा परिसरात जवलखेडा,उमरद देशमुख,करवंड व सारवडी येथिल जाधवराव होत. २) राजे लखुजी दुसरे/लखमोजी हे आपले चुलते राजे ठाकुरजी सोबत स्वराज्यातच चाकरीत होते. तसेच राजे ठाकुरजीस पुत्र नसल्याने लखमोजी हे ठाकुरजीकडे दत्तक गेले असले पाहिजेत कारण महेगावकर जाधवराव यांच्याकडील वंशावलीत लखमोजी हे राजे ठाकुरजीचे पुत्र दाखवले आहेत. या शाखेची पुर्ण कारकिर्द ही स्वराज्यातच गेली. लखमोजी यांचे वंशज भुईंज व उंब्रजकर जाधवराव होत.
अशाप्रकारे यशवंतराव यांची ही ज्येष्ठ शाखा मराठा स्वराज्याच्या कार्यातच सक्रिय होती
अशाप्रकारे यशवंतराव यांची ही ज्येष्ठ शाखा मराठा स्वराज्याच्या कार्यातच सक्रिय होती
No comments:
Post a Comment