#छत्रपती शिवराय महाराज यांचा दुसरा तांत्रिक राज्याभिषेक#
१) मुळपोथी - शिवराज-राज्याभिषेक-कल्पतरु. पोथीचा लेखक- गोविंद नारायण बर्वे. पोथीचा काळ- इ सन १६९९. पोथीची भाषा-संस्कृत. मुळ पोथीचा आज संग्रह- इंडियन ऐशेयाटीक सोसायटी,कोलकत्ता.
२) दुसरा राज्याभिषेककरणारा योगिंद्र- निश्चळ पुरी गोसावी. हा गोसावी पंथाचा असुन यजुर्वैदावरील निष्णात अभ्यासक. मुळचा वाराणशी येथील.
३) दुसर्या राज्याभिषेक तिथी व तारिख- आश्वीन शु।। ५ (ललिता पंचमी) बुधवारी. २३/२४ सप्टेंबर१६७४.
४) पोथीचे स्वरुप - या पोथीच्या एकुण आठ शाखा होत. म्हणजे आठ प्रकरणे होत. त्यापैकी पहिल्या चार प्रकरणात निश्चळ पुरी व गोविंद यांची कोकणात झालेली भेट,गागाभट्टाचे आगमन आणी वैदिक राज्याभिषकाचे वर्णन थोडक्यात केलेले आहे. पाचव्या प्रकरणात प्रारंभीचा भआगात निश्चळाने तीर्थयात्रेला निघुन जाण्याचा वगैरे चा आहे.याच शाखेत पुढच्या भागात महाराजानी निश्चळला केलेली विनंती आणी त्याने तांत्रिक पद्धतीने राज्याभिषेक करण्याची केलेली तयारीचे वर्णन आहे. सहाव्या व सातव्या शाखेत तांत्रिक विधीचे वर्णन आहे.आठव्या शाखेत या राज्याभिषेकचा महाराजावरील परिणामव राजाराम महाराज राज्य कसे करतील याचे वर्णन आहे.
५) निश्चळपुरी तांत्रिक होता आणी स्वाभाविकच महाराजांच्या वैदिकराज्याभिषेकात तांत्रिक विधी व्हावेत अशी त्याची इच्छाहोती. म्हणून त्याने वैदिकराज्याभिषेक समयी आपले या विधीत सामावुन घेण्यासाठी आपले ब्राह्मण पाठवले होते.... परंतु त्याच्या ब्राह्मण लोकास सामावुन घेतले गेले नाही... म्हणजे निश्चळाचा वैदिक राज्याभिषकास विरोध नव्हता हे स्पष्ट होते....परंतु आपले ब्राह्मण सामावुन घेतले नाहीत याचा गागाभट्टावर राग जाणवतो. यावरुन हेच सिद्ध होते की निश्चळाचे शिष्यगण देखील ब्राह्मणच होते.
६) तांत्रिक विधी - फक्त एक दिवसाचा विधी. निश्चळाने सकाळी उठुन कलश स्थापना केली. त्यानंतर सर्व पुजाविधी तंत्रानुसार केली. नाना रंगानी आकर्षक बनवलेले मेरुयंत्र उचलुन घेतले. ललिता पंचमीच्या योगावर अभिषेकाचा महोत्सव झाला. ते स्थान छतानी आणी खांबानी सुशोभित झाले होते.मंडपानी अलंक्रुत झालेले होते.इंद्राच्या महालामध्ये विश्वकर्म्याने केलेल्या महान स्थानासारखे ते स्थान होते.त्यानंतर सिहासनाच्या ठिकाणी मंडपामध्ये कलशांची पुजा करुन भुमी विधीपुर्वक शुद्ध केली.ती पंचरत्नानी पुर्ण केली.
त्यानंतर सिंहासाठी बळी अर्पण केले.आसनाच्या पुर्वेच्या हर्यक्ष सिंहास पशुचा बळी दिला.दक्षिणेला पंचास्य नावाच्या यमाला घाबरविणारा स्थपिला व बळी दिला. नैऋत्येला केसरी नावाचा बळीचे भरपूर भोजन करणारा स्थापनकेला व बळी आर्पण केला. पश्चिम बाजुस म्रुगेंद्र स्थापुन बळी दिला. वायव्येला शार्दुल स्थापित करुन त्यास पशुचा बळी दिला. उत्तरेला गजेंद्र स्थापुन त्यास पशुचा बळी दिला. हराच्या /शंकराच्या दिशेला बळीचे रक्षण करणारा हरी नियुक्तकेला ..अशाप्रकारेआठ जणाच्या पाठीवर आसन स्थिर केले.म्हणूनयास सिंहासन म्हणतात.
निश्चळाने रत्नमय वेदीवर रुप्याचे मोठे आसन स्थापीत केले आणी अभिषेकासाठी राजाला त्यावर बसवले.तेथे आठ दिशेला आठ कलश स्थापन केले.त्याची रत्नानी पुजा केली.
त्यानंतर निश्चळाने महाराजाना आसनावर बसवुन स्वजनाना दुर पाठवुन सर्व आवयवाना शुभप्रद अशा महामंत्रानी वेष्टन घातले. त्यावेळी राजसभेत नगारा वगैरेवाद्ये वाजविली जात होती.. वेदपारंगत ब्राह्मण साममंत्र गात होते.
नंतर नवीन वस्त्रे महाराजानी परिधान केले...व अन्नाच्या पर्वतास नैवेद्य दाखवला.त्यामुळे रायरी पर्वत संतुष्ट झाला.त्यानंतर निश्चळाने महाराजाना विद्येचा उपदेश केला.
दामोदर युक्त वाणीचे पहिले बीज प्रेरितकेले.विधी,इंद्र ,शांतिस्वरुप,चंद्राने युक्त, कामभिध,श्रेष्ठ, संकर्षण,विसर्ग....ज्याला प्रेरितकेले. तिन्ही लोकाना मोहित करणारी बाला त्रिबीजा म्हणून वर्णिलेली शक्तीचे बीज असलेली त्रिपुरा बाला देवता स्थापिली.
त्यानंतर महाराजानी घरात प्रवेशकेला व भोजन करुन राजसभेकडे आले.
या विधीत दहा महामंत्र,राजराजेश्वरी विद्या,ब्रह्मस्त्र महाविद्या व ६४ तंत्र विद्या राजासदिल्या. असे निश्चळ म्हणतो. अशा प्रकारे तांत्रिक राज्याभिषेक निश्चळाने केला,परंतुयावर देखिल वैदिक धर्माचाच प्रभाव दिसुन येतो.
६) सर्वात विशेष निश्चळाने या पोथीत महाराजानी आपल्या पहिल्या च पत्नीशी पुनर्विवाह केला असे निक्षुण सांगितले आहे.......हे सर्वात महत्वाचेआहे....कारण आज बरेच महाराजानी नवीन स्त्रीशी विवाह केला या शपाच्या संदर्भहीन लेखनाचा आधार घेउन विक्रुत लेखन मांडत आहेत. त्यामुळे हा विवाहाचा मुद्दा येथे बाद ठरतो....हे सर्वानी लक्षात घेतले पाहिजे.
७) तसेच या पोथीत नीश्चळ महाराजाना शीवाचा आवतार म्हणत आहे....
८) या राज्याभिषेक समयी कुलदैवत पुजा देखिल यथाविधी केलेली आढळते. ....
क्रमशः ................

No comments:
Post a Comment