!!! छत्रपती शिवराय महाराजांचे दक्षिण दिग्विजयास जाण्यापुर्वीचे धोरण !!!
छत्रपती शिवराय महाराज यानी दक्षिण दिग्विजयास जाण्यापुर्वी युवराज संभाजीराजे याना कोकणात खास ठेवले याचे नेमके कारणे काय आहेत ते पाहु =
१) महाराजानी दक्षिण दिग्विजयास जाण्यापुर्वी सर्वात महत्त्वाची दक्षता घेतली ती स्थापन केलेल्या मराठा स्वराज्याचे संरक्षण. आणी त्याचाच एक भाग म्हणुन त्यानी आपला सर्वोत्तम सेनानी युवराज संभाजीराजे याना कोकणात ठेवले कारण कोकण एक असा प्रांत होता की त्यामार्गे मोगल सेनानी दिलेरखान हा सर्वात कमी वेळात व बिनधोकपणे मराठा स्वराज्याच्या राजधानी रायगडावर धडकु शकत होता.त्यामुळे या प्रांतात आपला सर्वोत्तम सेनानी असावा हा सर्वात मोठा उद्देश कोकणात युवराजाना ठेवण्यामागे होता.

२) युवराजाना कोकणात ठेवण्यामागे दुसरा महत्त्वाचा उद्देश म्हणजे युवराज संभाजीराजे व मराठा स्वराज्याचे काही मंत्री यांचा बेबनाव होता,खुद्द महाराज स्वराज्यात नसताना या दोघामधील वाद वाढु नये हे दुसरे महत्त्वाचे कारण होय.
३) परंतु काही कल्पितकथाकार छत्रपती शिवराय महाराज यांच्या या सर्वोत्कृष्ट व संरक्षक राजनितीस शाक्तपंथाशी जोडण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहेत, जो साफ चुकिचा आहे...कारण छत्रपती शिवराय महाराज हे सर्वप्रथम स्वराज्याचा विचार करुनच राजकारण करत असत.....त्यानी कधीही एखाद्या विशिष्ट पंथाचा,जातीचा विचार करुन राजकारण केले नाही....त्यानी राज्याभिषेक करताना देखील प्रथम व मुख्य राज्याभिषेक हा वैदिक पद्धतीने करवुन घेतला आणी पहिल्या राज्याभिषेकात काही विधी राहिल्यामुळे दुसरा तांत्रिक विधी (शाक्त नव्हे) करवुन घेतला......तसेच सदरील दोन्ही विधी करत असताना राज्याभिषेक विधीनियमास फाटा देऊन पुर्वपत्नीशीच पुनर्विवाह केला...नवीन विवाह केला नसताना काही उपटसुंभ तथाकथित विनाधार शैवविवाह केला असा अपप्रचार करत फिरत आहेत.. जे साफ चुकीचे व विनाधार आहे....
त्यामुळे छत्रपती शिवराय महाराज यांच्या दक्षिण दिग्विजयपुर्वीच्या संरक्षक राजनितीस धार्मिक रंग देण्याचा प्रकार करु नये.....
No comments:
Post a Comment