★★मुकासा /मोकासा ★★
मुकासा /मोकासा म्हणजे काय? सरंजामी सरदारांच्या पदरी असलेल्या तैनात सैन्याच्या खर्चाचा मोबदला म्हणुन नगद अथवा रोखीने पैसे न देता तेवढ्या कर वसुली उत्पन्नाचा मुलुख तोडुन दिला जात असे.त्या प्रदेशाला मुकासा आणी ज्या सरदाराला तो मोकासा प्रदेश दिला जात असे,त्यास मुकासदार किंवा मोकासदार ही संज्ञा होती.
मोकासादार सरदार आपल्या मूकासाप्राप्त प्रदेशातुन कर स्वरुपातुन वसुल करुन ठरलेली रक्कम स्वतःकडे ठेऊन शिल्लक राहिलेले उत्पन्न सरकारी तिजोरीत जमा करीत असत. जहागिर अथवा मूकासा देणे ,जप्त करणे अथवा काढुन घेणे ,एकाचा दुसर्याला देणे,बढती देणे अथवा तैनात सैन्य कमी करणे आदी अधिकार हे सर्वस्वी छत्रपती कडे असत....छत्रपती शिवराय महाराज यानी ही पद्धत बंद करुन पगारी पद्धत चालु केली होती....छत्रपती संभाजी महाराज काळात देखिल हिच पद्धत होती....ती वतनदार व सरंजामदारी बंद करण्यासाठी खुप महत्वपुर्ण ठरली व यशस्वी देखिल झाली.....परंतु औरंगजेब खुद्द महाराष्ट्रात स्वराज्यात ठाण मांडुन बसला असता त्याने मराठा सरदाराना परत वतन व सरंजाम देणे चालु केले.....त्यामुळे नाईलाजाने छत्रपती राजाराम महाराज याना वतन व सरंजाम पदधत चालु करावी लागली....परंतु छत्रपती राजाराम महाराज यानी सर्वात महत्वाचा बदल या पद्धतीत करुन वतन व सरंजाम हे मराठा सरदाराना मोगल प्रांतात दिले......हा महत्वपुर्ण बदल केला.....त्यामुळे मराठा सरदाराना मोगल प्रांतात धुमाकुळ घालण्याचे अधिकारच प्राप्त झाले.....त्यामुळे मराठा सरदारानी औरंगजेबास आपले सैन्य मोगल प्रांतात घुसवुन जेरीस आणले व पराभवाचे तोंड दाखवले.....परंतु आपले इतिहासकार छत्रपती राजाराम महाराजास वतनदारी व सरंजाम पद्धती परत चालु केल्यावरुन टिका करतात. परंतु या पद्धतीत जो बदल करुन छत्रपती राजाराम महाराजानी चालु केली त्याचाच परिपाक म्हणजे औरंगजेबाचा पराभव होता....कारण तिजोरीत पैसा नव्हता व औरंगजेब दारात येऊन बसला होता....मग सैन्य खर्च व तिजोरीत धन या दोन्ही बाबी राजाराम महाराजानी या पद्धतीत बदल करवुन साधल्या ,हेच मराठ्याच्या स्वांतत्र्यलढ्यातील यशाचे गमक आहे....आणी हेच गमक मराठी इतिहासकार विसरलेले दिसतात. पुढे छत्रपती राजाराम महाराजानंतर या पद्धतीत सरसेनापती धनाजीराव जाधवराव यानी चारा कर वाढवुन तो मोगल प्रांतातुन वसुल केला....त्यामुळे सैन्य खर्च त्यातुन भागविला गेला व सरंजाम व वतनातुन मिळणारे उत्पन्न सरकारी तिजोरीत जमा झाले.....ही आणखी सुधारीत पद्धत ....!!!
छत्रपती शाहु महाराज इ सन १७०७ साली सुटुन आले आणी इ सन १७०८ साली सातारा राजधानी बनवुन तेथे राज्याभिषेक करवुन घेतला....त्यानी छत्रपती राजाराम महाराज यानी चालु केलेली सरंजाम व मोकासा पद्धत चालु केली....परंतु या पद्धतीत शाहु महाराजानी काही सुधारणा केल्या त्या म्हणजे ,"पुर्वी मोकासा एखाद्या सरदारास गावाचा किंवा प्रांताचा दिला जायचा,परंतु शाहु महाराजानी मराठा सरदाराना स्वतंत्र गावाची किंवा प्रांताचा मोकासा देणे बंद करुन एकाच गावात दोन किंवा तीन सरदाराना मोकासा देणे चालु केले." हा महत्वपुर्ण बदल छत्रपती शाहु महाराजानी केला .याचा नेमका परिणाम काय झाला ते आपण पाहु.
परिणाम =
अगोदर मोकासा पद्धत जी चालु होती त्यात एखाद्या सरदारास एखादा पुर्ण गाव किंवा प्रांत मुकासा म्हणुन मिळत असे. जहागिरदाराप्रमाणे मोकासादार देखिल सरकार नियुक्त अधिकारी होता.त्यामुळे गावातील किंवा प्रांतातील प्रशासकिय व्यवस्था त्यास पहावी लागत असे. छत्रपती कडुन त्यास त्या मोकासा प्रदेशातील कर वसुलीचे अधिकार प्राप्त होत असत.त्या मुकासा प्रदेशातील ठरवुन दिलेले कराचे उत्पन्न स्वतःकडे ठेऊन शिल्लकी उत्पन्न त्याने छत्रपतीकडे म्हणजे स्वराज्याच्या तिजोरीत जमा करण्याची बंधने होते. मोकासा काढुन घेणे किंवा बदलवणे हे सर्वस्वी छत्रपतीच्या अधिकारात असे.मात्र एखाद्या परगण्याची अथवा गावाची स्वतंत्र मुकासदारी प्राप्त होणे सरदारास सत्ता वर्चस्वाच्या द्रुष्टीने महत्वपुर्ण अर्थ असे. त्यामुळे सदरील प्रदेशातील जमाबंदी,करवसुली आणी बंदोबस्ताची जबाबदारी त्या मुकासदारावर असे. त्यामुळे साहजिकच त्या मुकासदारास सरकारचा प्रतिनिधी म्हणुन त्या मुकासाच्या प्रांतात सत्ता गाजवता येई. कुणाचे इनाम चालविणे,नुतन वतन देणे,जुने वतन चालविणे,न्याय निवाडा करणे,त्या मुकासा प्रांतात सुव्यवस्था राखणे आणी प्रजेची काळजी घेणे आदी अधिकार व कर्तव्य सुद्धा मुकासदारास पार पाडावी लागत असत. त्यामुळे त्या मोकासदारास अनिर्बंध सत्तेची प्राप्ती होत असे.
परंतु छत्रपती शाहु महाराजानी नेमके मोकासदारास अनिर्बंध सत्तेची प्राप्ती होऊ नये यासाठी मोकासा वाटप पद्धतीत महत्वपुर्ण बदल केला तो म्हणजे,"एका गावातील किंवा प्रांताचा मुकासा एकाच सरदारास देणे बंद करुन एकाच गावातील दोन किंवा तीन किंवा चार सरदराना एकत्रीत मोकासा वाटप करण्याची प्रथा अस्तितत्वात आणली आणी या सरदारामार्फत गावतील कर वसुली व प्रशासकीय व्यवस्था पार पाडण्याची जबाबदारी देऊन एखाद्या मोकासदारास अनिर्बंध सत्ता प्राप्ती मिळवण्यासच खिळ घालुन मराठा सरदारावर स्वतःचे नियंत्रण ठेवले." या पद्धतीमुळे कोणत्याही एका सरदाराची मक्तेदारी त्या प्रांतावर होऊ दिली नाही...........तसेच छत्रपती शाहु महाराजानी मोकासा स्वप्रांतात तसेच मोगल प्रांतात देखिल संरक्षणाच्या नावाखाली देऊन मोगल प्रांतात प्रत्येक १०० मैलावर एक गढी उभी करुन तेथे एक चौथ वसुलीचा अधिकारी ,एक देशमुखी वसुली अधिकारी व एक रहदारी कर वसुली अधिकारी ससैन्य ठेऊन मराठा स्वराज्याच्या विस्ताराची मुहुर्तपेढ घालुन दिली...... ही पद्धत छत्रपती शाहु महाराज यानी इ सन १७०८ सालीच चालु केली . ती देखिल स्वप्रांताता तसेच मोगल प्रांतात देखिल. या सर्व मोकासदारावर छत्रपती शाहु महाराजांचे च नियंत्रण असे.या मोकासांचे नुतनीकरण,बदल हे सर्व अधिकार शाहु महाराजानी राखुन ठेवले होते.मोकासादाराचा सैन्य खर्च सोडुन इतर कर पुर्णपणे छत्रपति शाहुकडेच जमा करावा लागत असे.
सर्वात महत्वाचे म्हणजे छत्रपती शाहु महाराज यानी स्वराज्याचे प्रधान,सेनापती,सरलष्कर,रणधुरंदर,युवराज,आदी मातब्बर सरदाराना देखिल एकत्रीत मोकासा दिले. याना स्वतंत्र मोकासा दिले नव्हते.याना स्वतंत्र सरंजाम दिले परंतु स्वतंत्र मोकासा दिला नाही. ही एअत्रीत प्रभावी व संशोधीत परिणामकारक मोकासा पद्धती अस्तित्वात आणुनच या मोकासादारावर स्वतःचे नियंत्रण ठेवले.
तसेच छत्रपती शाहु महाराज यानी प्रत्येक प्रांतात एक स्वमर्जीतील मराठा सरदारास सरंजाम देऊन सरंजामदार म्हणुन ठेवले....आणी या सरंजामदाराचे नियंत्रणाखाली प्रत्येक मोकासादार ठेवला. आणी या स्वमर्जीतील सरंजामदरावर स्वतःचे नियंत्रण ठेवले. हे सरंजाम देखिल शाहु महाराजानी आपल्या सरदारास स्वप्रांतात तसेच मोगल प्रांतात देखिल दिले.आणीमराठा स्वराज्याच्या विस्ताराची मुहुर्तपेढ स्वतः चालु करुन त्यावर स्वत।चे कडक नियंत्रण ठेऊन पक्की प्रशासन व्यवस्था अस्तित्वात आणली .
छत्रपती शाहु महाराज यानी केंद्रीय प्रशासन व्यवस्था अवलंबिली आणी यात शेवटपर्यंत सर्व नियंत्रण स्वतःकडेच ठेवले. अधिकार सर्वाना दिले परंतु नियंत्रणात ठेवण्याचे कसब देखिल साधले.

No comments:
Post a Comment