विनोद जाधव एक संग्राहक

Thursday, 18 July 2019

महादजी शिंदे यांच्या बायकांचे बंड. भाग 4


महादजी शिंदे यांच्या बायकांचे बंड.
भाग 4
दौलतराव चा कारभारी बाळोबा पागनीस चा ह्या महिलांवर खूप प्रभाव होता,म्हणून त्याच्या मध्यस्थीने दौलतराव ने तडजोड करण्याचे ठरविले पण तसे काही घडले नाही,उलट बाळोबास राजद्रोहाच्या आरोपावरून दौलतराव ने अटक करून अहमद नगरच्या किल्ल्यात ठेवले.( मे १८०० ). ह्या महिला १७९९ मध्ये उत्तरेकडे गेल्या.जातेसमयी नाशिक,खानदेश,वऱ्हाड प्रदेशात त्यांच्या पठाण अधिकाऱ्यांनी बेसुमार लुट केली व अमाप पैसा वसूल केला,मार्गातील खेड्यापाड्यांची मनसोक्त लुट केली.दौलतरावला हटवून त्याच्या जागी दुसरा दत्तक घेण्याचे त्यांनी जाहीर केले,दौलतराव च्या मुलखात अनेक ठिकाणी आपले अधिकारीही नेमले.महादजींच्या वेळच्या अम्बुजी इंगळे व पेरॉन या सेनाधिकार्यांनी शिंदे महिलांना आवर घालण्याचा प्रयत्न केला पण त्यात यश न आल्याने त्यांनी दौलातरावास ताबडतोबीने उत्तरेकडे येण्याचे निरोप धाडले.दुसरीकडे त्याच सुमारास यशवंतराव होळकराने पण दौलतराव च्या मुलखात जाळपोळ व लुटालूट चा कहर केला.परिणामी १८०० च्या अखेरीस दौलतराव ला पुण्याहून मुक्काम हलवावा लागला.यशवंतराव व दौलतराव यांच्यात १८०१ ते १८०२ सुरुवातीपर्यंत भीषण संघर्ष झाले.वर्षानुवर्षाच्या प्रयत्नांनी उभारलेल्या शिंद्यांच्या लष्कराची जबरदस्त हानी झाली.यशवंतराव त्याचा प्रदेश जळत,लुटत असतानादेखील दौलतराव उज्जैनच्या बाहेर पडला नाही इतकी त्याच्या लष्कराची हानी झाली होती.
महादजींच्या तीन पत्नींपैकी भागीरथीबाई नगरला ऑगस्ट १७९९ मध्ये वारली,लक्ष्मीबाईने विष प्राशन करून जीव दिला असे brautan म्हणतो तर यमुनाबाई फेब्रुवारी १८१४ रोजी मृत्यू पावली.
( संदर्भ:१-मराठी रियासत खंड ७,२-मराठ्यांचा इतिहास खंड ३, संपादक,अ.रा.कुलकर्णी,ग.ह.खरे,३-पेशवेकालीन स्त्रिया,ले.नीलिमा भावे व नाना फडणवीस हिंदी आत्मचरित्र-ले.श्रीनिवास बालाजी हर्डीकर.)

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...