विनोद जाधव एक संग्राहक

Thursday, 25 July 2019

” दक्षिणदिग्विजय ते उत्तरदिग्विजय “

” दक्षिणदिग्विजय ते उत्तरदिग्विजय “

।। छत्रपती शिवशंभू राजांचा विजय आहे ।।
” दक्षिणदिग्विजय ते उत्तरदिग्विजय “
【मराठ्यांच्या इतिहासातील अभूतपूर्व पराक्रम 】
स्वराज्याच्या विस्तारासाठी , छत्रपती शिवाजी
महाराजांनी आणि युवराज शंभूराजांनी , दक्षिणदिग्विजय ही मोहीम आखली . या मोहिमेच्या रणनीतीनुसार , छत्रपती शिवाजी महाराज आपल्या सर्व सैन्यासह , दि . ६ ऑक्टोबर १६७६ रोजी , रायगडहून निघाले .
छत्रपती शिवाजी महाराजांचा लवाजमा : –
१ . २५ हजार घोडदळ .
२ . १२ हजार पायदळ .
३ . २ हजार तिरंदाज .
४ . प्रभावी तोफखाना .
● छत्रपती शिवाजी महाराजांनी बरोबर घेतलेले मातब्बर सरदार : –
१ . हंबीरराव मोहिते ( सरनौबत ) .
२ . येसाजी कंक ( सेनापती – पायदळ ) .
३ . नेतोजी पालकर ( प्रमुख सरदार ) .
४ . सूर्याजी मालुसरे .
५ . सर्जेराव जेधे .
६ . बाबाजी ढमदेरे .
७ . आनंदराव नाईक .
८ . प्रल्हाद निराजी .
९ . दत्ताजी पंत .
१० . बाळाजी आवजी .
११ . मानाजी मोरे .
तसेच सर्व मावळ्यांनी भरजरी पोशाख घातलेलं , हि कल्पना युवराज शंभूराजे यांचीच होती .
दक्षिण दिग्विजय मोहिमेला निघण्याआधी छत्रपती शिवाजी महाराजांनी कुतुबशाहीतील वकीलामार्फत कुतुबशाहा बरोबर बोलणी केली. कुतुबशाहीचा कारभार मदाण्णा आणि अक्काण्णा या वजीरांच्या हातात होता. त्यांनी कुतुबशाहशी बोलून छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर मैत्री करण्यात त्याचा फायदा आहे हे पटवून दिले. तसेच दक्षिणेकडे निघण्यापुर्वी छत्रपती शिवाजी महाराजांना मोगलांच्या आघाडीवर शांतता आवश्यक होती. छत्रपती शिवाजी महाराजांनी निराजीपंतला बहादुरखानकडे धाडले. निराजीपंताने बहादुरखानला दागदागिने व इतर भेटवस्तु दिल्या. त्याने मोगलांबरोबर गुप्त करार केला की छत्रपती शिवाजी महाराज आदिलशाहीच्या दक्षिणेतील प्रदेश जिंकण्यासाठी गेले असताना मोगलांनी स्वराज्यावर आक्रमण करु नये. मोगलांचे स्वराज्यावरील आक्रमण थोपवणे आणि कुतुबशहाशी हात मिळवणी करत दक्षिण मोहीम यशस्वी करण्याच्या योजनेत छत्रपती शिवाजी महाराजांचा राजकीय मुस्तद्दीपणा, बुद्धीचातुर्य आणि परराष्ट्रनिती धोरण हे पैलू ठळकपणे जाणवतात.
” छत्रपती आणि पातशहा भेटीच श्रेय , हे प्रल्हाद निराजी , मदाण्णा आणि अक्काण्णा यांनाच जातं ” .
छत्रपती शिवाजी महाराज , हैद्राबाद ला येताच
मदाण्णा आणि अक्काण्णा व पातशाहाने महाराजांचे यथोचित स्वागत केली . हैद्राबादमध्ये छत्रपती शिवरायांची प्रचंड मोठी मिरवणूक काढली होती . हैदराबादमधील प्रत्येक माणूस छत्रपती शिवाजी महाराजांना पहावयास आतुर झालेला होता ; कारण आतापर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचे , सर्वांनी पराक्रम ऐकले होते ( अफजल वध , शास्ताखानाची फजिती , जौहरचा वेढा , आग्राभेट व सुटका , शिवराज्याभिषेक ) . त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज , कुतुबशाहीच्या राजवाड्यात आले , शाही नियमानुसार महाराजांचे योग्य आदरातिथ्य , पातशहाने केले . पुढे १ प्रहर , छत्रपती शिवाजी महाराज आणि सुलतान अब्दुल हसन तानाशहा ( कुतुबशहा ) यांच्यात चर्चा झाली . या चर्चेत , ” दक्षिण देश दक्षिणेतील सत्ताधीशांच्याच स्वाधीन राहिला पाहिजे ” , असे धोरण निश्चित झाले . आणि इतर काही महत्वपूर्ण मुद्यांवर चर्चा झाली . हैद्राबादला महाराज १ महिन्याहून , अधिक काळ ( ४ फेब्रुवारी ते १० मार्च १६७७ ) राहिले . या दिवसात एक मुख्य प्रकार घडला तो खालीलप्रमाणे :
◆ सेनापती येसाजी कंकांची स्वामिनिष्ठता : –
कुतुबशहाने , छत्रपती शिवाजी महाराजांना म्हटले , महाराज आम्हांस तुमच्या सेनेमध्ये खूप प्रमाणात
घोडे दिसतात , पण एकही हत्ती दिसत नाही , तेव्हा महाराज सहजरीत्या म्हणून गेले , आमच्या फौझेमध्ये , आम्हांस हत्ती ठेवायाची जरवत नाही ; कारण आमचा प्रत्येक मावळा हा हत्तीच्याहून अधिक ताकदवर आहे .
छत्रपती शिवाजी महाराजांच , हे बोलणं कुतुबशहाने खूपच मनावर घेतलं , आणि राजांस सिद्ध करण्यास सांगितले . महाराजांनी कुतुबशहाच्या प्रस्तावास सहमती दर्शविली व कुतुबशहास म्हणाले , उद्या तुम्ही हत्तीशाळेत आखाडयाचा इंतजाम करून ठेवा आणि आमचा जो मावळा तुम्हास हत्तीसोबत लढवायचा असेल त्याला , खुद्द आपण निवडावे . ठरल्याप्रमाणे हत्तीशाळेत आखाडयाचा इंतजाम कुतुबशहाने केला , हा विशेष खेळ पाहण्यासाठी रयतेला सुध्दा बोलावण्यात आले .
काही वेळात , कुतुबशहा आला ; त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज आले . सांगितल्याप्रमाणे , कुतुबशहाने निवड केली , राजांच्याच शेजारी उभे असलेले , येसाजी कंक यांची ! कुतुबशहाने महाराजांस विचारले , क्या ये लढेगा ? राजांनी येसाजी कंकांस आखाडयास उतरविले , आणि येसाजींचा हत्तीसोबत सामना सुरू झाला . पायदळ प्रमुख असल्याने येसाजींना सर्व प्राण्यांची माहिती होती . हत्ती या प्राण्याचा धावण्याचा वेग कमी असतो , त्याचाच फायदा घेऊन येसाजी हत्तीच्या मागे गेले व हत्तीची शेपुट खेचली ( हत्तीची एक कमजोरी होती , हत्तीची शेपूट ओढल्यावर हत्तीला लाथ मारता येत नाही . ) पुढे शेपूट खेचल्यामुळे हत्ती गरागरा फिरायला लागला , येसाजीही त्याबरोबर फिरायला लागला आणि दमून हत्ती बसला व सोंड वर केली , येसाजींनी हीच संधी साधली आणि सापकन सोंडेवर तलवारीचा वार केला , आखाडयात सर्वजण अगदी सुन्न झाले . हत्ती मरण पावला व येसाजींचा विजय झाला .
” शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ ” , हे येसाजींनी सिद्ध केले .
कुतुबशहाने येसाजींना , शाही मंडपाजवल बोलाविण्यात आले , कुतुबशहाने आपल्या गळ्यातील रत्नजडित मोत्याचा कंठा आणि ५ हजार असरफिया बक्षीस दिले ; परंतु त्यावर येसाजी कुतुबशहास म्हटले , ” याची काहीही गरज मला नाही , माझं कौतुक करायला माझे राजे समर्थ आहेत , हा पराक्रम मी राजांच्या चरणी समर्पित करतो ” , एवढं बोलून येसाजी पाच पावलं मागे
जातो . पुढे कुतुबशहाने राजांना एक प्रस्ताव दिला , महाराज असा महापराक्रमी व स्वामिनिष्ठ माणूस आम्हांस द्या , त्याबदल्यात आम्ही तुम्हांस हजारो हत्ती भेट देतो . छत्रपती शिवाजी महाराजांनी , कुतुबशहाच्या या प्रस्तावास स्पष्ट नकार दिला व त्याला म्हटले , तुम्ही माझ्याकडून हजारो हत्ती मागा , आम्ही तुम्हांस नजराणा म्हणून बहाल करू , पण स्वराज्यातील आमचा कोणताही मावळा , आम्ही स्वराज्याच्या बाहेर देणार नाही .
यावरून येसाजींची महाराजांविषयी आपुलकी , पराक्रम आणि स्वामिनिष्ठता सिध्द होते .
दक्षिणदिग्विजय : –
दि. ११ मार्च १६७७ रोजी , राजे हैद्राबादहून निघाले . महाराज जिंजी , वेलोर , यमन गोंडा , आणि पोर्तो नोव्होचा कर्नाटकचा भाग विजापूरच्या ताब्यातून घ्यावयास निघाले . कुतुबशहाने १ हजार घोडदळ , ४ पायदळ आणि एक अनुभवी सेनापती राजांच्या बरोबर दिला .
■ छत्रपती शिवाजी महाराजांचे कर्नाटकातील मुख्यशत्रू :-
(१) शेरखान लोदी : –
हा विजापूरी पठाणी सरदार . हा
त्रिचनापल्लीच्या उत्तरेस सुमारे , ३० मैलांवर , वलिंगडपूर येथे राहत होता . मराठा सरदारांनी , शेरखानविरुद्ध युद्ध केले व त्याचा पराभव केला .
(२) नसीर महमद : –
हा जिंजीच्या किल्याचा किल्लेदार
होता . राजांनी ५ हजार स्वार , कांचीवरून जिंजीवर
रवाना केले , त्यानंतर १६ हजार घोडदळ पाठवून जिंजीला वेढा घातला . मराठ्यांपुढे आपला निभाव लागणार नाही , हे नसीरने जाणून , मराठ्यांच्या अधिकाऱ्यास भेटण्यास आला , व सळोख्याची बोलणी सुरू केली . किल्लेदारास दरसाल ५० हजार उत्पन्नांची जहागीर देण्याचे अमिश दाखविल्यानंतर , त्याने किल्ला मराठ्यांच्या ताब्यात दिला ( दि . १३ मे १६७७ रोजी , जिंजी आणि जिंजीचा किल्ला स्वराज्यात आला ) . राजांनी जिंजीचा किल्ला अगदी थोडक्यात घेतल्यामुळे महाराजांच्या सैन्याची तेथील लोकांना बरीच दहशत बसली .” छत्रपती शिवाजी महाराज कर्नाटकात सर्वत्र यशस्वी होत गेले” .
जिंजीचा किल्लेदार , राजांनी रामजी नलगे , यांस नेमले . आणि जिंजी सुभ्याची सुभेदारी , राजांनी विठ्ठल पिलदेव यांस देवू केली . किल्ल्याची उत्तम डागडुजी करण्याची आज्ञा राजांनी केली .
(३) अब्दुल्लाखान : –
विजापुरचा सुरमा म्हणून , अब्दुल्ल
खानाची ओळख होती . हा किल्ले वेलोरचा किल्लेदार .
राजांनी हा किल्ला घेण्यासाठी जोराची तयारी केली होती .पुढे मराठ्यांनी किल्ल्याला वेढा घातला . अब्दुल्लाखान किल्ला शर्थीने लढवत होता . तेव्हा किल्ल्यावर तोफांचा मारा करण्यासाठी महाराजांनी नजीकच्या २ टेकड्यांवर २ किल्ले बांधले , त्यांची नावे साजरा आणि गोजरा . तोफांचा मारा सुरु झाला . वेळोरचा किल्ला रंगळणार असे दिसताच राजांनी नरहरी रुद्र या सरदारास २ हजार स्वार आणि ५ हजार पायदळ देऊन वेढ्याजवल ठेवले . त्यातच , दि . २० जून ला शेरखान मराठ्यांवर चालून आला , त्याला अडवायला राजे स्वतः गेले . खानाला पळता भुई थोडी झाली . पुढे त्याचा पाठलाग ही केला . शेरखान राजांना शरण आला . त्याची व्हालौर , टेजपठण , भवनगिरीपठण ही ठाणी मराठयांनी ताब्यात घेतली ( ९ जुलै ला ) . दि . १५ जुलैला सईसलामत सोडण्याबदल्यात , शेरखानने राजांशी तह केला , तहानुसार खानाने राजांना त्याचा सर्व मुलुख आणि २० हजार होन रोख दिले . पुढे २२ जुलै १६७७ ला , मराठ्यांनी वेलोर चा किल्लाही जिंकला . कर्नाटकच्या सुभेदारीवर राजांनी , आपला जावई हरजी महाडिक यास नेमले . पुढे कित्येक वर्षे
त्याने कारभार दक्षतेने केला .
कर्नाटकात एक मोठी राज्यसंस्था स्थापून , तिच्या जोगे विजापूरच्या अदिलशाहीस खिळखिळे करून ठेविले . कर्नाटकात शहाजीराजांनी मराठी राज्याची स्थापना करण्याचे योजिले होते ते एकोजीने सिद्धीस नेले . ती शिवाजी महाराजांनी इतकी प्रबळ करून ठेवली की , कोणतीही मुसलमानी सत्ता तिला सहज मोडू शकली नाही .
छत्रपती शिवाजी महाराजांनी , ऑक्टोबर १६७७ मध्ये , आरणी , होसको , बाळापूर इत्यादी पश्चिम
– दक्षिण जोडणारी स्थळे ताब्यात घेऊन राजांनी जिंकलेल्या प्रदेशाची चोख व्यवस्था करून राजे रायगडच्या दिशेने निघाले .
विजय नक्की काय ?
= २२ लक्ष होन मुलखाचा प्रदेश जिंकला . १४ मोठे किल्ले आणि ७२ उपकिल्ले ( गढी , टेकड्या ) जिंकले .
५० लक्ष रक्कम लुतेमध्ये मिळविली . तसेच सोने , हिरे , रत्ने , पाचू यांची गिणती केली नव्हती .
” स्वराज्य दुप्पट वृद्धिंगत झाले ” .
दक्षिणेकडे जाण्यापूर्वी शिवाजी महाराजांनी शंभूराजांना , शृंगारपुराला जावयास सांगितले , व तेथील सुभा संभाळवयास सांगितले आणि स्वराज्याच्या सौरक्षणासाठी तत्पर राहावयास सांगितले .
■ उत्तरदिग्विजय : –
ठरलेल्या योजनेप्रमाणे , जसे छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्यात आले , तेव्हाच शंभूराजांनी दिलेरखानास मिळायचे .
● युवराज संभाजी राजे दिलेरखानाला जाऊन का मिळाले ?
= कारण , सर्जाखान व सिद्दी मसूद ( अदिलशाही प्रमुख सरदार ) , दिलेरखानाशी युती करणार होते , यांचे दोंघांचे सैन्यबळ जवळजवळ ९० हजार होते , जर ह्यांची युती झाली असती , आणि ते स्वराज्यावर चालून आले असते तर , स्वराज्याच खूप प्रमाणात नुकसान झालं असत , मनुष्यहानी झाली असती . त्यामुळे युवराज संभाजी राजे माहुली संगमातून दिलेरखानाला जाऊन मिळाले . आणि
खानाला जावून मिळणे ही उत्तरदिग्विजयाची पहिली पायरी होती .
महामुर्ख दिलेरखान ( मामुरखान ) : –
छत्रपती शिवाजी महाराज , जेव्हा दक्षिणदिग्विजयासाठी २ वर्षे बाहेर होते , तेव्हा संभाजी महाराजांनी हे २ वर्ष , दिलेरखानाला पत्रव्यवहाराने मूर्ख बनविले . शंभूराजे खानाला नेहमी म्हणत , आज येतो , उद्या भेटतो , बोलू असं . ह्या २ वर्ष्यात स्वराज्यावर दिलेरखानाच एकही आक्रमण नाही , हे फक्त युवराज संभाजी महाराजांमुळेच . म्हणोन महामुर्ख दिलेरखान .
युवराज खानाकडे गेले तरी कसे ?
= दि . ३ डिसेंबर १६७८ ला , शंभूराजे परळीच्या किल्ल्यावरून दिलेरखानाकडे जावयास निघाले . परळी ते माहुली अंतर फार कमी आहे , परंतु ते अंतर पार करावयास शंभूराजांना १० दिवस लागले . राजांनी ३ तारखेच्या आधीच , हंबीररावांना २५ हजाराच घोडदळ घेऊन पाठवलं , शंभूराजांचं मतपरिवर्तन करावयास .
प्रश्न हा आहे की , हंबीरराव आणि शंभूराजांची मधल्या या १० दिवसात भेट झाली नसेल का , सर्व नियोजित होते १३ तारखेला दुपारच्या प्रहरी शंभूराजे मोगली छावणीत गेले त्यांच्या पाठोपाठ , रानोअक्का ( छत्रपती शिवाजी महाराजांची कन्या ) ही गेली .
आता प्रश्न असा की , जर शंभूराजांना आधीपासून जर पाठवायचं ठरलेलं तर हंबीररावांना २५ हजाराच घोडदळ देऊज शिवरायांनि का पाठविले ???
= कारण विजापूरी सेना . चुकून शंभूराजांची विजापूरकरांशी चकमक उडाली असती तर ,शंभूराजांच्या सुरक्षेसाठी राजांनी ही तजबीज केली होती .
तसेच जिथेकुठं मोगली , तळ असायचा हंबीरराव
फौझेसह घिरट्या घालायच्या , त्यामुळे दिलेरखानाला वाटायचं शिवा और संभा मे झगडा हुवा था ।
■ संभाजी राजांचे दिलेरखानाकडे जाण्याचे ३ प्रमुख मनसुबे होते ते पुढीलप्रमाणे : –
१. स्वराज्याच सौरक्षण .
२. मोगलांकडील मराठी सरदारांना आपल्या बाजूने फितविणे .
३. शाहजाद्याला , दक्षिणेचा बादशाह च अमिश दाखवून दिल्लीवर चाल करून जाणे ( त्यांच युद्धसाहित्य वापरून त्यांनाच मात देने ).
परंतु शंभूराजांचे पाहिले २ मनसुबे कामयाब होतात , शेवटचा फसतो . पुढे आखणीतून , बहिर्जी नाईक हंबीररावांच्या सहयायने शंभूराजांना बाहेर काढतात . दि . २१ डिसेंबर १६७९ ला शंभूराजे दिलेरखानाची छावणी सोडतात ( रानुअक्का मात्र अडकतात ) . पुढे शंभूराजे तडक स्वराज्यात येत नाहीत प्रथम आदिलशाहीत जातात कारण पुन्हा सर्जाखान , मसूद आणि दिलेरखान यांची युती होवू शकत होती म्हणून विजापूरला जातात १ महिना त्यांना मूर्ख बनवितात . आणि दि . १३ जानेवारी १६८० ला , स्वराज्यात किल्ले पन्हाळ्यावर येतात . पुढे शिवाजी महाराज आणि शंभूराजे यांची पन्हाळ्यावर ऐतिहासिक भेट होते , जवळपास ७ दिवस पिता-पुत्रांमध्ये चर्चा होते . राजे शंभूराजांचे कौतुक करतात . आणि रायगडावर येतात . दोन मोहिमा आटपून शंभूराजेही मागोमाग येनार होते .
■ शंभूराजांनी बनविलेली उत्तरदिग्विजयाची आखणी : –
खालील प्रकारे आक्रमणाची रणनीती होती .
● दक्षिणेतून :-
( १ ) छत्रपती शिवाजी महाराज आणि शंभूराजे .
( २ ) अदिलशहा .
( ३ ) कुतुबशहा .
● उत्तरेतून : –
( १ ) छत्रसाल बुंदेला .
( २ ) लसचिड बड फोकंद ( ओहम ) .
( ३ ) राजपूत .
असे दुतर्फा मोगलांवर आक्रमण करणार , परंतु
दि . ४ एप्रिल १६८० ला छत्रपती शिवाजी महाराजांच निधन होतं व जून महिन्यात फोकंदच निधन होते .
परिणामी उत्तरदिग्विजय खंडित करण्यात येत .
पण १६८१ ते १६८९ , शंभूराजे औरंगजेबाला एकही युद्ध जिंकून देत नाही . पुढे १७ व्या शतकात , पेशवा बाजीराव विश्वनाथ बलाल भट्ट , छत्रपती संभाजी महाराजांचे , ” उत्तरदिग्विजयाचे स्वप्न पूर्ण करतात “ .
संदर्भा : –
छत्रपती शिवाजी महाराज चरित्र ,
खरे जंत्री ,
शिवकाल १६३० – १७०७ ,
शिवाजी निबंधावली ,
नामदेव राव जाधव ,
ऐतिहासिक पत्रे .

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...