विनोद जाधव एक संग्राहक

Wednesday, 24 July 2019

रंगो बापूजी गुप्ते

रंगो बापूजी गुप्ते भोर तालुक्यातील करंजे गावचे..वेळवंड व रोहिडखोरे ह्या दोन तर्फांचे देशपांडे वतन त्यांच्याकडे होते ते भोरच्या पंतसचिवांने लाटले.प्रतापसिंह महाराजांना जहागिरदारांची ताबादारी हवी होती तशी अट त्यांनी जेम्स डफ ला घातली होती..बंडात भोरकर पंतसचिव सामील नव्हते पण रंगो बापूजींनी भोरच्या रयतेत ब्रिटीशांविरूद्ध असंतोष उभा केला होता..मौजे नाटंबी ,मौजे नाझरे तसेच बाजारवाडी ह्या गावातील रामोशी व वतनदार रंगो बापूजींना सामील होते.नेमक्या ह्याच वेळी पंतसचिवांना व ब्रिटीश व्यापारींना हिरडस मावळातील हिरडा उचलायला जनतेने विरोध केला...ह्या कटासाठी शपथा घेतल्याची कथा अजूनही सांगितली जाते ती शपथ किल्ले रोहिड्याच्या पायथ्याशी असलेल्या शिवमंदिरात झाली...शिर्के व अजून एका मुस्लिम वकिलांनंतर रंगो बापूजी इंग्लडला प्रतापसिंह महाराजांची वकील करायला गेले..प्रतापसिंह महाराजांची पदच्युती ब्रिटीश संसदेत मांडली गेली...त्यावेळी ब्रिटीश मित्रांनी रंगो बापूजींचा चांदीचे तबक देऊन सत्कार केला होता

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...