” शिवरायांचे लष्कर व्यवस्थापनकौशल्य “
मराठ्यांचा सुवर्णमय इतिहासया ब्लॉगची निर्मिती करण्याचा मुख्य हेतू सत्य इतिहास सर्व लोकांपर्यंत पोहचविणे , हा आहे . ब्लॉगमधील सर्व माहिती , हि समकालीन ग्रंथांवर , ऐतिहासिक कागद – – पत्रांवर आधारित आहे .
|| भाग – १ || ” शिवरायांचे लष्कर व्यवस्थापनकौशल्य “छत्रपती शिवराय , हिंदुस्तानामध्ये स्वातंत्र्य निर्माण करणारे , अद्वितीय शासक . केवळ ४४ वर्षांमध्ये , ४०० वर्षांची गुलामगिरी दूर केली . स्वराज्य निर्माण करत असताना , शिवरायांना विजापूरच्या आदिलशाहीशी , दिल्लीच्या मोगलशाहीशी , कुतुबशाहीशी , टोपीकर इंग्रजांशी , गोवेकर पोर्तुगीजांशी , फ्रेंचांशी सतत संघर्ष करावा लागत होता . त्यात कमी सैन्य , शस्त्रसाठा , खजिना , रसद यांसहित दुष्काळ . जेथे माणसांना खायला तसेच राहायला काही नाही , तेथे राज्य कसं निर्माण करणार ? परंतु प्रतिकूल परिस्थिती पाहोन डगमडतील ते शिवराय कसे . राजांनी स्वराज्य निर्माण करण्यासाठी गनिमी कावा हि रणनीती अवलंबिली .
■ गनिमी कावा म्हणजे काय ? गनिमी कावा : –‘गनिमी कावा’ म्हणजे गोरिला वॉर .
कमी फौझेने , शत्रूपक्षाचा पूर्णतः पराभव करणे तेही
आपलं कमीत कमी नुकसान करून ….गनिमी कावा हा खालील ३ प्रकारात विभागला आहे :
१. छापा :-छापा म्हणजे जलद गतीने येणे व ३ ते ४ तासात लुटून , कापून त्वरित निघणे .
उदाहरणार्थ : – शाहिस्तेखानावरचा हमला , कल्याणच्या सुभेदारावरील आक्रमण तसेच लूट .
२.मोहीम :-मोहीम म्हणजे विशेष प्रकारचा छापा , मोहीम हि काही दिवसांची असू शकते .
उदाहरणार्थ :- सुरत लूट , कोकणस्वारी .
३.युद्ध :-वरील दोन पर्याय जमत नसतील तर एखाद युद्ध . सुरुवातीला राजे छापे आणि मोहीमाच करत असत . जसं सैन्यबल वाढत गेलं तेव्हा राजे युद्ध करू लागले .
उदाहरणार्थ : – दक्षिणदिग्विजय .तसेच राजांनी काही विशेष युद्धनीती स्वतः निर्माण केल्या , त्या खालीलप्रमाणे : –१. कृष्णकावा : –
‘कृष्णकावा’ म्हणजे , युद्धात शस्त्र न उचलता शत्रूचा सर्वनाश करणे .
उदाहरण क्र. १. मिर्झाराजे जयसिंह ,पुरंदर तहानंतर असे झाले कि , छत्रपतींनी किल्ले घेण्याचा तडाखाच लावला (तेव्हा मिर्झा दख्खन मध्येच होते ) , आणि पुढे शिवप्रभूंनी जहरी चाल खेळली , बादशहास मिर्झाविरुद्ध पत्र लिहिले , याचा परिणाम असा झाला कि , बादशहास असे वाटले , कि मिर्झा शिवाजीस सामील आहे ; त्यामुळे बादशहाने मिर्झाच्या मुन्शीद्वारे , मिर्झास विष देऊन त्याचा खून केला . ‘ मिर्झाविरुद्ध शस्त्रही न उचलता त्यास यमसदनी धाडले ‘.
उदाहरण क्र. २. सिद्दी जौहर , सन १६६० पन्हाळगडाच्या वेड्यातून ;(शिवा काशिद , रणधुरंधर बाजीप्रभु देशपांडे, आणि बांदल यांच्या साहाय्याने ) बाहेर पडल्यावर , विशाळगडावर पोहचल्यावर आदिलशहास एक विलक्षण पत्र लिहिले त्यामुळे , चिडून आदिलशहाने सिद्दीस दरबारात पेश होण्याचा हुकूम सोडला , आपली नाचक्की पाहून सिद्दीने विष खावून आत्महत्या केली . ‘ सिद्दी प्रकरणातही दिसून येते कि , शस्त्रही न उचलता त्यास यमसदनी धाडले ‘. अशाप्रकारे शिवछत्रपतींनी ‘कृष्णकावा’ या युद्धनीतीने औरंगझेब बादशहा आणि अमीन आदिलशहा यांच्या महाबली योध्यास यमसदनी धाडले .
२. इंगीत जाणण्याची कला : –‘इंगीत जाणण्याची कला’ म्हणजे , युद्धातील राजकारणाबद्दल महत्वपूर्ण नीती आहे . या नीतीचा मूळ सूत्र म्हणजे , ‘ आपल्या शत्रूच्या मनात आपल्याविरुद्ध काय रणनीती चालू आहे , याचा अचूक निष्कर्ष लावणे ‘.
उदाहरण क्र. १ . आगऱ्यातून सुटका : –संपूर्ण आग्रा प्रकरण अभ्यासल्यावर समजून येते कि , शिवप्रभूंनी औरंजेबाच्या सर्व योजना अचूक हेरल्या , आणि औरंगजेबाच्या मगरमिठीतून यशस्वी बाहेर पडले . अशाप्रकारे शिवछत्रपतींनी ‘इंगीत जाणण्याची कला’ या युद्धनीतीने औरंगझेबास त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठा अपमान केला .
■ शिवरायांचे लष्कराचे व्यवस्थापन : –छत्रपती शिवाजी महाराज हे नेहमी युद्ध जिंकण्याचे श्रेय हे आपल्या मावळ्यांना देत असत . स्वराज्याच्या सुरुवातीस ( सन १६४६ – १६४७ ) राजांकडे केवळ ८०० ते १२०० सैन्यबळ होते , पुढे स्वराज्याच्या चतरुंग सैन्याची संख्या हि खालीलप्रमाणे होती : –◆ घोडदळ = १ , ५० , ००० . ———- |
◆ पायदळ = २ , ०० , ००० . ———- | १६७९
ते
◆ आरमार = ३० , ००० . ———- | १६८०
◆ हेरखाते = ३ , ००० ते ४ , ००० ———- | विशेष म्हणजे सन १६६५ पर्यंत स्वराज्याचं
सैन्यबळ हे ५० ते ६० हजारांपर्यंत होतं ; त्यातच दि . ९ , १० , ११ जून रोजी ऐतिहासिक महत्वपुर्ण असणारा , ‘ पुरंदरचा तह ‘ झाला . तहानुसार मोगलांना २३ किल्ले , ४ लाख होनांचा मुलुख [ स्वराज्याचा ] , मोगलांच्या प्रदेशावर कुठल्याही परिस्थितीत हल्ला न करणे , तसेच मोगलांना मदत देण्याचे ठरले . ह्या ऐतिहासिक तहामूळे , स्वराज्याच्या विजयी दौडीला पायबंद बसला . परंतू संकटामुळे थांबतील ते शिवराय कसले , त्यांनी ह्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये राजांनी आपली [ स्वराज्याची ] सैन्यक्षमता तसेच सर्वदृष्टीने ताकद वाढविण्याचे ठरविले . तहानंतर राजांकडे १७ दुर्ग होते , आग्राप्रकरणाच्यावेळी दस्तूरखुद्द राजमाता जिजाऊमाँसाहेबांनी रांगणा किल्ला जिंकला , म्हणजे सन १६६६ पर्यंत राजांकडे १८ दुर्ग होते . यानंतर पुढील ३ वर्ष राजांनी सर्व क्षमता वाढविली , एकही बाजू कमकुवत ठेवली नव्हती . आणि दि . ४ फेब्रुवारी १६७० रोजी , नरवीर तानाजी मालुसरे ह्यांनी किल्ले कोंढाणा जिंकून स्वराज्यविस्तारास सुरुवात केली , व पुढच्या ८ वर्षांमध्ये राजांकडे २६० दुर्ग होते . युद्धात सैन्यबलास महत्व असतं , त्याप्रमाणे वा त्याहूनही अधिक महत्व हे सेनापतीस असतं , हे ओळखून छत्रपती शिवरायांनी काही विशेष सेनानींची निर्मिती केली , काही विशेष सेनानींची नावे खालीलप्रमाणे : –★ तानाजी मालुसरे .
★ फिरंगोजी नरसाळा .
◆ कमलोजी साळुंके .
★ बाजीप्रभू देशपांडे .
★ मुरारबाजी .
★ संभाजी कावजी .
★ कोंडाजी फर्जंद . तसेच शिवरायांनी योग्यवेळी योग्य सेनानीचा वापर केला , त्यामुळे ‘ विजयश्री मराठ्यांच्या बाजूने असत ‘ , सतराव्या शतकात ” शिवराय व विजय ” हे समीकरण सर्वत्र झाले . शिवरायांनी सर्वांना बरोबर घेऊन काहीही नसताना , प्रतिकूल परिस्थतीवर मात करत , ” स्वराज्यनिर्मिती ” केली . छत्रपती शिवरायांबद्दल सर्वोत्तम गुण म्हणजे , सैन्याला दिलेली प्रेरकशक्ती . १७ व्या शतकापर्यंत किंबहुना त्यानंतरही , रणांगणात सेनापती पडल्यानंतर ( धारातीर्थी ) सैन्याची पळापळ व्हायची , आणि हार स्वीकारावी लागत ; परंतु शिवरायांनी हे ओळखून सैन्याला ह्याबाबतीत उत्तम शिक्षण दिले . शिवचरित्रात अनेक उदाहरणं आहेत , म्हणोनच छत्रपती शिवरायांना दूरदृष्टी असणारा शासक संबोधले जातं .
■ शिवराय आणि खजिना : –कुठल्याही मोहिमेसाठी खूप प्रमाणात पैसा खर्च होतो , म्हणोन शिवरायांनी पैशाचं योग्य व्यवस्थापन केलं होत . विशेष म्हणजे , राजांनी मोगलांच्या भविष्यातील संघर्षासाठी १ , २५ ००० होन इतकी रक्कम राखून ठेवली होती . ह्यामुळेच पुढे सन १६८१ – १७०७ च्या औरंगजेबाच्या स्वारीला मराठ्यांनी योग्य प्रत्युत्तर दिले , ” आणि नंतर स्वराज्याचं साम्राज्यात रूपांतर झालं ” .
No comments:
Post a Comment