विनोद जाधव एक संग्राहक

Thursday, 25 July 2019

” तारापूरची लढाई “

” तारापूरची लढाई “

।। छत्रपती संभाजी महाराजांचा विजय आहे . ।।
” तारापूरची लढाई “
【 शंभूराजांच्या आयुष्यातील महत्वपूर्ण पराक्रम 】
छत्रपती संभाजी महाराज , आपल्या एकंदर कारकिर्दीत , १६८ युद्धांवर , स्वतः आघाडीवर होते . ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस्’ नुसार , आपल्या कारकिर्दीत एकही युद्ध न हरणारा , जगातील एकमेव राजा म्हणजेच , ” छत्रपती संभाजी महाराज ” .
या विशेष लेखात , शंभूराजांच्या महान पराक्रमां- -पैकी , एक पराक्रम आपण अभ्यासणार आहोत .
इ.स. १६८३ , औरंगझेबाने छत्रपती संभाजी महाराजांचा , वाढता प्रभाव पाहून , संभाजी महाराजांवर मात करण्यासाठी , त्याने इंग्रज , डच , पोर्तुगीज यांना संभाजी राजांविरुद्ध बंड करण्याचा हुकूम जारी केला .
यावेळी पोर्तुगीज , संभाजी महाराजांबरोबर राजनीती करत होते . एका बाजूने त्यांनी , औरंगझेबाचे सैन्य उत्तर फिरंगणातून विनाहरकत जाऊन दिले , तर दुसरीकडे शंभूराजांनी मैत्रीची भाषा करून , मराठ्यांचा गोव्यातील वकील येसाजी गंभीरराव यास अटक केली . परिणाम असा झाला कि , दि. १५ एप्रिल १६८३ ला , पोर्तुगीजांचं राजकारण ओळखून , शंभूराजांनी स्वतः १००० घोडदळ आणि २००० पायदळ घेऊन , तारपूरच्या किल्ल्यावर आक्रमण केले , आणि किल्ल्याबाहेरील बराचसा शहरी भाग जाळला , दोन पोर्तुगीज पादरीही कैद झाले . तारापूरच्या पोर्तुगीज वखारीचा अधिकारी , मॅन्युअल अल्वारेस ह्यने , मराठ्यांना प्रतिकार केला , आणि गोव्या लाही सर्व वृत्तांत कळवला . पुढे मराठयांनी , पोर्तुगीजां – ची रसद मारली . याचा परिणाम असा झाला की , पोर्तुगीजांना माघार घ्यावी लागली आणि येसाजीलाही सोडून द्यावे लागले . पुढे मराठा-पोर्तुगीज वाईट होत गेले , आणिसन १६८४ ला शंभूराजांनी दक्षिण फिरंगणात , एक मोहीम केली , ज्याला आपण गोवा मोहीम म्हणतो , परंतुया मोहिमेदरम्यान तारापूर काही मराठ्यांच्या ताब्यात आले नाही , कारण मोहीम गोव्याच्या दिशेने फिरली आणि पुढे शाहजादा मुअझम कोकणात उतरला .
छत्रपती संभाजी महाराजांच्या रणनितीत , मराठ्यांनी पोर्तुगीजांविरुद्ध २३ युद्धे लढली आणि सर्वात विजयी झाले .

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...