विनोद जाधव एक संग्राहक

Thursday, 25 July 2019

मराठ्यांचा_वऱ्हाडावरील_पहीला_हल्ला कारंजाची_लुट

मराठ्यांचा_वऱ्हाडावरील_पहीला_हल्ला कारंजाची_लुट

#मराठ्यांचा_वऱ्हाडावरील_पहीला_हल्ला
#कारंजाची_लुट
दाऊदखानाचा दिंडोरी येथे १७ ऑक्टोबर १६७० रोजी मराठ्यांकडून पराभव , आणि वऱ्हाडवर हल्ले –
सुरतेच्या दुसऱ्या लुटीनंतर शिवाजी महाराजांनी बागलाणात प्रवेश केला आणि मुल्हेर किल्ल्याच्या पायथ्या जवळची खेडी लुटली .मराठा हल्लेखोरांचार चाल करून जाण्याकरिता दाऊदखानाला बुऱ्हाणपूरहुन बोलाविण्यात आले गेले होते. चांदोर ह्या गावी पोहोचल्या दाऊदखान व त्याच्या फौजा , ह्या ठिकाणाहून बागलाणातून नाशिककडे जाणारी वाट डोंगराच्या रांगांना ओलांडत होती. १६ ऑक्टोबरच्या मध्यरात्रीनंतर त्याच्या ( बहादूरखान ) हेरांनी बातमी आणली की शिवाजीने यापूर्वीच घाट ओलांडला असून त्यांचप्रमाणे त्याची उरलेली अर्धी फौज पाठीमागे राहिलेल्या लोकांना जमा करण्यासाठी घाटावरील मोक्याची ठिकाणे धरून आहे. दाऊदखानाने यावर ताबडतोब कूच करण्यास सुरुवात केली , मोगल फौजेच्या बिनीला इखलासखान मियाना हा अधिकारी होता .उजाडता उजाडता त्याच्या नजरेला शत्रूसैनिक पडले . आपल्या सैनिकांची कुमक येण्याची वाट न पाहता त्याने शत्रूवर हल्ला चढविला होता. मराठ्यांच्या पिछाडीने आता पलट खाल्ली . ह्या पिछाडीत १० हजार सैनिक होते आणि त्यांचे अधिपत्य प्रतापराव गुजर ( घोडदळाचा प्रमुख ) , व्यंकाजी दत्तो आणि मकाजी आनंदराव ( शहाजी महाराजांचा अनौरस मुलगा ) या नावाजलेल्या सेनानींकडे होते. झालेल्या लढाईत इखलासखान हा लौकरच जखमी झाला आणि घोड्यावरून खाली पडला . काही काळानंतर दाऊदखान त्या ठिकाणी आला आणि त्याने आपल्या बिनीकडे कुमक पोहोचवली . काही प्रहरपर्यंत अतिशय निकराचे युद्ध झाले आणि ह्या युद्धात भयानक रक्तपात झाला .
दक्षिणेतील बारगिंच्याप्रमाणे बादशाही फौजेभोवती घिरट्या घालीत मराठ्यांनी लढा दिला. परंतु मोगलांच्या फौजेतील बुंदेला पायदळाने आपल्या जवळील विपुल तोफखान्याचा मारा करून शत्रूला पाठीमागे रोखले. दुपारच्या वेळी लढाईत थोडा खंड पडला. संध्याकाळी मराठ्यांनी मोगलांवर पुन्हा हल्ला चढविला , परंतु तोफांच्या माऱ्याने हल्ला थांबला गेला. रात्रीच्या वेळी उघड्या आकाशाखाली मोगलांनी आपली तात्पुरती छावणी केली आणि छावणी सभोवार खंदक खणण्यात आले होते. मृतांचे दफन करण्यात आणि जखमींची शुश्रुषा करण्यात मोगल सैनिक गढून गेले होते. ह्यानंतर कुठल्याही प्रकारे प्रतिहल्ला न करता मराठ्यांनी कोकणच्या दिशेने मागर घेतली. या घटनेला एक आठवडा झाला नाही तोच मराठ्यांच्या पेशव्याने नाशिक जिल्ह्यातील त्रिंबकचा किल्ला जिंकून घेतला . या लढाईमुळे जवळ जवळ पुढील १ महिनाभर मोगली सत्तेचा शक्तिपात झाल्यासारखे झाले होते. लढाईनंतर ३ दिवसांनी दाऊदखानाने आपल्या सैन्यातील उरल्या सुरल्या लोकांना घेऊन नाशिककडे कूच केले. त्याठिकाणी आपले झालेले नुकसान भरून काढण्यासाठी त्याने १ महिनाभर मुक्काम केला . नोव्हेंबरच्या अखेरीस त्याने अहमदनगरकडे कूच केले आणि डिसेंबरच्या सुरवातीला प्रतापरावगुजर ह्यांच्या हाताखाली एका मराठा सैन्याच्या तुकडीने खानदेशात छापा घातला. वाटेत त्यांनी बागलाणातील अहिवंत आणि इतर ३ किल्ले जिंकून घेतले आणि तिथून झपाट्याने कूच करून बुऱ्हाणपूरापासून २ मैलांवर असलेले बहादूरपुरा हे खेडेगाव लुटले.
प्रतापरावगुजर ह्यानंतर वऱ्हाडात शिरले आणि अचानक कोणाची अपेक्षा नसताना करंजा या श्रीमंत आणि संपन्न शहरावर त्याने छापा घातला आणि साफ लुटून काढले . कापड ,सोने , आणि चांदी वैगरे मिळून १ कोटीचा माल प्रतापरावांनी लुटला आणि त्याचबरोबर ४ हजार बैल आणि गाढवे हस्तगत केलेली आहेत. शहरातील सर्व श्रीमंत व्यक्तींना दंडादाखल ओलीस म्हणून पकडून नेण्यात आले होते. इतर शहारातूनही मराठ्यांना दंडादाखल मोठ्या रकमा मिळाल्या कारण वऱ्हाडचा प्रांत श्रीमंत होता. जवळ जवळ अर्ध्या शतका पेक्षा अधिक काल शांतता आणि सुबत्ता यामध्ये गेल्यामुळे तिथे प्रचंड संपत्ती साठलेली होती. त्यामुळे मराठ्यांनी वऱ्हाडवर केलेला हा पहिला हल्ला म्हणजे हल्लेखोरांना वाढवून आलेली ती एक पर्वणीच होती.
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
#जय_जिजाऊ
#जय_शिवराय

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...