” बुऱ्हाणपूरच धन “
।। छत्रपती संभाजी महाराजांचा विजय आहे . ।।
छत्रपती संभाजी महाराजांच्या राज्यभिषेकानंतर ,
पहिली स्वतःच्या नियोजनानुसार आखण्यात आलेली , महत्वाची मोहीम .
बुऱ्हाणपूर अतिशय समृद्ध नगर . व्यापार आणि
कलेचं क्षेत्र . बुऱ्हाणपूरमध्ये , अनेक विद्वान माणसं तेथे राहायची , शेख मुस्तफा अली याने १०० ग्रंथ कुराणावर लिहिले होते . अशी प्रचंड बुद्धीमत्ता असणारी , माणसं बुऱ्हाणपूरमध्ये वास्तव्य करत होती . या नगरात मोठ — मोठी उद्याने व ३ मोठी तलाव होती आणि आहेत ( आज देखील १ तलावाच पाणी , पिण्यास नगरवासी वापरतात ) . तापी आणि मोहना नदीच्या तीरावर हे नगर वसलेलं आहे .
बुऱ्हाणपूरमध्ये व्यापारी पेठांचे , संपत्तीने खचाखच भरलेले १८ पुरे होते . ” औरंगजेब सुरत हे नाकातील नथ समजत असे , तर त्या नथीतील चमकणारा मोती म्हणजे , ‘ बुऱ्हाणपूर ‘ समजत असे ” . त्यामुळे बुऱ्हाणपूरला त्याने पूर्णपणे लक्ष केंद्रित केले , म्हणूनच बुऱ्हाणपूरची सुभेदारी आपल्या जवळच्या माणसाकडे देत असे . सन १६८० पासून , बुऱ्हाणपूर सुभ्याचा सुभेदार , हा त्याचा मावसभाऊ बहादूरशहा कोकलताशकडे ( पेडगावचा शहाना ) , याला दिली होती . बुऱ्हाणपूरच्या सौरक्षणासाठी ८ हजार सैन्याची नियुक्ती केली होती , तसेच भरपूर प्रमाणात शस्त्रसाठा व दारूगोळा होता .
जानेवारी १६८१ च्या सुरुवातीस , बहादूरखान आपल्या पुतण्याच्या लग्नासाठी हैद्राबाद ला गेला होता बरोबर त्याने ३००० सैनिक सुरक्षेसाठी घेतले होते व बुऱ्हाणपूरची पूर्ण जबाबदारी काकरखान या अनुभवी सरदारावर सोपविली होती . तसेच जवळच सुरत शहर आहे , त्यामुळे बहादूरखान निर्धास्त होता आणि शानशौकी मध्ये धुंद होता , ह्याचाच शंभूराजांनी फायदा घेतला आणि मोहिमेची आखणी केली . बहिर्जी नाईकांनी सर्व बारीक सारीक माहिती राजानपर्यंत पोहचविली , त्यानुसार राजे डाव टाकत होते . राजांच्या योजनेनुसार २० हजाराचे घोडदळ घेऊन , हंबीररावांना सुरतेच्या दिशेने पाठविले परंतु त्यांचे लक्ष ( ध्येय ) बुऱ्हाणपूर होतं . सुरतेची नुसती हूल होती . हा राजांच्या गनिमी काव्याचा भाग होता . काकरखान शंभूराजांच्या काव्याला फसला आणि त्याने सुरतेच्या रक्षणासाठी ३ हजार सैन्य आणि दारूगोळा पाठविला .’ मराठयांनी राजकिय डाव लढाई होण्याच्या आधीच जिंकला होता ‘ . आता बुऱ्हाणपूरमध्ये फक्त २ हजार सैन्य होते . हंबीरराव बुऱ्हाणपूरच्या वेशीपर्यंत पोहोचले . काकरखान हा प्रकार समजला तेव्हा तो हबकला .
काकरखान आपल्या हेरांना विचारतोय , मराठ्यांचा सेनापती कोण आहे ? ( या मोहिमेचा )
हेरांनी उत्तर दिले , ” शंभूराजे ” !!! त्यावर काकरखान म्हणाला , नामुकीन ऐसा हो ही नही सकता | संभा नही आ सकता | काकरखान काय सुरुवातीला हंबीररावांचा सुद्धा विश्वास बसला नाही ; कारण ५ दिवसांपूर्वी राजे रायगडावर होते , एवढे अंतर इतक्या कमी वेळात कसे पार पाडले , हे कोडं आजदेखील सुटत नाही ; परंतु राजांनी आपल्या कर्तृत्वाने सिद्ध केले . बुऱ्हाणपूरच्या
श्रीमंत व्यापाऱ्यांनी , काकरखानाची झोप उडविली होती . व मराठे बुऱ्हाणपूरच्या सीमेवर आल्याची माहिती , काकरखानास मिळाली . शंभूराजांनी गनिमी काव्याच्या युद्धतंत्राने काकरखानास घेरले होते ; कारण त्याच्याकडे फक्त २ हजार सैन्य होते . नेहमी मोगलांकडे सैन्य जास्त आणि मराठ्यांकडे सैन्य कमी असायचे , तरी विजय मराठ्यांचाच व्हायचा . काकरखानास काय करावे सुचत नव्हते , त्याने बुऱ्हाणपूरमधील सर्व खाजगी सैन्य बोलावून घेतले , आता मोगलांचे सैन्यबळ २,५०० झाले . काकर – खानाने एक योजना आखली , ती अशी कि , आपण मराठ्यांचाच युद्धनीतीचा अवलंब करायाचा , काकरखाना ने रात्रीच मराठ्यांवर हमला केला , परंतु मोगलांना त्याचा काहीच फायदा झाला नाही ; कारण मराठे सावध होते . शंभूराजांनी मावळ्यांसह , काकरखानाच्या हशमांना सपासप कापायला सुरुवात केली , मोगलांची पीछेहाट झाली , काकरखानाची तर पळता भुई थोडी झाली . कसे बसे , मोगल बुऱ्हाणपूरमध्ये पळून गेले . शत्रूपक्षाचे मोठया प्रमाणात नुकसान झाले .
【 टीप : – मराठयांनी रात्र व दिवस कधीच वेगळा मानला नाही . 】
दुसऱ्या दिवशी , मराठयांनी आपली रणनिती
सूरू केली . मराठयांनी आपला मोर्चा बहादूरपुऱ्याकडे वळविला . एके बाजूला सीमेवर हंबीररावांनी लढाईच नाटक चालू ठेवले ; कारण १८ पुऱ्यामध्ये बहादूरपुरा संपत्तीने खचाखच भरलेला होता . येथे बुऱ्हाणपूरमधील सर्वात धनाढ्य व्यापाऱ्यांची , श्रीमंत बाजारपेठ होती आणि तत्कालीन जगामधील सोने व चांदी पासून वस्त्रे
बनविण्याचा व्यवसाय फक्त बुऱ्हाणपूरमधील ह्याच
बहादूरपुऱ्यामध्ये होत असे . शंभूराजांनी बहादूरपुऱ्यात येणाऱ्या सर्व रस्त्यांची नाकेबंदी केली . चौक्या व बुरूज आपल्या ताब्यात घेतले . बहादूरपुऱ्याच्या सभोवताली मराठ्यांच्याचे कडे उभे राहिले , नंतर मराठयांनी बहादूर – पुऱ्यातील अमौलीक रत्ने , सोनं , अमूल्य वस्तू , हिरे ,
मोती , पाचू , मणिक , पोवळे आपल्या ताब्यात घ्यावयास सुरवात केली . बहादूरपुऱ्यानंतर शंभूराजांनी हसनपुरा , शहागंजपुरा , खईमपुरा , शहाजहानपुरा , नवाबपुरा , औरंगजेबपुरा , असे पुरे लुटून फस्त केले . कोट्यवधीची दौलत जमा झाली , संपत्तीचे डोंगरच जमा झाले . जवळपास ४ दिवस लूट चालू होती , संपत्ती मराठे जमिनी मधून ( तळघरातून ) खोदून काढत होते . श्रीमंत व्यापरांचे बंगले , वाडे शंभूराजांनी जाळण्याचे आदेश मावळ्यांना दिले ( गरीब रयतेच्या घराला मावळ्यांनी हात सुद्धा लावला नाही ) . बुऱ्हाणपूरमध्ये ” संभाजी ” नावाची नुसती दहशत निर्माण झाली होती .
पुढे बहादूरखानाला , त्याच्या खबरदारांनी ही
गोष्ट सांगितली , आता तो येणार हे राजांना ठाऊक होते .
शंभूराजांनी सैन्याची दोन तुकड्यांनमध्ये विभागणी केली . एक तुकडी , शंभूराजांसह संपत्तीला घेऊन , साल्हेरमार्गे रायगडाला जाईल . आणि दुसरी तुकडी औरंगाबादला जाईल .
औरंगाबादचे मूळ नाव खडकी होते , जेव्हा औरंगजेब दक्षिणेचा सुभेदार होता , तेव्हा त्याने खडकीच नाव औरंगाबाद ठेवले , त्याने तेथे एक महाल देखील बांधला होता , त्या महालाचे नाव होते , औरंगजेबमहाल .
मराठयांनी औरंगाबादही लुटले , जाळपोळ केली ,
” शंभूराजांनी बुऱ्हाणपूर व औरंगाबाद लुटून , औरंगजेबाला आव्हान दिले ” .
■ शहजादा अकबर जो शंभूराजांच्या आश्रयाला होता , त्याने बुऱ्हाणपूर व औरंगाबाद लुटीनंतर , औरंगजेबाला एक पत्र लिहिले त्या पत्रात तो असे म्हणतो , ” आब्बाजान , बुऱ्हाणपूर म्हणजे दक्षिणेतील स्वर्गच ते संभाजी राजांनी उध्वस्त केलंय . औरंगाबाद शहर तुम्ही , तुमच्या नावाने वसवलत , ते औरंगाबाद शहर संभाजी राजांमुळे पाऱ्यासारखे वितळून गेलंय ” . [ मोगलांचा पत्रव्यवहार पर्शियन भाषेत असायचा व अत्यंत अलंकारीक असायचा , पत्रात काव्यपंक्ती ही असायच्या . ]
बुऱ्हाणपूर आणि औरंगाबाद लुटीनंतर स्वराज्याच्या खजिन्यात मोठ्या प्रमाणात भर झाली .
त्यामुळे पुढे कधीही स्वराज्य आर्थिक मंदीत सापडले नाही . सुरतेच्या लुटीपेक्षा अधिक धन बुऱ्हाणपूर लुटीत मराठ्यांना मिळाले . शंभूराजांच्या नेतृत्वकौशल्यामुळे मराठ्यांना एवढे मोठे यश प्राप्त झाले .
संभाजी ,
महाराष्ट्राचा इतिहास ,
शिवकाल १६३० ते १७०७ ,
ज्वलनज्वलंततेजस संभाजी ,
रणवीर संभाजी ,
खरा संभाजी ,
बखरी ,
ऐतिहासिक पत्रे.
” बुऱ्हाणपूरच धन “[ उत्तम नियोजनबद्ध मोहीम ]
छत्रपती संभाजी महाराजांच्या राज्यभिषेकानंतर ,
पहिली स्वतःच्या नियोजनानुसार आखण्यात आलेली , महत्वाची मोहीम .
■ बुऱ्हाणपूर बद्दल माहिती : –बुऱ्हाणपूर , दक्षिण व उत्तर प्रांत जोडणार , असं शहर . बुऱ्हाणपूरच मूळ नाव ‘बसना’ पूर्वी बसनावर , आशयाराजा राज्य करीत होता . आशया राजाचा , नासीर फारुकी नावाचा राजा (खानदेश प्रांताचा) , मित्र होता आणि त्याचा नासीरवर खूप विश्वास होता . परंतु नासिर त्या लायकीचा नव्हता ,विश्वासघातकी होता . एके दिवशी योग्य संधी साधून , नासिरने पालख्यांमध्ये बुरखा घालून सैनिकांना , बसनाच्या राजवाड्यात , आणले आणि नासिरने आशयाराजा व राजपरीवाराची कत्तल केली . पुढे नासिर फारुकी बसना व खान्देशाचा शासक झाला . हे यश आपल्याला , बुऱ्हाउद्दीन नावाच्या संतामुळेच मिळाले , म्हणून नासिरने बसनाच नाव , ” बुऱ्हाणपूर ” ठेवलं . पुढे मोगलांच्या ताब्यात बुऱ्हाणपूर आलं .
बुऱ्हाणपूर अतिशय समृद्ध नगर . व्यापार आणि
कलेचं क्षेत्र . बुऱ्हाणपूरमध्ये , अनेक विद्वान माणसं तेथे राहायची , शेख मुस्तफा अली याने १०० ग्रंथ कुराणावर लिहिले होते . अशी प्रचंड बुद्धीमत्ता असणारी , माणसं बुऱ्हाणपूरमध्ये वास्तव्य करत होती . या नगरात मोठ — मोठी उद्याने व ३ मोठी तलाव होती आणि आहेत ( आज देखील १ तलावाच पाणी , पिण्यास नगरवासी वापरतात ) . तापी आणि मोहना नदीच्या तीरावर हे नगर वसलेलं आहे .
बुऱ्हाणपूरमध्ये व्यापारी पेठांचे , संपत्तीने खचाखच भरलेले १८ पुरे होते . ” औरंगजेब सुरत हे नाकातील नथ समजत असे , तर त्या नथीतील चमकणारा मोती म्हणजे , ‘ बुऱ्हाणपूर ‘ समजत असे ” . त्यामुळे बुऱ्हाणपूरला त्याने पूर्णपणे लक्ष केंद्रित केले , म्हणूनच बुऱ्हाणपूरची सुभेदारी आपल्या जवळच्या माणसाकडे देत असे . सन १६८० पासून , बुऱ्हाणपूर सुभ्याचा सुभेदार , हा त्याचा मावसभाऊ बहादूरशहा कोकलताशकडे ( पेडगावचा शहाना ) , याला दिली होती . बुऱ्हाणपूरच्या सौरक्षणासाठी ८ हजार सैन्याची नियुक्ती केली होती , तसेच भरपूर प्रमाणात शस्त्रसाठा व दारूगोळा होता .
जानेवारी १६८१ च्या सुरुवातीस , बहादूरखान आपल्या पुतण्याच्या लग्नासाठी हैद्राबाद ला गेला होता बरोबर त्याने ३००० सैनिक सुरक्षेसाठी घेतले होते व बुऱ्हाणपूरची पूर्ण जबाबदारी काकरखान या अनुभवी सरदारावर सोपविली होती . तसेच जवळच सुरत शहर आहे , त्यामुळे बहादूरखान निर्धास्त होता आणि शानशौकी मध्ये धुंद होता , ह्याचाच शंभूराजांनी फायदा घेतला आणि मोहिमेची आखणी केली . बहिर्जी नाईकांनी सर्व बारीक सारीक माहिती राजानपर्यंत पोहचविली , त्यानुसार राजे डाव टाकत होते . राजांच्या योजनेनुसार २० हजाराचे घोडदळ घेऊन , हंबीररावांना सुरतेच्या दिशेने पाठविले परंतु त्यांचे लक्ष ( ध्येय ) बुऱ्हाणपूर होतं . सुरतेची नुसती हूल होती . हा राजांच्या गनिमी काव्याचा भाग होता . काकरखान शंभूराजांच्या काव्याला फसला आणि त्याने सुरतेच्या रक्षणासाठी ३ हजार सैन्य आणि दारूगोळा पाठविला .’ मराठयांनी राजकिय डाव लढाई होण्याच्या आधीच जिंकला होता ‘ . आता बुऱ्हाणपूरमध्ये फक्त २ हजार सैन्य होते . हंबीरराव बुऱ्हाणपूरच्या वेशीपर्यंत पोहोचले . काकरखान हा प्रकार समजला तेव्हा तो हबकला .
काकरखान आपल्या हेरांना विचारतोय , मराठ्यांचा सेनापती कोण आहे ? ( या मोहिमेचा )
हेरांनी उत्तर दिले , ” शंभूराजे ” !!! त्यावर काकरखान म्हणाला , नामुकीन ऐसा हो ही नही सकता | संभा नही आ सकता | काकरखान काय सुरुवातीला हंबीररावांचा सुद्धा विश्वास बसला नाही ; कारण ५ दिवसांपूर्वी राजे रायगडावर होते , एवढे अंतर इतक्या कमी वेळात कसे पार पाडले , हे कोडं आजदेखील सुटत नाही ; परंतु राजांनी आपल्या कर्तृत्वाने सिद्ध केले . बुऱ्हाणपूरच्या
श्रीमंत व्यापाऱ्यांनी , काकरखानाची झोप उडविली होती . व मराठे बुऱ्हाणपूरच्या सीमेवर आल्याची माहिती , काकरखानास मिळाली . शंभूराजांनी गनिमी काव्याच्या युद्धतंत्राने काकरखानास घेरले होते ; कारण त्याच्याकडे फक्त २ हजार सैन्य होते . नेहमी मोगलांकडे सैन्य जास्त आणि मराठ्यांकडे सैन्य कमी असायचे , तरी विजय मराठ्यांचाच व्हायचा . काकरखानास काय करावे सुचत नव्हते , त्याने बुऱ्हाणपूरमधील सर्व खाजगी सैन्य बोलावून घेतले , आता मोगलांचे सैन्यबळ २,५०० झाले . काकर – खानाने एक योजना आखली , ती अशी कि , आपण मराठ्यांचाच युद्धनीतीचा अवलंब करायाचा , काकरखाना ने रात्रीच मराठ्यांवर हमला केला , परंतु मोगलांना त्याचा काहीच फायदा झाला नाही ; कारण मराठे सावध होते . शंभूराजांनी मावळ्यांसह , काकरखानाच्या हशमांना सपासप कापायला सुरुवात केली , मोगलांची पीछेहाट झाली , काकरखानाची तर पळता भुई थोडी झाली . कसे बसे , मोगल बुऱ्हाणपूरमध्ये पळून गेले . शत्रूपक्षाचे मोठया प्रमाणात नुकसान झाले .
【 टीप : – मराठयांनी रात्र व दिवस कधीच वेगळा मानला नाही . 】
दुसऱ्या दिवशी , मराठयांनी आपली रणनिती
सूरू केली . मराठयांनी आपला मोर्चा बहादूरपुऱ्याकडे वळविला . एके बाजूला सीमेवर हंबीररावांनी लढाईच नाटक चालू ठेवले ; कारण १८ पुऱ्यामध्ये बहादूरपुरा संपत्तीने खचाखच भरलेला होता . येथे बुऱ्हाणपूरमधील सर्वात धनाढ्य व्यापाऱ्यांची , श्रीमंत बाजारपेठ होती आणि तत्कालीन जगामधील सोने व चांदी पासून वस्त्रे
बनविण्याचा व्यवसाय फक्त बुऱ्हाणपूरमधील ह्याच
बहादूरपुऱ्यामध्ये होत असे . शंभूराजांनी बहादूरपुऱ्यात येणाऱ्या सर्व रस्त्यांची नाकेबंदी केली . चौक्या व बुरूज आपल्या ताब्यात घेतले . बहादूरपुऱ्याच्या सभोवताली मराठ्यांच्याचे कडे उभे राहिले , नंतर मराठयांनी बहादूर – पुऱ्यातील अमौलीक रत्ने , सोनं , अमूल्य वस्तू , हिरे ,
मोती , पाचू , मणिक , पोवळे आपल्या ताब्यात घ्यावयास सुरवात केली . बहादूरपुऱ्यानंतर शंभूराजांनी हसनपुरा , शहागंजपुरा , खईमपुरा , शहाजहानपुरा , नवाबपुरा , औरंगजेबपुरा , असे पुरे लुटून फस्त केले . कोट्यवधीची दौलत जमा झाली , संपत्तीचे डोंगरच जमा झाले . जवळपास ४ दिवस लूट चालू होती , संपत्ती मराठे जमिनी मधून ( तळघरातून ) खोदून काढत होते . श्रीमंत व्यापरांचे बंगले , वाडे शंभूराजांनी जाळण्याचे आदेश मावळ्यांना दिले ( गरीब रयतेच्या घराला मावळ्यांनी हात सुद्धा लावला नाही ) . बुऱ्हाणपूरमध्ये ” संभाजी ” नावाची नुसती दहशत निर्माण झाली होती .
पुढे बहादूरखानाला , त्याच्या खबरदारांनी ही
गोष्ट सांगितली , आता तो येणार हे राजांना ठाऊक होते .
शंभूराजांनी सैन्याची दोन तुकड्यांनमध्ये विभागणी केली . एक तुकडी , शंभूराजांसह संपत्तीला घेऊन , साल्हेरमार्गे रायगडाला जाईल . आणि दुसरी तुकडी औरंगाबादला जाईल .
■ बुऱ्हाणपूर ते रायगड प्रवास : –शंभूराजांना खात्री होती की , बहादूरखान आपल्यावर नक्की गाठेल . पण त्याच्या – साठी शंभूराजांनी एक विशेष योजना आखलेली . रायगडला एदलाबाद मार्गे जातोय , अशी अफवा राजांनी बहिर्जी नाईकांमार्फत पसरविली . बहादूरखान एदलाबादला सैन्यासह दबा धरून बसलेला होता , राजे साल्हेर मार्गे सर्व संपत्तीसह रायगडावर पोहचले . आणि बहादूरखान एदलाबादहून हात हलवतच गेला . पेडगावचा शहाणा हा नावलौकिक , बहादूरखानाने पुन्हा सिद्ध केलं .
■ औरंगाबादची मोहीम : –मराठ्यांचे १० हजार मावळ्यांचे लष्कर , शंभूराजांनी औरंगाबादला पाठविले .
औरंगाबादचे मूळ नाव खडकी होते , जेव्हा औरंगजेब दक्षिणेचा सुभेदार होता , तेव्हा त्याने खडकीच नाव औरंगाबाद ठेवले , त्याने तेथे एक महाल देखील बांधला होता , त्या महालाचे नाव होते , औरंगजेबमहाल .
मराठयांनी औरंगाबादही लुटले , जाळपोळ केली ,
” शंभूराजांनी बुऱ्हाणपूर व औरंगाबाद लुटून , औरंगजेबाला आव्हान दिले ” .
■ शहजादा अकबर जो शंभूराजांच्या आश्रयाला होता , त्याने बुऱ्हाणपूर व औरंगाबाद लुटीनंतर , औरंगजेबाला एक पत्र लिहिले त्या पत्रात तो असे म्हणतो , ” आब्बाजान , बुऱ्हाणपूर म्हणजे दक्षिणेतील स्वर्गच ते संभाजी राजांनी उध्वस्त केलंय . औरंगाबाद शहर तुम्ही , तुमच्या नावाने वसवलत , ते औरंगाबाद शहर संभाजी राजांमुळे पाऱ्यासारखे वितळून गेलंय ” . [ मोगलांचा पत्रव्यवहार पर्शियन भाषेत असायचा व अत्यंत अलंकारीक असायचा , पत्रात काव्यपंक्ती ही असायच्या . ]
बुऱ्हाणपूर आणि औरंगाबाद लुटीनंतर स्वराज्याच्या खजिन्यात मोठ्या प्रमाणात भर झाली .
त्यामुळे पुढे कधीही स्वराज्य आर्थिक मंदीत सापडले नाही . सुरतेच्या लुटीपेक्षा अधिक धन बुऱ्हाणपूर लुटीत मराठ्यांना मिळाले . शंभूराजांच्या नेतृत्वकौशल्यामुळे मराठ्यांना एवढे मोठे यश प्राप्त झाले .
◆ संदर्भ : –छत्रपती संभाजी महाराज ( वा. सी. बेंद्रे ) ,
संभाजी ,
महाराष्ट्राचा इतिहास ,
शिवकाल १६३० ते १७०७ ,
ज्वलनज्वलंततेजस संभाजी ,
रणवीर संभाजी ,
खरा संभाजी ,
बखरी ,
ऐतिहासिक पत्रे.
No comments:
Post a Comment