विनोद जाधव एक संग्राहक

Monday, 26 August 2019

मराठेशाहीतील दक्षिण लावण्यवती धुरंधर राजकारणी ग्वाल्हेर ची महाराणी बायजाबाई शिंदे भाग 18

मराठेशाहीतील दक्षिण लावण्यवती धुरंधर राजकारणी ग्वाल्हेर ची महाराणी बायजाबाई शिंदे
भाग 18
महाराणी बायजाबाईसाहेब शिंदे ह्यांचे चरित्र,
लेखक :- दत्तात्रय बळवंत पारसनीस
दौलतराव शिंदे ह्यांची कारकीर्द.--------------------------------3
दौलतराव शिंदे ह्यांस हे सौंदर्यरत्न प्राप्त होण्याचा सुयोग आला हे पाहून परमानंद झाला; व त्यांनी सर्जेरावाचे ह्मणणे अक्षरशः मान्य करून, बाजीरावांस गादीवर बसविण्याचे अभिवचन दिले. ह्याप्रमाणे शेवटीं बाजीरावांस पेशवाईचे पद प्राप्त करून घेण्यास सर्जेराव घाटगे ह्यांच्या लावण्यवती कन्येचा उपयोग करणे भाग पडले. स्त्रीसौंदर्याने राजलक्ष्मीवर आपला पगडा बसविल्याची उदाहरणे | इतिहासांत विपुल आहेत; तेव्हां ह्याबद्दल विशेष आश्चर्य मानण्याचे प्रयोजन नाहीं. दौलतराव शिंदे बाजीरावांस अनुकूल झाल्यानंतर त्यांनी बाळोबा तात्यांस कैद केलें; व बाजीरावांस परत बोलाविलें. नाना फडनवीस ह्यांची मसलत ह्या राजकारणांत होतीच. त्यामुळे त्यांनी बाजीरावांस गादीवर बसविण्याची संधि साधून, त्यांच्याकडून दिवाणगिरीची वस्त्रे मिळविण्याचा यत्न चालविला होता. त्याप्रमाणे त्यांनी बाजीरावाशीं करार मदार करून, त्यांस सातारचे छत्रपतींकडून पेशवाईची वस्त्रे ता० ४ दिसेंबर इ. स. १७९६ रोजी आणून दिली. ह्याप्रमाणे पेशव्यांच्या गादीवर बाजीरावांची संस्थापना झाली. |
बाजीरावांस गादी मिळाल्यानंतर ते नाना फडनवीस व दौलतराव शिंदे ह्यांच्या ओंजळीने पाणी पिऊ लागले. परंतु ते चंचलवृत्ति व कपटबुद्धि असल्यामुळे त्यांचे व नानांचे लवकरच वांकडे आले, व त्यांनी नाना व दौलतराव ह्यांच्या त्रासांतून मुक्त होण्याचा प्रयत्न चालविला. २९ बाजीराव ह्यांस आपले मनोरथ सिद्धीस नेण्यास सर्जेराव घाटगे हैं। उत्तम साधन मिळाले होते. त्यांचा त्यांनी बहुमान करून व त्यांस नानाप्रकारच्या लालची दाखवून, त्यांस पूर्णपणे अंकित केले होते. त्यामुळे ते त्यांच्या अनुषंगाते वागून त्यांची मनीषा तृप्त करण्यास तत्पर झाले होते. अनावर स्वार्थेच्छा व प्रबल महत्त्वाकांक्षा तृप्त करण्यास, सहज संधि प्राप्त झाल्यावर, तिचा फायदा सर्जेराव घाटग्यांसारख्या पुरुषाने घेतल्यास त्यांत आश्चर्य ते काय ? बाजीरावांनीं सर्जेरावास अशी मसलत दिली की, नानांस कैद केले असतां तुह्मांस दौलतरावाची दिवाणगिरी मिळण्यास उशीर लागणार नाही. त्याप्रमाणे सर्जेराव घाटगे ह्यांनी ता० ३१ दिसेंबर १७९७ रोजी नानांस कैद केलें. अर्थात् नाना कैदेत गेल्यावर पेशव्यांच्या राज्याची सर्व कैद विसकटली जाऊन बळी तो कान पिळी ?? असा प्रकार झाला. सर्जेराव घाटगे ह्यांनी द्रव्यलोभाने नानांच्या आप्त व इष्ट मंडळींचा छल । केला; व बहुत अनन्वित कृत्ये केली. त्या सर्वांचे वर्णन करण्याचे हें।स्थल नाहीं......Image may contain: 1 person

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...