विनोद जाधव एक संग्राहक

Monday, 26 August 2019

मराठेशाहीतील दक्षिण लावण्यवती धुरंधर राजकारणी ग्वाल्हेर ची महाराणी बायजाबाई शिंदे भाग 19

मराठेशाहीतील दक्षिण लावण्यवती धुरंधर राजकारणी ग्वाल्हेर ची महाराणी बायजाबाई शिंदे
भाग 19
महाराणी बायजाबाईसाहेब शिंदे ह्यांचे चरित्र,
लेखक :- दत्तात्रय बळवंत पारसनीस
दौलतराव शिंदे ह्यांची कारकीर्द.--------------------------------4
नाना प्रधानगिरीवरून दूर झाल्यानंतर बाजीराव पेशवे ह्यांनी अमृतरावास आपले दिवाण नेमिले, व दौलतराव शिंदे ह्यांच्याजवळ सर्जेराव ह्यांस आपला दिवाण नेमण्याबद्दल शिफारस केली. त्याप्रमाणे शिंदे ह्यांच्या दिवाणगिरीवर ह्या कारस्थानी गृहस्थाची योजना झाली. ह्या समयास दौलतराव ह्यांच्या इच्छेप्रमाणे बायजाबाईचा व त्यांचा विवाहसमारंभ घडून आला. हे लग्न पुणे मुक्कामीं इ. स. १७९८ चे मार्च महिन्यांत मोठ्या थाटाने झाले. ह्या वेळीं उत्सवप्रिय व तरुण शिंद्यांनीं जो समारंभ केला, तो फार हौसेचा व डौलाचा होता. त्यांनी ब्राह्मणभोजने, नाचरंग, आतषबाजी वगैरेमध्ये अतिशय द्रव्य खर्च केले. येणेप्रमाणे दक्षिणची सौंदर्यलतिका' दौलतरावांस३० प्राप्त होऊन जिकडे तिकडे आनंदीआनंद झाला. ह्याप्रमाणे बायजाबाईसाहेब ह्या घाटग्यांच्या कुलांतून शिंद्यांच्या कुलांत गेल्या; व इतिहासांत ‘बायजाबाईसाहेब शिंदे' ह्या नावाने प्रसिद्ध झाल्या. बायजाबाईसाहेबांचे लग्न झाल्यानंतर पुण्याच्या दरबारांत जी राजकारणे व जे घोंटाळे झाले, त्यांचा संबंध ह्या चरित्राशीं नसल्यामुळे त्यांचे विवरण येथे करितां येत नाहीं. तथापि, ह्या लग्नामुळे दौलतराव शिंद्यांस मनस्वी कर्ज होऊन, त्यांना पुढे, बाजीरावांनीं देऊ केलेले दोन कोटी रुपये मागावे लागले; व ते वसूल करण्याकरितां सर्जेराव घाटग्यांस पुण्याची लूट करावी लागली. त्या लुटीमध्ये लोकांचा फार भयंकर रीतीने छल झाला, हे येथे नमूद करणे अवश्य आहे. ह्या छलाने त्रस्त होऊन, अमृतराव पेशवे ह्यांनी दौलतराव शिंदे ह्यांस कैद करण्याचा यत्न चालविला. बाजीराव पेशवे ह्यांनी एका भेटीमध्ये दौलतरावांस असे विचारिलें कीं, “तुह्मी माझे धनी आहांत कां नौकर आहात ? माझी प्रतिष्ठा ठेवायची असेल, तर तुह्मीं हिंदुस्थानांत निघून जावे. सर्जेरावाचा छल. आता माझ्याने पाहवत नाहीं ! ” | पुण्यास बेबंदशाही झाल्यामुळे दौलतरावांचे तेथे वजन पडेनासे झाले. ह्याच सुमारास महादजी शिंद्यांच्या बायका दौलतरावांच्या विरुद्ध होऊन, त्यांनी शिंद्यांच्या प्रांतांत दंगा चालविला; व तिकडे उत्तर हिंदुस्थानांतही बरीच गडबड उडाली. तेव्हां दौलतराव ह्यांस आपल्या प्रांताचा बंदोबस्त करण्याकरितां तिकडे जाणे भाग पडलं.No photo description available.

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...