मराठेशाहीतील दक्षिण लावण्यवती धुरंधर राजकारणी ग्वाल्हेर ची महाराणी बायजाबाई शिंदे
भाग 25
महाराणी बायजाबाईसाहेब शिंदे ह्यांचे चरित्र,
लेखक :- दत्तात्रय बळवंत पारसनीस
दौलतराव शिंदे ह्यांची कारकीर्द.--------------------------------10
पेंढारी लोकांचे बंड मोडल्यापासून मध्य हिंदुस्थानांत बरीच शांतता झाली. तेणेकरून शिंद्यांचे उत्पन्न २० लक्ष रुपये अधिक वाढले व इतर रीतीनेही पुष्कळ फायदे झाले. इ. स. १८१८ पासून दौलतराव शिंदे हे इंग्रजसरकाराशीं अत्यंत स्नेहभावाने वागून त्यांचे विश्वासू दोस्त बनले. त्यामुळे इंग्रजसरकारही त्यांचा उत्तम प्रकारचा मानमरातब ठेवीत असे. तात्पर्य, इ. स. १८१८ सालीं सर जॉन मालकम ह्यांनीं मध्यहिंदुस्थानामध्ये कंपनी सरकारची सार्वभौम सत्ता संस्थापित केल्यापासून इ. स. १८२७ सालापर्यंत, ह्मणजे दौलतराव शिंदे ह्यांच्या मृत्यूपर्यंत, ग्वाल्हेर दरबारामध्ये ह्मणण्यासारख्या विशेष गोष्टी किंवा राजकीय चळवळी कांहीं घडून आल्या नाहींत.
- दौलतराव शिंदे ह्यांचा मृत्यु.---------------------1
। म हाराज दौलतराव शिंदे ह्यांची प्रकृति इ. स. १८२६ च्या आक्टोबर महिन्यापासून बिघडत चालली, व ग्वाल्हेरच्या उत्तम
- उत्तम राजवैद्यांचे औषधोपचार चालू झाले. महाराजांची प्रियपत्नी बायजाबाई ह्यांस महाराजांच्या प्रकृतीबद्दल फार काळजी उत्पन्न झाली. महाराजांविषयी त्यांचा फार प्रेमभाव असल्यामुळे त्या महाराजांच्या शुश्रूषेत अगदीं तत्पर असत. महाराज आजारी असल्याचे वर्तमान ग्वाल्हेरचे रोसडेंट मेजर स्टुअर्ट ह्यांस व त्यांचे असिस्टंट क्याप्टन फ्लेमिंग ह्यांस कळल्यामुळे ते उभयतां महाराजांच्या समाचाराकरितां वारंवार राजवाड्यांत येत असत. महाराजांचा व मेजर स्टुअर्ट ह्यांचा चांगल्या प्रकारचा स्नेहसंबंध असून ते परस्परांशी मोकळ्या मनाने वागत असत. त्यांनी महाराज दौलतराव शिंदे आजारी असल्याचे वर्तमान रीतीप्रमाणे गव्हरनर जनरल साहेबांस कळविले. महाराज दौलतराव हे हिंदुस्थानांतील एका स्वतंत्र व बलाढ्य संस्थानाचे अधिपति असून, ते ब्रिटिश सरकाराशीं फार दोस्तीने वागत असल्यामुळे, त्यांच्याबद्दल हिंदुस्थान सरकारही फार मर्यादेने व प्रेमभावाने वागत असे. महाराज आजारी असून त्यांची प्रकृति दिवसेंदिवस क्षीण होत चालली हे पाहून, मेजर स्टुअर्ट ह्यांनीं, महाराजांस दत्तक पुत्र घेऊन गादीच्या वारसाची योग्य व्यवस्था
४० करावी, अशी वारंवार विनांत केली. परंतु त्यांना दत्तक पुत्र घेण्याची गोष्ट पसंत पडेना. ते वारंवार ह्मणत की, “माझी पत्नी जर राज्यकारभार चालविण्यास समर्थ आहे, तर मला स्वतःस दत्तक घेण्याची काय अवश्यकता आहे ??? अर्थात् महाराजांचे हे उत्तर ऐकले ह्मणजे त्यांच्यापुढे एक अक्षरही काढण्याची कोणाची प्राज्ञा नसे.
No comments:
Post a Comment