मराठेशाहीतील दक्षिण लावण्यवती धुरंधर राजकारणी ग्वाल्हेर ची महाराणी बायजाबाई शिंदे
भाग 26
महाराणी बायजाबाईसाहेब शिंदे ह्यांचे चरित्र,
लेखक :- दत्तात्रय बळवंत पारसनीस
दौलतराव शिंदे ह्यांचा मृत्यु.---------------------2
दौलतराव शिंदे ह्यांस रखमाबाई व बायजाबाई ह्या दोन बायका होत्या. पैकीं वडील रखमाबाई ह्या फार साध्याभोळ्या व निरुपद्रवी अशा असून, राज्यशकट चालविण्याचे सामर्थ्य त्यांच्या अंगीं मुळींच नव्हते. बायजाबाई ह्या शहाण्या, राजकारणी, धूर्त, प्रसंगावधानी, आणि दृढनिश्चयी अशा होत्या; व त्यांनी आपल्या पतीस राज्यकारभार चाल विण्याचे कामीं पुष्कळ वर्षे साहाय्य केले होते. त्यामुळे महाराजांस सर्व । राज्यकारभार बायजाबाईचे स्वाधीन करावा अशी इच्छा वाटणे साहजिक आहे. परंतु तसे केल्याने, कदाचित् दरबारांतल्या कित्येक कारस्थानी व कुटिल लोकांस, हिंदुशास्त्राप्रमाणे रखमाबाईचा पक्ष घेऊन, तंटेबखेडे करण्यास संधि सांपडेल, व त्याचा परिणाम संस्थानास विनाकारण भोगावा लागेल, ह्मणून त्यांनी ह्या प्रश्नाचा निकाल स्पष्ट रीतीनें कांहींच केला नाहीं. बायजाबाईवर त्यांची अत्यंत प्रीति होती; व राज्य चालविण्यास लागणारे सामर्थ्य व इतर गुण त्यांच्या अंगीं वसत होते; ह्याचा त्यांनी अनुभवही घेतला होता. एवढेच नव्हे, तर स्त्रिया ह्मणजे १ भिल्ल साहेबांनी आपल्या इतिहासांतही ह्याचा उल्लेख केला आहेः The real cause of his reluctance, however, was his attachment to Baiza Bai, who had long exercised an imperious influence over his mind, and to whom he wished to bequeath the substantial authority of the state, although the opposition of the principal persons of his court, and probably some misgivings of the result, deterred him from declaring her his successor."-Mit's Histor of India, Vol. IX; Page 146. ४१ -- राजकारणास अयोग्य, त्यांची योग्यता फक्त गोषांत बसण्यापुरती, असला अनुदार विचार बायजाबाईच्या संगतीमुळे त्यांच्या अंतःकरणांतून पार नाहींसा झाला होता. डा० होप नामक शिंद्यांच्या दरबा- 3।। रांतल्या एका भिषग्वर्यांनी असे लिहिले आहे कीं, ‘‘दौलतराव शिंद्यांचा . असा अभिमान होता की, आपण कोणतीही महत्त्वाची गोष्ट आपल्या **** पत्नीच्या संमतीवांचून केली नाही. आणि पूर्वेकडील देशांतील पुरुष आपल्या स्त्रियांस किती कमी दर्जाने वागवितात हे लक्ष्यांत घेतलें, ह्मणजे हा अभिमान फारच अलौकिक होता, असे झटले पाहिजे.” अर्थात् डा० होपसारख्या परदेशीय गृहस्थांस दौलवराव शिंद्यांच्या ज्या अभिमानाचे फार आश्चर्य वाटले, त्या अभिमानाने पुष्कळ संस्थानिकांच्या अंतःकरणांत प्रवेश केला असता, तर बायजाबाईसारख्या किती तरी राजकारणी व चतुर स्त्रिया हिंदुस्थानांत चमकू लागल्या असत्या
No comments:
Post a Comment