विनोद जाधव एक संग्राहक

Sunday, 4 August 2019

" शंभुराजांची सिद्दीवर जरब "

" शंभुराजांची सिद्दीवर जरब "
सन १६८१ , छत्रपती संभाजी महाराजांनी राज्याभिषेकानंतर , अवघ्या काही दिवसातच बुऱ्हाणपूर मारले , औरंगाबादवर छापा मारला . सुरतेपेक्षा ४ पटींनी
धन , हिंदवी स्वराज्याच्या खजिन्यात जमा झाले .... महामहिम छत्रपती शिवाजी महाराजांच्या छाव्याने , त्या औरंगजेबाच्या तोंडावर बुऱ्हाणपुरच्या मोहिमेद्वारे , पंजा मारला , शंभूछत्रपतींचे सामर्थ्य या मोहिमेमुळे सर्वांनाच माहिती झाले , औरंगजेबाने तर धसकाच घेतला .
मोगल बादशहा औरंगजेब याने संपूर्ण दक्खन जिंकण्याकरिता मोहीम आखत होता , त्या रणनीतीनुसार त्याने सिद्दी , टोपीकर इंग्रज आणि पोर्तुगीज यांना स्वराज्यात बंडाळी घडवून आणण्यास सांगितल्या . टोपीकर आणि पोर्तुगीज हुशार होते , त्यांनी दुटप्पी धोरण
ठेवले , जेणेकरून ते सलामत राहोत ; परंतु जंजिऱ्याचे सिद्दी बंधू यांनी स्वराज्यात कुरापती काढायला सुरुवात केली .
सिद्दीचे हशम समुद्रकिनाऱ्याजवळील मराठी मुलखात जाळपोळ करत , लूट , प्रामाणिक रयतेवर जुलूम करत , स्त्रियांना बाटवत , तसेच स्त्रीया - पुरुषांचा विदेशात गुलाम म्हणून व्यापार करत असत . पुढे नाईकांनी ह्या सगळ्याची तपशीलवार माहिती शंभुराजांना दिली , आणि छत्रपती बोलते झाले , " ह्या जिंजीरेकर सिद्दीवर जरब बसवायलाच लागेल " . पुढे तातडीने शंभूराजांनी राजधानी रायगडावर एक महापराक्रमी सरदारास बोलावले , ते म्हणजे " कोंडाजी फर्जंद " .
■ शंभूराजे आणि महारथी : -
संध्याकाळी मसलतखाण्यात , सरनौबत हंबीर- राव , छत्रपतींचे विशेष सल्लागार छंदोगामात्य कविराज गोकुळदास उर्फ कवी कलश , गुप्तहेरप्रमुख बहिर्जी नाईक , सरदार कोंडाजी फर्जंद आणि शंभूराजे यांची जंजिरा जिंकण्याची मसलत सुरू झाली , रणनिती आखवयास प्रारंभ झाला ; कारण शिवछत्रपतींचा ८ वेळा जंजिऱ्यावर भगवा फडकविण्याच्या मनसुभा फसला होता वास्तविक , सतराव्या शतकात , " जेथे शिवराय तेथे विजय " हे संपूर्ण हिंदुस्थानात समीकरणच ठरले होते , मात्र अपवाद ठरत होता , तो म्हणजे ' जंजिरा ' , ( कारण जंजिरा हा एक मुख्य जलदुर्ग होता , मुळात प्रत्येक जलदुर्ग हा सागरामुळे सुरक्षितच असतो , शिवाय जर आरमाराच्या सह्यायने जर जंजिरा जिंकायचा म्हटल्यास , जंजिऱ्यावरील आत्याधुनिक तोफांमुळे गलबत पाणीमोल होत , नष्ट होत . ) त्यामुळेच शंभूराजांनी जंजिरा सर करण्यासाठी कूटनीतीचा अवलंब केला , रणनीती अशी होती कि , ' सिद्दीला त्याच्या वारूळात गाठून मारणे , म्हणजे जंजिऱ्यात कोंडाजींना पाठवायचे , कोंडाजींना सिद्दीचा भरोसा जिंकून तेथे वास्तव्य करायचे , आणि योग्यदिवशी अंधाऱ्या रात्री , जंजिऱ्यावरील दारूगोळ्याचे कोठार उडवून द्यायचे , व निसटायचे . ऐकुन काय तर
जंजिऱ्याच्या छाताड्यावरच जोरदार वार करायचा आणि जंजिरा सर करायचा " , आणि शिवछत्रपतींचे अधुरे स्वप्न पूर्ण करायचे , असे या मसलतीत ठरले . कार्य तर महाजोखमीचे होते , परंतु कोंडाजींनी निर्भयपणे मोहीम हाती घेतली . मसलत आटोपली , ठरल्याप्रमाणे सर्वजण प्रबळ आत्मविश्वासाने मसलतखान्यातून बाहेर गेले ....
■ कोंडाजी फितूर झाला : -
सिद्दी बंधू महाचालाख , संशयी होते , त्यांचा
पुढे कोंडाजींवर भरोसा करण्यासाठी , कोंडाजी फितूर झाल्याची वार्ता स्वराज्यात सगळीकडे बहिर्जींमार्फत पसरविण्यात आली . नंतर कोंडाजींनी सिद्दी बंधूंशी पत्रव्यवहार सुरू केला , सिद्दी बंधू हि कोंडाजींच्या पराक्रमाबद्दल एकूण होते , त्यामुळे पुढच्या काही दिवसातच कोंडाजी आपल्या कुटूंबासह व ११ सहकाऱ्यां निशी सिद्दीला जाऊन मिळाले . सिद्दी बंधूंनी कोंडाजींचे यथोचित स्वागत केले , आदराने कोंडाजी जंजिऱ्यावर चाकरी करायला लागले , कोंडाजी जंजिऱ्याच्या महालात आपल्या सहकाऱ्यांनिशी राहू लागले . कोंडाजींनी जंजिऱ्याचा कानाकोपरा पाहिला , तपासला , समजून घेतला , आणि ती रात्र सुरू झाली , त्या रात्रीच कोंडाजी
जंजिऱ्यावरील दारूचे कोठार आग लावून भस्म करणार , सगळ ठरल्याप्रमाने होत होतं , एक एक क्षण महत्वाचा होता , आणि घोळ झाला कोंडाजीपुढे सिद्दी खैरच उभा झाला , मोहीम फसली ( कदाचित सिद्दीला कोंडाजीच्या
घरात काम करणाऱ्या दासीने खबर दिली असावी ) . कोंडाजींचे लगोलग सर मारण्यात आलं , जे सहकारी सापडले त्यांना जलसमाधी देण्यात आली , पत्नीलाही
मारून टाकले , १ ते २ सहकारी ह्या सगळ्या प्रसंगात किल्ल्यावरून उड्या टाकून पळाले , त्यांचाच जीव वाचला .
स्वराज्यामाळेतील अजून एक रत्न गळाले , कामास आले .
शंभुराजांना हि खबर मिळाली , राजांना खूप दुःख झालं . राजांनी महाडच्या दादाजी रघुनाथ देशपांडे या शूर सरदारास , दंडाराजपुरीस वेढा घळण्याकरिता पाठविले , आणि छत्रपती संभाजी महाराज २० हजार फौझेसह जंजिऱ्याच्या रोखाने निघाले . सरदार देशपांडे यांनी दंडाराजपुरी जिंकली . आता शंभूराजे , जंजिऱ्याच्या किनाऱ्याजवळ होते , राजांनी विलक्षण निर्णय घेतला , कि ज्या प्रमाणे प्रभूरामचंद्रांनी लंकेपर्यंत पोह्चण्याकरिता , समुद्रात सेतू बांधला होता , त्या प्रमाणे शंभूराजांनी जंजिऱ्याच्या समुद्रावर सेतू बांधण्याचा निर्धार केला , आणि बघता बघता सेतू बांधण्याचे काम सुरू झाले , ८०० यार्ड रुंद आणि ३० यार्ड खोल असणारा खंदक दगड , लाकडे , कापसाची गाठोडी वैगेरे टाकून आपल्या सैन्याकरीता मार्ग निर्माण केला , आता मराठ्यांच्या तोफा जंजिऱ्यावर आग बरसवू लागल्या , तोफांच्या प्रभावी हमल्यामुळे किल्याची एक भिंत कोसळण्याची वेळ आली होती , दि. ३ जानेवारी ते ३ फेब्रुवारी १६८२ ह्या काळात शंभूराजांनी सिद्दीवर चांगलाच दबाव आणला होता .यासंबंधी मुंबईतील इंग्रजांनी सुरतकर इंग्रजांना , दि. १९ जानेवारी १६८२ ला पत्र पाठविले , त्यात ते असे म्हणतात कि ," सिद्दी जोपर्यंत तह करत नाही किंवा माघार घेत नाही , तोपर्यंत संभाजीस शांतता मिळणार नाही " .त्यासमयी मराठे जंजिरा जिंकण्याच्या बेतात होते ; परंतु काही केल्या किल्ल्यात प्रवेश करणे जरूरीचे होते , किल्यात प्रवेश केल्याशिवाय ' विजयश्री ' प्राप्त होऊ शकत नव्हता . सेतू चे काम पुढे चालूच होते , पण अशातच निसर्ग सिद्दीच्या मदतीला धावून आला , समुद्राने प्रकट रूप धारण केले ,
तरीही शंभूराजे सिद्दीला जोरदार तडाखे देत होते , सिद्दी जेरीस आला होता ; परंतु दि. ४ फेब्रुवारी १६८२ ला ,
२ हजार घोडदलानिशी आणि १५ हजार पायदलासोबत ,
नवाब हसन अलिखान कोकणात धडकला , त्याआधी त्याने कल्याण वर हमला केला , स्वराज्यहिताकरिता शंभुराजांना नाईलाजाने खानाचा बंदोबस्त करण्यासाठी
जंजिऱ्याची मोहीम सरदार दादाजी देशपांडे यांवर सोपवून निघावे लागले . संभाजी राजांनी खानाचा पराभव केला ; पण जंजिरा हातातून निसटला .
जंजिरा जरी स्वराज्यात आला नसला तरी , सिद्दीवर छत्रपती संभाजीराजांची चांगलीच जरब बसली होती , पुढे त्याने आपलं डोकं वर काढलं नाही .
विशेष टीप : - छत्रपती संभाजी महाराजांसाठी , प्राणाची
बाजी लावण्यात कोंडाजी फर्जंद हा प्रथम
वीर ठरला .
अशा महान वीराला माझे अभिवादन , आणि स्वराज्यरक्षक छत्रपती शंभूमहाराजांच्या पवित्र चरणी माझा मानाचा मुजरा ....
"जर जंजिरा अजय आहे , तर शंभूराजे अजिंक्य आहेत" .
■=■=■=■=●●●●=■=■=■=■
तसेच इतर माहितीपूर्ण , ऐतिहासिक लेख अभ्यासणाकरीता
खालील लिंकला अवश्य भेट द्या : -
" अखंड भारताचा विजय आहे " .
|| जय हिंद ||
~ राहुल रमेशजी पाटील ,
(शंभूमहितीगार)
ई-मेल : rahulp1297@gmail. com
भ्रमणध्वनी क्र. : 9579301838 / 7741923346 .

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...