" दक्षिणदिग्विजय ते उत्तरदिग्विजय "
भाग 3
■ दक्षिणदिग्विजय : -
दि. ११ मार्च १६७७ रोजी , राजे
हैद्राबादहून निघाले . महाराज जिंजी , वेलोर , यमन गोंडा , आणि पोर्तो नोव्होचा कर्नाटकचा भाग विजापूरच्या ताब्यातून घ्यावयास निघाले . कुतुबशहाने १ हजार घोडदळ , ४ पायदळ आणि एक अनुभवी सेनापती राजांच्या बरोबर दिला .
■ छत्रपती शिवाजी महाराजांचे कर्नाटकातील मुख्यशत्रू :-
(१) शेरखान लोदी : -
हा विजापूरी पठाणी सरदार . हा
त्रिचनापल्लीच्या उत्तरेस सुमारे , ३० मैलांवर , वलिंगडपूर
येथे राहत होता . मराठा सरदारांनी , शेरखानविरुद्ध युद्ध
केले व त्याचा पराभव केला .

(२) नसीर महमद : -
हा जिंजीच्या किल्याचा किल्लेदार
होता . राजांनी ५ हजार स्वार , कांचीवरून जिंजीवर
रवाना केले , त्यानंतर १६ हजार घोडदळ पाठवून जिंजीला वेढा घातला . मराठ्यांपुढे आपला निभाव लागणार नाही , हे नसीरने जाणून , मराठ्यांच्या अधिकाऱ्यास भेटण्यास आला , व सळोख्याची बोलणी सुरू केली . किल्लेदारास दरसाल ५० हजार उत्पन्नांची जहागीर देण्याचे अमिश दाखविल्यानंतर , त्याने किल्ला मराठ्यांच्या ताब्यात दिला ( दि . १३ मे १६७७ रोजी , जिंजी आणि जिंजीचा किल्ला स्वराज्यात आला ) . राजांनी जिंजीचा किल्ला अगदी थोडक्यात घेतल्यामुळे महाराजांच्या सैन्याची तेथील लोकांना बरीच दहशत बसली ." छत्रपती शिवाजी महाराजकर्नाटकात सर्वत्र यशस्वी होत गेले " .
जिंजीचा किल्लेदार , राजांनी रामजी नलगे , यांस नेमले . आणि जिंजी सुभ्याची सुभेदारी , राजांनी विठ्ठल पिलदेव यांस देवू केली . किल्ल्याची उत्तम डागडुजी करण्याची आज्ञा राजांनी केली .

(३) अब्दुल्लाखान : -
विजापुरचा सुरमा म्हणून , अब्दुल्ल
खानाची ओळख होती . हा किल्ले वेलोरचा किल्लेदार .
राजांनी हा किल्ला घेण्यासाठी जोराची तयारी केली होती . पुढे मराठ्यांनी किल्ल्याला वेढा घातला . अब्दुल्लाखान किल्ला शर्थीने लढवत होता . तेव्हा किल्ल्यावर तोफांचा मारा करण्यासाठी महाराजांनी नजीकच्या २ टेकड्यांवर २ किल्ले बांधले , त्यांची नावे साजरा आणि गोजरा . तोफांचा मारा सुरु झाला . वेळोरचा किल्ला रंगळणार असे दिसताच राजांनी नरहरी रुद्र या सरदारास २ हजार स्वार आणि ५ हजार पायदळ देऊन वेढ्याजवल ठेवले . त्यातच , दि . २० जून ला शेरखान मराठ्यांवर चालून आला , त्याला अडवायला राजे स्वतः गेले . खानाला पळता भुई थोडी झाली . पुढे त्याचा पाठलाग ही केला . शेरखान राजांना शरण आला . त्याची व्हालौर , टेजपठण ,भवनगिरीपठण ही ठाणी मराठयांनी ताब्यात घेतली ( ९ जुलै ला ) . दि . १५ जुलैला सईसलामत सोडण्याबदल्यात , शेरखानने राजांशी तह केला , तहानुसार खानाने राजांना
त्याचा सर्व मुलुख आणि २० हजार होन रोख दिले . पुढे
२२ जुलै १६७७ ला , मराठ्यांनी वेलोर चा किल्लाही जिंकला . कर्नाटकच्या सुभेदारीवर राजांनी , आपला जावई हरजी महाडिक यास नेमले . पुढे कित्येक वर्षे
त्याने कारभार दक्षतेने केला .

कर्नाटकात एक मोठी राज्यसंस्था स्थापून , तिच्या जोगे विजापूरच्या अदिलशाहीस खिळखिळे करून ठेविले . कर्नाटकात शहाजीराजांनी मराठी राज्याची स्थापना करण्याचे योजिले होते ते एकोजीने सिद्धीस नेले . ती शिवाजी महाराजांनी इतकी प्रबळ करून ठेवली की , कोणतीही मुसलमानी सत्ता तिला सहज मोडू शकली नाही .
छत्रपती शिवाजी महाराजांनी , ऑक्टोबर १६७७ मध्ये , आरणी , होसको , बाळापूर इत्यादी पश्चिम
- दक्षिण जोडणारी स्थळे ताब्यात घेऊन राजांनी जिंकलेल्या प्रदेशाची चोख व्यवस्था करून राजे रायगडच्या दिशेने निघाले .

■ विजय नक्की काय ?
= २२ लक्ष होन मुलखाचा प्रदेश जिंकला . १४ मोठे किल्ले आणि ७२ उपकिल्ले ( गढी , टेकड्या ) जिंकले .
५० लक्ष रक्कम लुतेमध्ये मिळविली . तसेच सोने , हिरे , रत्ने , पाचू यांची गिणती केली नव्हती .

" स्वराज्य दुप्पट वृद्धिंगत झाले " .
दक्षिणेकडे जाण्यापूर्वी शिवाजी महाराजांनी शंभूराजांना ,
शृंगारपुराला जावयास सांगितले , व तेथील सुभा संभाळवयास सांगितले आणि स्वराज्याच्या सौरक्षणासाठी तत्पर राहावयास सांगितले .

No comments:
Post a Comment