#मोरोपंत_पेशवे_व_त्यांचे_वंशज
postsaambhar by:
मोरोपंत पेशव्यांसारखा माणूस शिवाजी महाराजांनी पारखून त्यांची निवड मुख्य प्रधानाच्या अर्थात पेशवाईच्या कामाकरिता केली. जेधे शकवलीत शामराजपंतां निळकंठांनंतर नरहरी आनंदराव आणि लगेच काही महिन्यातच मोरेश्वर त्र्यम्बक पिंगळे यांस पेशवाई दिली असा उल्लेख आढळतो. पुढे मोरोपंतांना राज्याभिषेकावेळी सुद्धा 'पेशवेपदी' कायम ठेवण्यात आले, त्यांचा मान इतका की ऑक्झेण्डन जेव्हा रायगडावर आला तेव्हा गागाभट्टांसह अष्टप्रधान मंडळातील केवळ मोरोपंतांच बसलेले दिसले. पुढे संभाजी महाराजांच्या कारकिर्दीत सुरुवातीच्या काळात मोरोपंतांची तब्येत बिघडली आणि त्यांचा मृत्यू झाल्याने छत्रपती शंभूराजांनी ज्येष्ठ पुत्र निळोपंत यांना पेशवाई दिली. संभाजी महाराजांनंतर निळोपंत हे राजारामछत्रपतींच्या काळातही मुख्य प्रधानपदी होतेच, आणि म्हणूनच पुढे त्यांनी कोल्हापूरकर ताराबाईंचा पक्ष स्वीकारला.
postsaambhar by:
दुर्ग मावळा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य - रजिस्टर

इ.स. १७०७ मध्ये शाहू महाराज दक्षिणेत आल्यानंतर शाहू महाराजांनी प्रथम
मोरोपंत पेशव्यांचे धाकटे पुत्र बहिरोपंत यांना पेशवेपद दिलं, पण १७१२
मध्ये कान्होजी आंग्रे यांनी ताराबाईंचा पक्ष स्वीकारून जेव्हा शाहू
महाराजांच्या मुलुखावर स्वाऱ्या केल्या तेव्हा मुलुख सोडवण्यास गेलेले
बहिरोपंत स्वतः कैद झाले. खुद्द पेशवा कैद होणं हे शाहू महाराजांना थोडं
विचित्र वाटलं आणि पुढे त्यांनी परशुरामपंत प्रतिनिधी, अंबाजीपंत पुरंदरे
इत्यादींच्या सल्ल्यावरून बाळाजी विश्वनाथांना पेशवेपद दिलं. बाळाजींनी
केवळ बहिरोपंतांची सुटकाच नव्हे तर कान्होजी आंग्र्यांसारखा समुद्रावरचा
भीमच शाहू महाराजांच्या पक्षाकडे आणला. असो, तो इतिहास वेगळा आहे.
आता मूळ मुद्दा असा की पूर्वीचे बहिरोपंत पेशवे आणि त्यांच्या वंशाचं काय झालं? गो. स. सरदेसाईंनी प्रसिद्ध केलेल्या 'पेशवे दफ्तरातून निवडलेले कागद खंड ४४- ऐतिहासिक घराणी' मध्ये या पिंगळ्यांच्या वंशजांची एक हकीकत प्रसिद्ध केली आहे. दि. ३ ऑक्टोबर १८४३ रोजी बहिरो नारायण पिंगळे यांनी इंग्रज सरकारला त्यांच्या पूर्वजांविषयी आणि मिळकटीविषयी हा कागद लिहून दिला होता. यातील मुख्य मजकूर असा -
यादी बहिरो नारायण पिंगळे पेशवे सु।। आर्बा आर्बैन मयातैन व अलफ सन १८४३ इसवी.
१ आमचे वडिलांस प्रतापगडचा किल्ला वंशपरंपरेने दाखल सिवाजी माहाराज यांणी दिल्हा. त्यापासून चालत होते. पुढे पेशवाई उर्फ मुख्य प्रधान हा अधिकार गेला तत्रापि किला माहाराज सरकारचे तर्फेने मातबर राहावी म्हणौन चालविला होता. त्याची वहिवाट वर्षे १२० येकशे वीस जाहाली. उत्पन्न रुपये ४०००० च्याळीस हजाराचे होते. खेरीज माहाराज सरकारचे खजिन्यातून पावत होते. तो किला सन समान सितैनात लढाई होऊन रामाजी माहादेव याचे विद्यमाने पेशवे सरकारांनी घेतला. नंतर थोरले माधवराव साहेब यांणी आमचे चालविण्याबद्दल आमचे वडील माधवराव नारायण व नारो आपाजी व रघुनाथ धोंडदेव यांस सन तिसा सितैनचे साली सरंजाम वगैरे नेमणूक करून दिल्ली.
स्रोत : पेशवे दफ्तरातून निवडलेले कागद खंड ४४- ऐतिहासिक घराणी, लेखांक २३
माहिती साभार
पेशवाई

No comments:
Post a Comment