विनोद जाधव एक संग्राहक

Tuesday, 27 August 2019

१७५९_दत्ताजी_शिंदेंनी_सम्बळंगडावर_भगवा








#१७५९_दत्ताजी_शिंदेंनी_सम्बळंगडावर_भगवा_
#फडकवला
postsaambhar :
दुर्ग मावळा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य - रजिस्टर
मराठ्यांचा भर पावसाळ्यातील यमुना व गँगा नदी ओलांडून अंतरवेदीतील महाप्रकर्म.

अटक मोहिमे नन्तर पंजाब जी जबाबदारी शिंदेंवर सोपवली गेली.
दत्ताजींनी साबाजी शिंदेंना पंजाबात नेमले, व ते स्वतः बंगाल स्वारी चे नियोजन करू लागले.
दत्ताजी व वजीर ह्यांचे सख्य होते पण दत्ताजींनी नजीबखानाशी संधान बांधून गँगा ओलांडून पलीकडील मुलुख मिळवण्याचा मनसुबा केला होता.
पण हा नीच नजीबखान विश्वास ठेवण्यास लायक नाही हे वजीर जाणत होता, व त्या बाबतीत तो दत्ताजींना सांगत होता, सावध करत होता, व पुढे हाच नजीब दत्ताजींच्या मृत्यूस कारणीभूत ठरला, पानिपत घडण्यास कारणीभूत ठरला, हे इतिहासाला माहितीच आहे.
१५ एप्रिल १७५९ रोजी दत्ताजी रामघाटावरून यमुना उतरून अंतर्वेदीत आले.
नजीबखान रोहिल्याकडून दत्तराजींना गँगा नदीवर पूल बांधून हवा होता पण हा पाताळयंत्री रोहिला टाळाटाळ करू लागला होता.
त्याने मराठ्यांस वचन दिले होते गँगेवर पूल बांधून देण्याचे, व त्याने शुक्रताल जवळ पूल बांधला ही होता, पण तो दत्ताजीस पुलाचा वापर करू देत न्हवता.
गँगा नदीच्या पूर्व किनाऱ्यावर सम्बळंगड नावाचा रोहिल्यांचा किल्ला होता. तिथून पत्थरगड हे रोहिल्यांचे मुख्य ठाणे ही जवळच होते. थोडक्यात हा मुलुख रोहिल्यांचा चांगलाच परिचयाचा होता.
ह्याच भागात जेतासिंग गुजर नावाचा एक जमीनदार होता. नदीचे उतार जाणून त्यावर पूल बांधण्याच्या कामात तो कुशल होता.
शुक्रताल जवळ गँगेत बरीच वळणे आहेत, पात्रात उंचवटे आहेत, बेटे आहेत, खच खळगे आहेत, त्यामुळे पूल बांधण्यास सोयीच्या जागा होत्या. त्या जागा हा जेतासिंग जाणून होता. पण हा जेतसिंग मराठे व नजीब दोघांना ही खुश ठेवत असे
दत्ताजी अंतरवेदीत उतरल्यावर नजीबखानाने आपल्या पाताळयंत्री स्वभावाला धरून डाव टाकायला सुरवात केली.दत्ताजींना झुलवत ठेऊन नजीब ने शुजाउद्देला बरोबर संधान बांधण्यास सुरवात केली.शुजाला त्याने निरोप पाठवला की "मराठे तुमच्यावर चाल करणार आहेत, त्यांना तुम्ही मारून काढा म्हणून" शुजा ने ही लढाई ची तयारी केली.
दत्ताजीचा मुक्काम त्यावेळेला गढमुक्तेशवरला होता. आतापर्यंत पावसाळा सुरू झाला होता त्यामुळे गँगे वर पूल न बांधण्याचा बहानाच नजीब ला मिळाला, त्यामुळे हिकडे दत्ताजी प्रचंड चिडले. नजीब चा स्वभाव व त्याचा डाव दोन्ही दत्ताजींच्या लक्षात आले.
पावसाळ्यामुळे लष्करी हालचाली मंदावल्या होत्या. तरी नजीबखनाची कट कारस्थाने सुरूच होती. ही लढाई हिंदू मुस्लिम आहे, अशी बतावणी हा कुटील करू लागला होता. वास्तविक नजीब सुन्नी होता तर शुजा शिया. त्यानंच्यात ही खूप सख्य होते अशातला भाग नाही. पण तरीही आपण मिळुन मराठ्यांना हरवले पाहिजे हे सांगून तो शुजाला चिथाऊ लागला. व दिलही ची वंजारी शुजा ला मिळू शकते असे अमिश तो दाखवू लागला. अर्थातच शुजा ह्या आमिषाला भुलला व लढण्याची तयारी करू लागला.
दत्ताची संतापले त्यांनी नजीबावर हल्ला करण्याचा निर्णय घेतला. १५ सप्टेंबर १७५९ ला मराठ्यांनी नजीब च्या छावणी वर हल्ला केला. मराठयांची ही उडी थोडीशी चुकलीच, नजीब तयारीतच होता. मराठ्यांचे नुकसान होऊ लागले त्यामुळे मराठ्यांनी काढता पाय घेतला.
गँगेच्या पुलावरून नजीब ला रसद येतच होती पलीकडे रोहिल्यांचा सम्बळगड दिमाखात उभा होता. दत्ताजींनी गोविंदपंत बुंदेले ह्यांना बोलवले व दहा हजारांची फौज त्यांना देऊन आपले सगळे लक्ष गँगेवर पूल बांधण्याकडे एकत्रित केले.
आणि एक चमत्कार घडला, शुक्रताल च्या उत्तरेस हरिद्वार येथे मराठ्यांनी गँगा ओलांडणली. ही मराठ्यांनी केलेली मोठी करामतच होती.
नजीबखानाचा मुलगा जाबतेखान नजीबाबादेस होता, गोविंद पंत बुंदेलेंनी आपला रोख त्याच्याकडे वळवला.
मराठयांनी अनपेक्षित पने गँगा ओलांडली हे समजताच निजबखान हडबडला. त्याने हाफिज रहमतखान दुनदेखान ह्यांना मदतीला बोलावले.
नजीबाबादेच्या पश्चिमेस ८ मैलांवर मराठयांनी पठाण व रोहिल्यांना घेरले. पठाणांचा सडकून पराभव झाला. त्यांच्या फौजा मार खात खात पळत सुटल्या. मराठे प्रत्येक जुलमाचा हिशोब करत होते. मराठ्यांचा प्रचंड विजय झाला भरपूर लूट ही मिळाली. तोफा, घोडे, उंट, कापड चोपड व बरेच काही.
इथून जवळच ह्या उन्मत्त रोहिल्यांचा सम्बळगड होता. शुजाउद्दौला चा सरदार अनुपगिर गोसावी हा पाच हजाराची फौज घेऊन नजीबखानाच्या मदतीस येत होता. ते दोघे एकत्र येऊन गँगा पार करण्यापूर्वी सम्बळगडावर हल्ला करणे गरजेचे होते. मराठे तुफान वेगाने सम्बळगडावर आदळले. त्यांचा जोश आवेश व वीरश्री बघून रोहिल्यांचा धीरच खचला. त्यांच्या गर्जनांसमोर रोहिले फिके पडू लागले. त्यांची फळी फुटली , मराठ्यांच्या समशेरीखाली हे रोहिले कणसा सारखे कापले जाऊ लागले. रोहिल्यांनी किल्ला सोडला. ते पर्वतीय भागात पळून जाऊ लागले. त्यांच्या फौजांची दाणादाण उडाली. मराठ्यांनी सम्बळगड जिंकला. नजीबखान फक्त चडफडत बसला. सम्बळगड हे मोक्याचे ठाणे आता त्याने गमावले होते. मराठ्यांनी हातासरशी अजून दोन चार ठाण्यांवर ही भगवा फडकवला.
हरहर महादेव, हरहर महादेव चा गजराने अवघी अंतरवेद दुमदुमून निघाली.

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...