मराठेशाहीतील दक्षिण लावण्यवती धुरंधर राजकारणी ग्वाल्हेर ची महाराणी बायजाबाई शिंदे
भाग 35
महाराणी बायजाबाईसाहेब शिंदे ह्यांचे चरित्र,
लेखक :- दत्तात्रय बळवंत पारसनीस
बायजाबाईसाहेबांची कारकीर्द----------------------1
दौलतराव शिंदे मृत्यु पावले त्या वेळीं हिंदुस्थानांतील ब्रिटिश राज्यसत्ता लॉर्ड आह्मर्त्य ह्या गव्हरनर जनरल साहेबांकडे ** होती. त्यांच्या राजनीतीचा उद्देश एतद्देशीय संस्थाने खालसा करण्याचा नसल्यामुळे त्यांनीं ग्वाल्हेर संस्थानाबद्दल फार उदार मताने विचार केला. ग्वाल्हेरसारखे प्रचंड संस्थान बिनवारस समजून ब्रिटिश राज्यामध्ये सामील केले असते, तर प्रजाजन असंतुष्ट होऊन भयंकर अनर्थ ओढवला असता; व त्यामुळे चोहोकडे अस्वस्थता उत्पन्न झाली असती. परंतु त्या वेळचे मुत्सद्दीधोरण‘‘एतद्देशीय संस्थाने हीं ब्रिटिश राज्याच्या चिरस्थायित्वाचे आधारस्तंभ आहेत, असे शहाणपणाचे असल्यामुळे, एतद्देशीय संस्थानांच्या हक्कांची पायमल्ली न करितां, उलट तीं रक्षण करण्याकडे, त्या वेळच्या चतुर राज्यकर्त्यांची प्रवृत्ति असे. ह्या प्रवृत्तीचा परिणाम इ. स. १८५७ सालच्या बिकट प्रसंगी कसा हितावह झाला, व ब्रिटिश राज्य रक्षण करण्यास ग्वाल्हेरसारख्या एतद्देशीय संस्थानांनी किती उत्कृष्ट साहाय्य केले, हे इतिहासवाचकांस सांगावयास नकोच.
ग्वाल्हेरच्या संस्थानिकास औरस संतति नसल्यामुळे त्यास दत्तक घेण्याबद्दल ब्रिटिश रेसिडेंटाने आग्रहपूर्वक विनवणी करावी | तथापि त्याने ती न जुमानता, आपल्या पत्नीच्या शहाणपणावर हवाला देऊन ब्रिटिश सरकारावर आपला पूर्ण विश्वास ठेवावा; व ब्रिटिश सरकाराने त्या विश्वासाचे चीज करावे; हा प्रेमभाव मांडलिक व त्यांचे सार्वभौम प्रभु ह्या उभयतांस सारखाच भूषणावह आहे, ह्यांत शंका नहीं. असो. |
लॉर्ड आह्मर्त्य ह्यांनीं ग्वाल्हेरच्या गादीबद्दल विचार करतांना, महाराज दौलतराव शिंदे ह्यांची शेवटची इच्छा व त्यांच्या पत्नी बायजाबाईसाहेब ह्यांची योग्यता व कर्तृत्वशक्ति हीं पूर्णपणे ध्यानांत | १ लॉर्ड डलहौसी ह्यांनी ज्या वेळीं एतद्देशीय संस्थाने खालसा करण्याचा क्रम आरंभिला, त्या वेळीं मि० सलिव्हन नामक एका युरोपियन गृहस्थांनीं ग्वाल्हेरच्या संस्थानाची ही हकीकत देऊन त्या वेळच्या उदार राजनीतीची प्रशंसा केली आहे. त्यांनी ह्याप्रमाणे उल्लेख केला आहे:-
·
- In 1826 Dowlatrao Seindiah, Rajah of Gwalior, was ill and childless. Colonel Stewart, the Resident at his court, and his assistant, passed months in urging him to adopt an heir; they reasoned, they argued, they insisted, they even annoyed and irritated the sick prince: for the pride of Scindiah had been broken. After the downfall of the Peishwa, in whose defence his sword had not been drawn, the glory of the Mahratta race Was, he felt, gone, and he was no longer the same man. So, careless of the future, he repulsed all their entreaties, replying
After my death you will be masters of every thing, and may do as you please. In March 1827, he died heirless. But Lord Ahmerst did not—as Lord Dalhousie now says we are bound in all such cases to do-seize on Gwalior as a lapsed” fief. On the contrary-he disclaimed any right to regulate the Gwalior succession;" eagerly and gracefully he recognized the boy whom Scindiah's favourite wife adopted after his death. In this case the right was exercised, not by the eldest, but by the second wife, who, said Scindiah to Colonel Stewart, when teased about the eventualities of his succession, “was a woman of sense."-The Native States of India. page. 22. | 1001
८६ घेऊन, त्यांसच संस्थानचे सर्व आधिपत्य दिले; व त्यांनी आपल्या इच्छेप्रमाणे दत्तक पुत्र घ्यावा असे ठरविले. ही गोष्ट बायजाबाईसाहेब व ग्वाल्हेर दुरबारचे मुत्सद्दी व सर्व प्रजाजन ह्यांस संतोषदायक झाली; व त्यांनी त्याबद्दल नामदार गव्हरनर जनरलसाहेब ह्यांचे व रेसिडेंट मेजर स्टुअर्ट ह्यांचे फार फार अभिनंदन केले. बायजाबाईसाहेब ह्यांनीं ग्वाल्हेरचे रेसिडेंट मेजर स्टुअर्ट ह्यांच्या विचाराने सर्व राज्यकारभार आपल्या हाती घेतला; व ग्वाल्हेरचे सर्व मुत्सद्दी व सरदार लोक ह्यांच्या भेटी घेऊन त्यांस आश्वासने दिली.
No comments:
Post a Comment