मराठेशाहीतील दक्षिण लावण्यवती धुरंधर राजकारणी ग्वाल्हेर ची महाराणी बायजाबाई शिंदे
भाग 36
महाराणी बायजाबाईसाहेब शिंदे ह्यांचे चरित्र,
लेखक :- दत्तात्रय बळवंत पारसनीस
बायजाबाईसाहेबांची कारकीर्द----------------------2
महाराजांच्या पश्चात् बायजाबाईसाहेब व त्यांचे बंधु हिंदुराव घाटगे ह्यांनी राज्याची सर्व व्यवस्था आपले हाती घेतल्यामुळे व दूरबारी लोकांस संतुष्ट केल्यामुळे, ग्वाल्हेर येथे कोणत्याही प्रकारे गडबड झाली नाहीं. | बायजाबाईसाहेब ह्यांनी संस्थानच्या गादीचा धनी करण्याकरिता दत्तक पुत्र घ्यावा अशी सर्व नागरिक जनांची इच्छा होती; व तशी इच्छा ब्रिटिश रेसिडेंट ह्यांनीही व्यक्त केली होती. ह्याकरितां बायजाबाईसाहेबांनी दक्षिणेतील शिंदे ह्यांच्या वंशापैकीं पांच मुलें हिंदुस्थानांत आणविण्याबद्दल कारकून व स्वार पाठविले. त्याप्रमाणे त्यांनी शिंदेघराण्याच्या निरनिराळ्या शाखेतील मुलांचा शोध करून पांच मुलें ग्वाल्हेर येथे आणिली. शिंदे घराण्याचे मूळ पुरुष मानाजी शिंदे कन्हेरखेडकर हे होते. ह्यांच्या वंशजांपैकीं चांगजी शिंदे ह्यांच्या शाखेपैकीं पाटलोजी ह्मणून जे पुरुष होते, त्यांचा पुत्र मुकुटराव हा वयाने ११-१२ वर्षांचा असून, दिसण्यांत हुशार व तरतरीत असा होता. तो बायजाबाईसाहेबांनीं पांच मुलांतून पसंत केला. त्याला थोडे लिहितां वाचतां येत असून, घोड्यावर बसण्याचेही ज्ञान होते. त्यामुळे दरबारच्या मराठे मंडळीस त्याचीच निवड पसंत वाटली. ह्या मुलाची जन्मपत्रिका संस्थानच्या विद्वान् ज्योतिष्यांनी पाहिली, व९७ मुलाचे उच्च प्रतीचे ग्रह वर्तविले. त्याचप्रमाणे सामुद्रिकांनी त्याच्या शरीरावर राजचिन्हे आहेत असे सांगितले. ह्याप्रमाणे राजपद उपभोगण्यास हा मुलगा पात्र आहे, असे सशास्त्र ठरल्यानंतर, शनिवार ता० १६ जून इ. स. १८२७ रोजीं, बायजाबाईसाहेबांनी आपले बंधु हिंदुराव आणि ग्वाल्हेरचे दिवाण बापूजी रघुनाथ, व इतर मुत्सद्दी व सरदार लोक ह्यांस पाचारण करून त्यांचा दरबार भरविला, व त्यामध्ये हा मुलगा दत्तक घेऊन त्यास संस्थानाचा अधिपति करण्याबद्दल त्यांची संमति विचारली. सर्व मंडळींनी मुलगा पसंत करून त्यास गादीवर बसविण्याबद्दल आपले पूर्णपणे अनुमोदन दिले. नंतर बाईसाहेबांनी ता० १८ जून इ. स. १८२७ ह्या शुभदिनीं दत्तविधान व राज्याभिघेक समारंभ करण्याचा बेत ठरविला. बाईसाहेबांच्या मनांत ह्या मुलांस आपल्या मुलीची कन्या देऊन त्याचे लग्न करावे अशी इच्छा उत्पन्न झाली. तेव्हा त्यांनी शास्त्री व पंडित लोकांस बोलावून त्यांच्याकडून उभयतांचीं । टिपणे पाहविली. त्यांत उभयतांची गणमैत्री जमल्यामुळे बाईसाहेबांनी आनंददायक राज्याभिषेकसमारंभाबरोबर मंगलकारक लग्नसमारंभही करण्याचे ठरविले

No comments:
Post a Comment