विनोद जाधव एक संग्राहक

Sunday, 8 September 2019

मराठेशाहीतील दक्षिण लावण्यवती धुरंधर राजकारणी ग्वाल्हेर ची महाराणी बायजाबाई शिंदे भाग 38



मराठेशाहीतील दक्षिण लावण्यवती धुरंधर राजकारणी ग्वाल्हेर ची महाराणी बायजाबाई शिंदे
भाग 38
महाराणी बायजाबाईसाहेब शिंदे ह्यांचे चरित्र,
लेखक :- दत्तात्रय बळवंत पारसनीस
बायजाबाईसाहेबांची कारकीर्द----------------------4
राज्याभिषेकसमारंभ आटोपल्यानंतर बायजाबाईसाहेब ह्यांनीं ग्वाल्हेर दरबारचे सरदार व मुत्सद्दी लोक ह्यांना त्यांच्या त्यांच्या योग्यतेप्रमाणे पोषाख व बहुमान देऊन संतुष्ट केले. कै० महाराज दौलतराव शिंदे ह्यांचे कारकीर्दीत जे लोक आपल्या कर्तृत्वशक्तीने आणि मर्दुमकीने योग्यतेस चढले होते, त्यांस व त्यांच्या वंशजांस बायजाबाईसाहेबांनी पूर्णपणे अभय देऊन, त्यांच्या पूर्वीच्या जहागिरी, तैनाती अथवा नेमणुका ह्यांत बिलकूल अंतर पडू दिले नाही. त्यामुळे त्यांची कारकीर्द लोकप्रिय होऊन सर्व लोक त्यांच्या आज्ञेमध्ये वर्ते लागले; व दरबारची शिस्त उत्तम राहून ग्वाल्हेरच्या प्रजेस राजक्रांतीचे कोणतेही दुःख सहन करण्याचा प्रसंग आला नाहीं. |
बायजाबाईसाहेब ह्यांच्या दरबारी कोण कोण सरदार व मुत्सद्दी होते ह्यांची माहिती उपलब्ध झाली आहे. ती पाहिली ह्मणजे बायजाबाईची जुन्या सेवकांविषयींची प्रीति व राजव्यवहारचातुर्य ह्या गुणांचे),2, प्रकाशन झाल्यावांचून राहत नाही. जातीची अबला होऊन ज्या । राजस्त्रीने आपल्या दरबारांत राजकारस्थानपटु, तरवारबहादुर, व बुद्धिवैभवसंपन्न अशा मंत्रिमंडळाचा व सेनाग्रंणींचा संग्रह केला होता, त्या स्त्रीच्या शहाणपणाची व हुशारीची तारीफ कोण करणार नाहीं ? | असो.
बायजाबाईसाहेबांच्या दरबारांत जे सरदार व मुत्सद्दी होते त्यांची । माहिती येणेप्रमाणेः-- |
जयसिंगराव घाटगे हिंदुरावः—हे सखारामराव घाटगे सर्जेराव ह्यांचे चिरंजीव व बायजाबाईसाहेबांचे वडील बंधु होत. सर्जेराव घाटगे ह्यांचा दौलतराव शिंदे ह्यांच्या दरबारी इ. स. १८१० सालीं वधझाला. नंतर जयसिंगराव हे इ. स. १८१५ चे सुमारास ग्वाल्हेरीस गेले. तोपर्यंत हे दक्षिणमहाराष्ट्रांतील आपल्या कागलच्या जहागिरीचा उपभोग घेत होते. कोल्हापुरचे महाराजांनी ह्यांस • हिंदुराव' व 'वजारतमाब' असे किताब दिले होते. त्यावरून हे 'हिंदुराव' ह्याच नांवाने प्रसिद्ध होते. हे बायजाबाईसाहेबांचे सख्खे बंधु असल्यामुळे व बायजाबाईसाहेबांचे दौलतराव शिंदे ह्यांचेवर चांगले वजन असल्यामुळे हे ग्वाल्हेरच्या दरबारांत तेव्हांच मोठ्या योग्यतेस चढले. हे स्वभावतः मोठे बाणेदार व तेजस्वी असून, स्वातंत्र्यप्रियता हा गुण त्यांचे अंगीं फार वसत असे. त्यामुळे संस्थानांतील हांजी हांजी करणाच्या लोकांवर त्यांची तेव्हांच छाप - पडत असे. दौलतराव शिंदे ह्यांची हिंदुरावांवर पुढे पुढे इतकी मेहेर1) बानी जडली की, त्यांनी त्यांस १,५०,००० रुपयांची जहागीर • बक्षीस दिली, व आपल्या दरबारांत त्यांस पहिल्या प्रतीचे सरदार -- केले. एवढेच नव्हे, तर त्यांच्या प्रत्येक हिताहिताच्या गोष्टीबद्दलही ते काळजी घेऊ लागले.

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...