विनोद जाधव एक संग्राहक

Sunday, 8 September 2019

मराठेशाहीतील दक्षिण लावण्यवती धुरंधर राजकारणी ग्वाल्हेर ची महाराणी बायजाबाई शिंदे भाग 37

मराठेशाहीतील दक्षिण लावण्यवती धुरंधर राजकारणी ग्वाल्हेर ची महाराणी बायजाबाई शिंदे
भाग 37
महाराणी बायजाबाईसाहेब शिंदे ह्यांचे चरित्र,
लेखक :- दत्तात्रय बळवंत पारसनीस
बायजाबाईसाहेबांची कारकीर्द----------------------3
सर्व सरदार व मुत्सद्दी लोकांचा दरबार भरवून सर्वांच्या विचाराने बायजाबाईनीं दत्तविधान व राज्याभिषेक असे दोन्ही समारंभ ठरविले. ही गोष्ट ता. ९ जुलईच्या “कलकत्ता गव्हरमेंट ग्याझेट' मध्येही प्रसिद्ध झालेली आहे. त्यांत स्पष्ट लिहिले आहे:- On the Saturday previous, the chiefs and the ministers were assembled at the durbar, when the intentions of the Baiza Bai to adopt and place Mookut Rao on the musnud were publicly announced, and the opinions of the assembly were asked. Not dissentient voice was heard, and all expressed their warm con. currence in the measure.” ह्यावरून बायजाबाईसाहेब ह्या लोकमताचे महत्त्व जाणत होत्या असे ह्मणण्यास हरकत नाहीं. ५८ रविवार ता. १७ जून रोजी ग्वाल्हेर येथील राजवाड्यांत मुकुटराव ह्यांचा दत्तविधनिविधि व लग्नसमारंभ फार थाटाने झाला. नंतर दुसरे दिवशीं-ह्मणजे सोमवार ता. १८ रोजीं, राज्याभिषेक समारंभ झाला. ह्या दिवशीं सर्व नगरामध्ये आनंदप्रदर्शनार्थ गुढ्या तोरणे उभारली होती; व जिकडे तिकडे मंगलोत्सव दृष्टीस पडत होता. त्या दिवशीं प्रातःकाळीं वधूवरांची वरात हत्तीवरून मोठ्या समारंभाने वाजत गाजत निघाली व गृहप्रवेश होऊन बायजाबाईसाहेबांनी उभय मुलांस मांडीवर घेऊन त्यांच्या तोंडांत साखर घातली. ह्याप्रमाणे लग्नसोहळा झाल्यानंतर राजवाड्यामध्ये राज्याभिषेकाचा थाट उडाला. ब्रिटिश रेसिडेंट मेजर स्टुअर्ट व त्यांचे असिस्टंट आणि इतर युरोपियन लष्करी कामगार आपापले दरबारी पोषाख करून व सुवर्णांकित म्यानाच्या समशेरी कमरेस लटकावून सभास्थानी येऊन दाखल झाले. त्याचप्रमाणे ग्वाल्हेर संस्थानचे सर्व सरदार, दरकार, मानकरी, मुत्सद्दी वगैरे लोक आपापल्या इतमामा| निशीं दरबारांत हजर झाले. राजवाड्यापुढे घोडेस्वार, शिबंदी, प्यादे ह्यांची निरनिराळीं पलटणे खडी ताजीम देण्याकरितां खडी होती. ह्याप्रमाणे दरबार भरून सुमुहूर्त वेळा प्राप्त होतांच, हिंदुरावांनीं मुकुटराव ह्यांस अंतःपुरांतून दुरबारमहालामध्ये आणिलें. नंतर ब्रिटिश रेसिडेंट व सर्व दरबारी लोक ह्यांनी खडी ताजीम देऊन महाराजांस सिंहासनावर आरूढ केलें. तों इकडे तोफा व बंदुका ह्यांचे मोठमोठे आवाज निघून त्यांनी नभोमंडल भरून गेले. ह्याप्रमाणे मुकुटराव ग्वाल्हेरचे अधिपति झाल्यानंतर मेजर स्टुअर्ट ह्यांनीं गव्हरनर जनरलसाहेबांचा खलिता व उभय वधूवरांस सादर करण्याकरिता त्यांच्याकडून आलेली बहुमूल्य खिलात अर्पण केली. नंतर सरदार व बडे लोक ह्यांनी अनेक नजरनजराणे व मूल्यवान् वस्त्रे महाराजांस व वाईसाहेबांस नजर कलाह्या वेळीं मुकुटराव ह्यांस शिंदे घराण्यांतील रणशूर वीर जनकोजी६९ ह्यांचे अभिधान देण्यात आले, व त्यांच्या नांवानें जयघोष करण्यांत आला. ह्याप्रमाणे मध्यान्ह समय पावेतों समारंभ होऊन, रीतीप्रमाणे अत्तरगुलाब व पानसुपारी होऊन दरबार बरखास्त झाला.
टीप :फोटो काल्पनिक आहेImage result for raja ravi varma paintings

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...