विनोद जाधव एक संग्राहक

Tuesday, 10 September 2019

मराठेशाहीतील दक्षिण लावण्यवती धुरंधर राजकारणी ग्वाल्हेर ची महाराणी बायजाबाई शिंदे भाग 43


मराठेशाहीतील दक्षिण लावण्यवती धुरंधर राजकारणी ग्वाल्हेर ची महाराणी बायजाबाई शिंदे
भाग 43
महाराणी बायजाबाईसाहेब शिंदे ह्यांचे चरित्र,
लेखक :- दत्तात्रय बळवंत पारसनीस
बायजाबाईसाहेबांची कारकीर्द----------------------9
लालाभाऊः—हे दौलतराव शिंद्यांचे प्रसिद्ध सरदार गोपाळराव भाऊ ह्यांचे चिरंजीव होत. शिंदे सरकारांकडून ह्यांस एक लाख रुपयांची जहागीर होती. ह्यांचे वय २५ वर्षांचे असून त्यांच्याकडे६५ दक्षिणेतील सातारा जिल्ह्यापैकीं वांकडी व अहमदनगरपैकी बेलापुर अशी दोन गांवें इनाम होतीं. ह्यांच्याकडे बायजाबाईसाहेबांच्या दरबारांतील सरदारीचे काम होते.
फकीरजी गाढवेः-हे सातारा जिल्ह्यांतील वाई गांवचे रहिवासी असून जातीचे धनगर होते. हे प्रथमतः महादजी शिंद्यांचे हाताखाली १०० स्वारांचे शिलेदार होते. ह्यांनी इ. स. १७९८ सालीं महादजी शिंद्यांच्या बायकांचे व दौलतरावांचे वैमनस्य होऊन जो दंगा झाला, त्या वेळीं सर्जेराव घाटग्यांस मदत केली; व पुढेही वेळोवेळी अनेक साहसाचीं। कृत्ये करण्यांत त्यांस साहाय्य केले. त्यामुळे दौलतरावांची त्यांजवर मेहेरबानी जडून, त्यांस सैन्याच्या एका तुकडीचे स्वतंत्र आधिपत्य मिळाले होते. ह्यांनी सर्जेरावांच्या बरोबर जरी कांहीं निर्दयपणाची कृत्ये केली होती, तथापि पुढे गोपाळरावभाऊबरोबर उत्तर हिंदुस्थानांत त्यांनी शौर्याची चांगली कामेही अनेक केली. त्यामुळे ह्यांच्या शूरपणाची शिंद्यांच्या दरबारांत प्रसिद्धी होती. बायजाबाईनीं फकीरजी गाढवे हे आपल्या यजमानाच्या वेळचे जुने सरदार आहेत असे पाहून, त्यांच्याकडे खासपागेपैकी २०० स्वारांचे आधिपत्य सांगितले.

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...