विनोद जाधव एक संग्राहक

Tuesday, 10 September 2019

मराठेशाहीतील दक्षिण लावण्यवती धुरंधर राजकारणी ग्वाल्हेर ची महाराणी बायजाबाई शिंदे भाग 44



मराठेशाहीतील दक्षिण लावण्यवती धुरंधर राजकारणी ग्वाल्हेर ची महाराणी बायजाबाई शिंदे
भाग 44
महाराणी बायजाबाईसाहेब शिंदे ह्यांचे चरित्र,
लेखक :- दत्तात्रय बळवंत पारसनीस
बायजाबाईसाहेबांची कारकीर्द----------------------10
उदाजी कुटकेः–हे जातीचे धनगर असून अहमदनगर जिल्ह्यांतील कोळ पिंपळगांवचे राहणारे होत. हे दौलतराव शिंद्यांचे कारकीर्दीतील एक प्रख्यात सरदार होते. ह्यांच्याकडे * सरनोबत ' हा अधिकार असून २००० स्वारांच्या कांटिंजंट फौजेचे आधिपत्य होते. ही फौज शिंदे सरकारची होती, तथापि तिच्यावर ब्रिटिश अधिका-यांची देखरेख असे. हे नेहमीं गुणा येथील छावणीमध्ये राहत असत. बायजाबाईसाहेबांनी ह्यांच्याकडे सरनोबतीचे पद देऊन, पूर्वीप्रमाणेच कांटिंजंट फौजेचेही काम सांगितलें. ।
माधवरावपंत ब्रह्माजीः-हे शिंदे सरकारच्या तोफखान्याचे अधिपति होते. हे काम त्यांच्याकडे इ. स. १८०९ पासून होते. हे जुनेL0 ६६ व प्रामाणिक नौकर असे पाहून बाईसाहेबांनीं तेच काम त्यांस सांगितले. दौलतराव शिंदे ह्यांनी सहा पायदळ पलटणी व त्यांच्या बरोबरच्या २० तोफा ह्यांच्या ताब्यात दिल्या होत्या, व त्यांच्या खर्चाकरितां स्वतंत्र मुलूख तोडून दिला होता. हे अहमदनगर जिल्ह्यांतील साकुरमांडव्याचे कुळकर्णी होते. परंतु केवळ स्वतःच्या कर्तबगारीने उदयास चढले. बायजाबाईसाहेबांनी ह्यांचा पूर्वीचा इतमाम ह्यांच्याकडे तसाच कायम ठेविला.
लक्ष्मणराम विठ्ठलः हे मूळचे दक्षिणेतील चांभारगुंडी गांवचे रहिवासी होत. ह्यांचे वडील विठ्ठल महादेव ऊर्फ विठ्ठलपंत तात्या हे दौलतराव शिंद्यांच्या दरबारांत नामांकित मुत्सद्दी होते. ह्यांनीच इ. स. १८०३ सालीं, सर आर्थर वेलस्ली साहेबांबरोबर सुर्जीअंजनगांवचा तह ठरविला होता. ह्यांचे शहाणपण जाणून दौलतराव शिंदे ह्यांनी त्यांच्याकडे दुरबारवकिलीचे काम सोपविले होते. ह्यांचे सर आर्थर वेलस्ली, सर जॉन मालकम इत्यादि युरोपियन मुत्सद्यांवर चांगले वजन असे. त्यांचे चिरंजीव लक्ष्मणराव विठ्ठल हे होत. ह्यांस बायजाबाईसाहेबांनीं ग्वाल्हेरचे किल्लेदार नेमून, त्यांच्या सैन्याच्या खर्चाकरिता ग्वाल्हेरसभोंवतालची ५०।६० गांचे त्यांस जहागीर दिली.

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...