भाग 45
महाराणी बायजाबाईसाहेब शिंदे ह्यांचे चरित्र,
लेखक :- दत्तात्रय बळवंत पारसनीस
बायजाबाईसाहेबांची कारकीर्द----------------------11
विठ्ठलपंत तात्या
विठ्ठलपंत तात्या हे फार शहाणे व चतुर मुत्सद्दी होते. इंग्रजाकडील लष्करी मंडळींत विनोदाने ह्यांचे टोपण नांव “Old Brag” (ह्मातारा बढाई. खोर ) असे पडले होते. ह्या संबंधाने के साहेबांनी मालकमसाहेबांच्या चरित्रांत एक आख्यायिका दिली आहे. ती फार मौजेची व वाचनीय आहे. ती येणेप्रमाणे:- “He was a man far advanced in years, but of unbroken energy, and formed both by nature and habit for diplomatic address. His self-command was wonderful. He had a sour supercilious, inflexible countenance, in which no penetration could ever discern a glimpse of feeling. He wore, indeed, an ।।)
रामराव फाळकेः–हे वाईप्रांतांतील जुने मराठे सरदार ग्वाल्हेर दरबारी होते. बायजाबाईसाहेबांनी ह्यांच्या हाताखालीं ४०० शिलेदार स्वार देऊन त्यांचे आधिपत्य त्यांस सांगितले. मणीराम शेटः–शिंद्यांच्या राज्यामध्ये मुख्य फडणीस गोकुळ पारख ह्मणून एक धनाढ्य पेढीवाला होता. तो इ. स. १८२७ सालीं मृत्यु पावला. तेव्हा त्याचे काम बायजाबाईनीं जयपुरचे रहिवासी मणीराम शेट ह्यांजकडे सांगितले. हे पूर्वी अगदीं गरीब स्थितीत होते. परंतु पुढे इतके द्रव्यसंपन्न झाले कीं, शिंद्यांच्या लष्करांत त्यांची बरोबरी कोणाच्यानंही करवेना. ह्यांचे सर्व सावकारांवर व पेढीवाल्यांवर अतिशय वजन असून त्यांची सल्लामसलत घेतल्यावांचून सरकारास एक रुपयाही कोणी कर्ज देत नसे. ह्यांची पेढी ६ मणीराम आणि लखमीचंद ' ह्या नांवाने त्या वेळी प्रसिद्ध असे
No comments:
Post a Comment