मराठेशाहीतील दक्षिण लावण्यवती धुरंधर राजकारणी ग्वाल्हेर ची महाराणी बायजाबाई शिंदे
भाग 58
महाराणी बायजाबाईसाहेब शिंदे ह्यांचे चरित्र,
लेखक :- दत्तात्रय बळवंत पारसनीस
बायजाबाईसाहेब व महाराज जनकोजीराव ह्यांचा बेबनाव---------3
ग्वाल्हेरच्या दुस-या एका -.. इतिहासकारांनी असे लिहिले आहे की, “बिनतोडीचे वेळीं बायजाबाईनं जनकोजी शिंद्यांस दत्तक घेतलें, आणि दौलतरावाने सांगितल्याप्रमाणे / आपण जन्मभर राज्य चालवीन असा मनांत निश्चय करून, दत्तक घेतलेल्या मुलास आपल्याजवळ शिक्षणांत ठेविलें. हा मुलगा तारुण्यावस्थेत येतांच, आपल्यास वैभवास आणणारीचे विचारे न वागतां, कांहीं । कुमार्गी व आपस्वार्थी लोकांची संगत धरून, त्या बाईच्या शिक्षणांतून मुक्त होण्याची इच्छा करू लागला. त्या जनकोजी शिंद्यास अनुपकारीपणाचे मार्गास लावणारे व कांहीं नवेंजुने होऊ इच्छिणारे लोकांनी त्याचा पक्ष धरिला. इंग्रज लोकही, याच संधीस, नवा राजा गादीवर | बसला त्याचे नांवचा हरएक सरकारी कागदावर शिक्का झाल्याखेरीज तो कागद कोणत्याही प्रकारे ते दस्तऐवजांत खरा मानीनातसे झाले. तेव्हां । जनकोजी शिंद्याचे पक्षास अधिक बळकटी आली, व बायजाबाईपासून त्याला दूर करण्याचा त्यांणीं विशेष प्रयत्न मांडिला. हीच वास्तविक खरी ? गोष्ट असावी असे मानण्यास हरकत नाहीं.
जनकोजीराव ह्यांस बायजाबाईसाहेबांनी दत्तक घेऊन त्यांस आपला नातजावई केले, व ग्वाल्हेर संस्थानच्या राजपदाचे धनी केले; ही।---१४ 21-22 2017 ८/०८-०.८' गोष्ट लक्ष्यात घेतली ह्मणजे जनकोजीराव ह्यांनी आपल्या वैभवसंपन्न व राज्यव्यवहारचतुर मातुश्रीच्या आज्ञेत चालणे हे त्यांचे कर्तव्य होते असेच ह्मणावे लागते. परंतु त्यांनी ह्या कर्तव्यास पराङ्मुख होऊन लहानपणापासून मूर्ख व हलकट लोकांच्या नादी लागून कुमार्ग स्वीकारला. त्यामुळे दिवसेंदिवस बायजाबाईसाहेबांच्या मनांत त्यांचे विषयीं तिरस्कार व अप्रेमबुद्धि उत्पन्न होऊ लागली. महाराज जनकोजीराव ह्यांस दत्तक घेतल्यानंतर कित्येक दिवसपर्यंत, बायजाबाईसाहेब त्यांच्याशी प्रेमभावाने वागत असून त्यांचे लडिवाळपणाने कौतुक करीत. परंतु जेव्हां महाराजांनीं दुष्ट लोकांच्या नादी लागून, त्यांच्या शिकवणीने, स्वतंत्रपणाने वागण्याचा व शिरजोर वर्तन करण्याचा क्रम आरंभिला, त्या वेळेपासून त्यांनी त्यांस आपल्या ताब्यांत ठेवण्याचा प्रयत्न केला. ग्वाल्हेर दरबारचे माहितगार व जुने रेसिडेंट मेजर स्टुअर्ट ह्यांच्याही कानांवर ह्या अप्रिय गोष्टी अनेक वेळां गेल्या, व त्यांनीही त्यांबद्दल वेळोवेळीं मध्यस्थी करून, उभयतांचा सलोखा करण्याचा प्रयत्न केला; परंतु त्यांत त्यांस यश आलें नाहीं. महाराज जनकोजीराव ह्यांच्याबद्दल ग्वाल्हेरचे रेसिडेंट व दुसरे युरोपियन लोक ह्यांनी जे लेख लिहिले आहेत, त्यांवरून त्यांच्याविषयीं व त्यांच्या वर्तनाविषयीं अनुकूल ग्रह होत नाहीं.

No comments:
Post a Comment