विनोद जाधव एक संग्राहक

Friday, 13 September 2019

मराठेशाहीतील दक्षिण लावण्यवती धुरंधर राजकारणी ग्वाल्हेर ची महाराणी बायजाबाई शिंदे भाग 59

मराठेशाहीतील दक्षिण लावण्यवती धुरंधर राजकारणी ग्वाल्हेर ची महाराणी बायजाबाई शिंदे
भाग 59
महाराणी बायजाबाईसाहेब शिंदे ह्यांचे चरित्र,
लेखक :- दत्तात्रय बळवंत पारसनीस
बायजाबाईसाहेब व महाराज जनकोजीराव ह्यांचा बेबनाव---------4
इ. स. १८२९ च्या जानेवारी महिन्यांत हिंदुस्थानचे मुख्य सेनाधिपति लॉर्ड कोंबरमियर हे ग्वाल्हेर येथील सैन्याची पहाणी करण्याकरितां आले होते. त्या वेळी त्यांची व महाराज जनकोजीराव ह्यांची मुलाखत होऊन, महाराज जनकोजीराव ह्यांच्यासंबंधाने त्यांचा जो ग्रह झाला, तो त्यांचे एडीका ( परिचारक ) मेजर आर्चर ह्यांनी आपल्या प्रवासवृत्तांत नोंदून ठेविला आहे. त्यांत त्यांनी असे लिहिले आहे की, “राजेसाहेब हे अगदी बालवयी ह्मणजे अवघे १४ वर्षाचे(५ आहेत. त्यांचा चेहरा गोड असून फार सौम्य आहे. त्यांचा वर्ण गोरा असून ते दिसण्यांत सुरेख आहेत. परंतु ते अगदीं जड, जिज्ञासाशून्य, आणि जवळ चाललेल्या गोष्टींविषयी मन्दोत्साह असे दिसतात. तथापि, कमांडर-इन-चीफ ह्यांच्यासारख्या बड्या गृहस्थांच्या प्रथम भेटीने ते घाबरले नाहीत. त्यांनी आमच्या समक्ष विडा खाल्ला. अशा रीतीने विडा खाणे. त्यांची दरबारी मंडळी व एकंदरीत सर्व पूर्वेकडील लोक असभ्यपणा मानीत नाहींत. ह्या लेखावरून त्यांच्याविषयी चांगले मत होत नाहीं । | महाराज जनकोजीराव ह्यांचे वर्तन दिवसेंदिवस फार शिरजोर-a-.. पणाचे व जुलमाचे होऊ लागले; व त्यांच्या हातून फार अनुचित कृत्यें। घडू लागली. इ. स. १८३० मध्ये बायजाबाईसाहेबांची नात जी , जनकोजीरावांस दिली होती, ती मृत्यु पावली. तेव्हां जनकोजीराव ह्यांनी दुसरे लग्न केले. त्या लग्नामध्ये त्यांनी आपल्या अविचाराची कमाल करून सोडिली. त्यांनी जवळच्या लोकांच्या अंगावर बाण उडविले. त्यायोगाने एक मनुष्य जखमी होऊन मृत्यु पावला. त्यामुळे बायजाबाईसाहेबांस त्यांच्यावर सक्त नजर ठेवून त्यांचा वारंवार निषेध करणे भाग पडले. परंतु ती गोष्ट त्यांस न रुचून, त्यांनीं रेसिडेंट साहेबांकडे वारंवार तक्रारी नेण्यास प्रारंभ केला. त्यामुळे बाईसाहेबांचे मन त्यां | 1. “The Rajah is quite a lad, about fourteen years of age, of a very pleasing and mild expression of countenance; he is fair and good-looking; but appears dull, inapprehensive, and but little interested in what goes on around him ; he was not. however, embarrassed, though it was his first appearance before a stranger of the Commander-in-chief's rank. In common with his court, and all Orientals, who consider it no want of politeness, he chewed betel while we were present.” -Tota's 72 Upper Indig. Page 41-42, ८६ च्याविषयी अतिशय कलुषित झाले. ह्या वेळी ग्वाल्हेर दरबारचे रेसिडेंट मेजर स्टुअर्ट हे फार भले व थोर गृहस्थ होते. त्यांनी महाराजांची चांगली कानउघाडणी करून, त्यांस ताळ्यावर आणण्याचा प्रयत्न केला. परंतु तो फलद्रूप झाला नाहीं.

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...